तुमचे प्रश्न...... आमची उत्तरे
(सोशल मीडिया वर किंवा प्रत्यक्षात ज्योतिषांना हमखास विचारलेले प्रश्न)
तुमचे प्रश्न...... आमची उत्तरे
(सोशल मीडिया वर किंवा प्रत्यक्षात ज्योतिषांना हमखास विचारलेले प्रश्न)
It is the question most often put to astrologers. My friend, I compared 350 birth charts of people who were successful in their love (meaning their marriage was love marriage) and 350 birth charts of people whose marriage was arranged marriage (obviously they were not successful in their love). We compared 40+ different astrological configurations of Venus, Moon, Neptune, 5th and other houses and their lords which are assumed by astrology as important for success in love. We DID NOT FIND ANY SIGNIFICANT DIFFERENCE in the two groups. We did a lot more research before we concluded. The short answer to your question is that astrology has no merit at all in predicting Love. Don't waste any more of your time or money on astrology. We highly recommend you spend this time on consulting an individual who is mature and balanced. If you want a long answer to your question you may watch the video or see outcome of our research on this site. Check out our RESEARCH section for proof. We shall show how astrology is not true to predict the impact of life in general or to predict love in particular. Please also check it after a few month as the research paper we wrote on this particular topic it is sent to Journal of Scientific Exploration for publication at present.
आपण कुठून सुरवात केली हेही महत्वाचे असते. एक लक्षात घ्या, आपण जर गरीब घरात जन्म घेतला असेल तर आपला जीवन प्रवास हा बहुतेक वेळा अतिशय कठीण आणि दुर्दैवी असतो. हे तुमच्या प्रमाणे आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांचे आहे. बहुतेक वेळा घरातल्या गरिबीमुळे आपले शिक्षण योग्य झालेले नसते, आपल्या घरात अनेक जबाबदाऱ्या असतात ज्यामुळे असलेला पैसे खर्च होतो आणि तो आपल्याला आपले करिअर घडवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी मिळत नाही. तोकड्या पैशाने सुरु केलेला व्यवसाय हा अपयशी होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारे गरिबी जिथे तिथे माणसाला अडचणीत आणते. पण हे तुमचे नशीब वाईट असल्याने तुमच्याच बाबतीत घडते आहे असे समजू नका. आणि तुमच्या पत्रिकेतील ग्रहांमुळे होते आहे असे तर बिलकुल समजू नका. त्यापेक्षा हे जीवनाचे सत्य म्हणून स्वीकारून लढाई चालू ठेवा.
आता मी कितीही सांगितले तरी तुमच्या मनात हे पत्रिकेचे आणि ग्रहांचे संशयभूत सारखे डोकावणार म्हणून तुम्हाला त्याविषयी काही सांगतो. ते थोडे शास्त्रीय वगैरे वाटेल पण ते वाचल्याशिवाय आपले ज्योतिषावरचे अवलंबून राहणे जाणार नाही म्हणून चिकाटीने वाचून समजून घ्या. जर तुम्ही हे समजून घेतले तर ज्योतिष हा विषय कायमचा तुमच्या आयुष्यातून जाईल आणि तुम्ही प्रयत्नवादी व्हाल नाहीतर आपले ग्रहच वाईट आहेत अशा समजुतीत राहून कायम निराश रहाल.
