जगायचंय रे पुन्हा – आत्महत्येपासून जीवनाकडे...
संस्थेचा छोटा परिचय:
एक शब्द... एक स्पर्श... एक माया – कधी कधी एवढंच पुरेसं असतं कोणाचं जीवन बदलायला.
“जगायचंय रे पुन्हा...” हा प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाउंडेशन संस्थेचा नाशिक येथे "मानव जीवन केंद्र" हा उपक्रम आहे – जो जीवनाकडे परत नेणारी आशेची वाट दाखवतो.
आत्महत्येपासून जीवनाकडे – एक हृदयस्पर्शी आवाहन..!
आज समाजात काही तरुण-तरुणी, विवाहित पुरुष स्ञीयां काही वयोवृद्ध, आणि काही सामान्य माणसे — आयुष्याच्या वळणावर एकटे पडले आहेत.
नात्यांचा आधार सुटला, विश्वास तुटला, आणि मनात प्रचंड एकाकीपणा साचला.
कधी कधी या एकटेपणाचं रूप इतकं तीव्र होतं की माणूस स्वतःच्याच अस्तित्वाला संपवण्याचा विचार करतो...पण खरंच इतक्या सहज संपवायचं का हे आयुष्य...?
आत्महतेचे विचार येताय क्षण भर आमच्याशी बोला ..! हेच लाल बटन दाबा
Our Mission (ध्येय व उद्दिष्टे):
आत्महत्येपासून रोखण्यासाठी तत्काळ संवाद आणि समुपदेशन.
मानसिक आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे.
शाळा, कॉलेज, आणि ग्रामीण भागात “Hope Talks” [ संभाषण चर्चासत्र ] आयोजन.
प्रत्येकाला सांगणे — “तू एकटा नाहीस!”
आत्महत्या रोखण्यासाठी आमची संस्था "मानव जीवन केंद्र" हे अहोरात्र कार्यरत