गेले १० वर्षे आमची टीम ज्योतिष हे आहे कि नाही याचे संशोधन करत आहे. त्याविषयी थोडक्यात सांगतो. हि गोष्ट तुम्हीही कबूल कराल कि ज्योतिष खरे असेल तर अमिताभ बच्चन, रणवीर सिंग याच्या सारख्यांच्या आणि आपल्या पत्रिकेत मोठाच फरक असला पाहिजे. बरोबर? त्या धर्तीवर आम्ही सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत, म्हणजे 742 पत्रिका Celebrities च्या आणि 500 पत्रिका सामान्य लोकांच्या. या दोन्ही संचाना, ज्योतिष शास्त्रात सेलिब्रिटी असण्यासाठी सांगितलेले नियम लावले आणि ते किती लागू पडतात याची तुलना केली. ज्योतिष शास्त्र आणि ते नियम खरे असतील तर Celebrity संचाला ते नियम जास्तीत जास्त लागू पडतील आणि Ordinary संचाला अगदी कमी , बरोबर? बघा समजायला इतका सोपा असा हा प्रयोग आहे. यालाच एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. या प्रयोगात अनेक नियम तपासले, शेकडो गोष्टी तपासल्या आणि हा एकच नाही तर आम्ही असे अनेक प्रयोग केले. (rich versus poor, mentally disabled versus intelligent etc etc.). या सगळ्या प्रयोगांच्या आधारे मी तुम्हाला खात्री पूर्वक सांगतो या शास्त्रात, त्यांच्या नियमात काहीही तथ्य नाही - हे माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे. हा विषय एवढा मोठा आणि क्लीष्ट आहे कि ते सर्व सविस्तर लिहिणे इथे शक्य नाही. अधिक माहिती साठी भेट द्या - www.AstrologyYesOrNo.com
किंवा तेथे असलेला 'लग्न, करिअर आणि पत्रिका बघणे - एक संशोधन’ हा ब्लॉग वाचा.
आपण ज्या परिस्थिती आहेत ती दुर्दैवी असू शकते पण त्यासाठी पत्रिका, तुमचे ग्रह किंवा त्यातील दोष कारणी भूत नाही याची मी पक्की खात्री देतो आणि वर त्याचे पुरावे दिलेच आहेत. ज्योतिषाकडे जाण्या पेक्षा तुम्ही जिथे अपयशी होत आहेत त्या क्षेत्रात एक्स्पर्ट असणाऱ्या लोकांकडे सल्ला मागा. त्याचा फायदा होईल. भारतात एकूणच गरिबी, स्पर्धा लोकसंख्या यामुळे जीवन कठीण आहे, पण त्याच प्रमाणे आपल्याला धर्म, अध्यात्म, संस्कृती यांचा अतुलनीय असा वारसा मिळाला आहे कि जे आपल्याला दुःख हलके करण्यास नेहमीच मदत करतात. त्याचा जरूर फायदा घ्या. धीर सोडू नका आणि लढाई चालू ठेवा.
विवाहासाठी पत्रिका पहाणे कितपत योग्य आहे?
पत्रिका बघून लग्न करणे हे अगदी चुकीचे कारण ती पद्धती सिद्ध झालेली नसताना आपण केवळ घाबरून आपला एवढा मोठा निर्णय त्यावर सोपवणे हे बरोबर नाही. ज्या पत्रिका बघण्यावर आपण विश्वास ठेवतो ती कशी आहे ते एकदा निपक्षपाती पणे बघा. अगोदर म्हणतात गुण जुळल्या शिवाय पुढे जाऊ नका. जेव्हा आपण म्हणतो गुण जुळवून सुद्धा घटस्फोट होतात तेव्हा म्हणतात नुसते गुण बघून होत नाही तपशीलवार (detail) पत्रिका बघायला पाहिजे असते. तपशीलवार पत्रिका बघण्यासाठी नियम सांगा म्हटले तर त्याचे सरळ उत्तर कधीच मिळत नाही. लग्न टिकण्यासाठी असणाऱ्या योगांची अथवा नियमांची यादी कुठेही तुम्हाला ‘एक’ अशी मिळणार नाही. आज कोट्यावधी लग्न जर पत्रिका बघून होत असतील तर त्याच्या नियमांचे, बघण्याच्या पद्धतीचे standardization नको? एक हजार पत्रिका घेऊन या पद्धतीची अशी काही शास्त्रीय चाचणी केली आहे का तर त्याचे उत्तर साफ नाही असे आहे. हे सर्व एक प्रकारचे समाजाचे शोषण आहे आणि म्हणूनच हे संशोधन आम्ही आमच्या खर्चाने हातात घेतले आणि आज त्याचे परिणाम इथे आपल्यापुढे ठेवत आहोत.
मी तुम्हाला आम्ही केलेला प्रयोग थोडक्यात सांगतो - सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 350 पत्रिका घटस्फोट झालेल्यांच्या आणि 350 पत्रिका दीर्घ काळ लग्न टिकलेल्या लोकांच्या, ज्यांचा कधीही घटस्फोट झाला नाही, एकत्र राहात आहेत, मुलं-बाळं आहेत वगैरे. थोडक्यात लग्नाच्या दृष्टीने सर्वसाधारण (नॉर्मल) असे म्हणूया. या दोन्ही संचाना ज्योतिष शास्त्रात घटस्फोटासाठी सांगितलेले नियम लावले आणि ते किती लागू पडले याची तुलना केली. नंतर पुनरचाचणी साठी दीर्घ काळ वैवाहिक जीवन असण्याचे नियम लावले आणि त्यांची ही तुलना केली. बघा समजायला इतका सोपा असा हा प्रयोग आहे. यालाच एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते.
सगळे मिळून आम्ही ज्योतिष शास्त्राची 22 most fundamental अशी तत्वे तपासली (नीच ग्रहाची शनी मंगळाशी युती / प्रतियोग, ग्रह क्रूर नक्षत्रात, स्थानात पापग्रह, भावेशाचे पाप ग्रहां बरोबर युती किंवा प्रतियोग वगैरे), पण empirical टेस्टिंग नुसार ती सर्व तत्वे अवैध आढळून आली. वेगवेगळे १३६ मापदंड तपासले. आम्हाला दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. मित्रांनो, या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण 350 अधिक 350 अशा 700 पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा. आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून हजारो वर्षांची विद्या खोटी कशी ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच निष्कर्ष मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), मतिमंद विरुद्ध हुशार, सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक, असे अनेक प्रयोग केले. पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच निष्कर्ष मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.
हा विषय एवढा मोठा आणि क्लीष्ट आहे कि ते सर्व सविस्तर लिहिणे इथे शक्य नाही. या सर्व संशोधनाचे अनेक research papers international journals मध्ये publish झाले आहेत, ज्याची यादी इथे दिली आहे, ती तुम्ही बघू शकता.
किंवा तेथे असलेला 'लग्न आणि पत्रिका बघणे - एक संशोधन’ हा ब्लॉग वाचा.
आजकाल बऱ्याचदा अशी परिस्थिती असते कि, पत्रिका खरंतर बघायची नाहीये, पण तसेच पुढे जायचे धाडस होत नाही, शंका असतात, असे असेल तर या website वर असलेल्या helpline चा वापर करा. अगोदर ई-मेल ने संपर्क करा. (astrologyyesorno@gmail.com
). जरूर असल्यास phone वर बोलू. आणि हो तो सल्ला मोफत मिळेल. कारण हे संशोधन एक समाजसेवा म्हणून हातात घेतले आहे. लक्षात घ्या, जी प्रमुख तत्त्वे अवैध (invalid) म्हणून ठरली ती वापरूनच तर तुमच्या आमच्या पत्रिका बघितल्या जातात. ती वापरूनच तर तुमचे आमचे लग्नाचे निर्णय सांगितले जातात, आणि इतर भविष्य सांगितले जाते. आता तुम्हीच ठरवा ज्योतिषाच्या मागे किती जायचे ते.
माझी जन्मतारीख xyz आहे. तर मी कोणता व्यवसाय करावा ज्याने खूप नफा होईल?
करिअर हि अशी गोष्ट आहे कि चुकीचा निर्णय घेतला तर माणसाचे आयुष्य होत्या चे नव्हते होऊ शकते. म्हणूनच इतक्या महत्वाच्या निर्णयात ज्योतिष विद्येचा वापर करण्या पूर्वी हि विद्या सिद्ध झाली आहे का, ती कितपत खरी आहे याचा शोध घेण्याची जरूर आहे. अहो करिअर मध्ये यशस्वी होणे म्हणजे काय? तर आपल्या जीवन प्रवासामधील वेगवेगळे निर्णय अचूक घेणे. त्यात ज्योतिष आपल्या आयुष्यात कधी, कसे आणि खरंतर वापरायचे का हा हि निर्णय येतोच कि! चला तर मग तो अगोदर कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, सारासार विचार करून घेऊया.
गेले १० वर्षे आमची टीम ज्योतिष हे आहे कि नाही याचे संशोधन करत आहे. त्याविषयी थोडक्यात सांगतो, पण त्यासाठी तुम्हाला थोडे शास्त्रीय, डोक्याला ताण देणारे वाचन करावे लागेल.
हि गोष्ट तुम्हीही कबूल कराल कि ज्योतिष खरे असेल तर अमिताभ बच्चन, रणवीर सिंग याच्या सारख्यांच्या आणि आपल्या पत्रिकेत मोठाच फरक असला पाहिजे. बरोबर? त्या धर्तीवर आम्ही सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत, म्हणजे 742 पत्रिका Celebrities च्या आणि 500 पत्रिका सामान्य लोकांच्या. या दोन्ही संचाना, ज्योतिष शास्त्रात सेलिब्रिटी असण्यासाठी सांगितलेले नियम लावले आणि ते किती लागू पडतात याची तुलना केली. ज्योतिष शास्त्र आणि ते नियम खरे असतील तर Celebrity संचाला ते नियम जास्तीत जास्त लागू पडतील आणि Ordinary संचाला अगदी कमी , बरोबर? बघा समजायला इतका सोपा असा हा प्रयोग आहे. यालाच एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. या प्रयोगात अनेक नियम तपासले, शेकडो गोष्टी तपासल्या आणि हा एकच नाही तर आम्ही असे अनेक प्रयोग केले. या सगळ्या प्रयोगांच्या आधारे मी तुम्हाला खात्री पूर्वक सांगतो या शास्त्रात, त्यांच्या नियमात काहीही तथ्य नाही - हे माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे. हा विषय एवढा मोठा आणि क्लीष्ट आहे कि ते सर्व सविस्तर लिहिणे इथे शक्य नाही. अधिक माहिती साठी भेट द्या - www.AstrologyYesOrNo.com
किंवा तेथे असलेला 'लग्न, करिअर आणि पत्रिका बघणे - एक संशोधन’ हा ब्लॉग वाचा.
आता करिअर line विषयी बोलू. हातात असलेल्या हजारो पत्रिकांचे career line (profession) नुसार वर्गीकरण करून करिअर विषयीचे वेग वेगळे नियम लावून (प्रत्येक जण वेगळे नियम सांगतो - तुम्ही 10 पुस्तके आणि 10 websites बघा, तुम्हाला समजेलच) त्यांची तुलना केली तेव्हा ते नियम सगळ्याच professions च्या पत्रिकांना सारखेच लागू पडलेले दिसले. म्हणजे ते पण अवैधच सापडले. अशा विद्येवर तुम्हाला तुमचे आयुष्य पणाला लावायचे आहे? बऱ्याच वेळा मी हे सांगितल्यावर लोक म्हणतात आम्ही त्यावर सगळे सोडले नाहीये पण just एक guideline आणि opinion घेत होतो. अरे पण ते घेण्यासाठी जरा तरी तथ्य पाहिजे ना त्या विद्ये मध्ये! आज काल बऱ्याच परीक्षा असतात. तुमच्या मनाचा कल कुठे आहे, नैसर्गिक शक्ती कुठली आहे वैगेरे. अशा परीक्षांचा guideline म्हणून वापर करणे बरोबर होईल.
आता माझे राहू द्या. तुम्ही एक छोटा प्रयोग करा. तुम्ही 15-20 पत्रिका गोळा करा आणि त्यांना कुठलीही माहिती न देता professions, नोकरी का business ओळखायला सांगा. 70 % उत्तरे बरोबर आली तर तिप्पट फी देऊन सल्ला घ्या. असे खरेच करू नका, कारण आपल्याला कोणालाही दुखवायचे नाहीये. असे अनेक प्रयोग झाले आहेत आणि अशी परीक्षा ते पास करत नाहीत किंवा द्यायला तयार होत नाहीत, यातच सर्व काही आले आहे. थोड्या लांबलेल्या या उत्तराचा मतितार्थ तुम्ही लक्षात घ्या आणि मग ठरवा तुम्हाला ज्योतिष विद्येचा वापर तुमच्या एवढ्या महत्वाच्या निर्णयासाठी घ्यायचा आहे का.