ज्योतिष विद्या खरी आहे का? या प्रश्नाचे उत्तर एका परिच्छेदात देता येणासारखे नाही. हा विषय क्लिष्ट आहे आणि म्हणूनच त्यात कोणी जात नाही आणि त्यामुळेच तो आपल्या समाजावर पकड घेऊन बसला आहे. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला खरेच हवे असेल तर - थोडे खोल, शास्त्रीय विचार करायची, विश्लेषण करायची आणि वाचण्यासाठी वेळ द्यायची तयारी हवी. बाकी उत्तर शक्य तितके सोपे करायची जबाबदारी माझी.
गेले १० वर्षे आमची टीम ज्योतिष शास्त्राचे इम्पिरिकेल टेस्टिंग म्हणजे परीक्षण करत आहे.
सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद लोकांच्या आणि ३३८ पत्रिका हुशार (Intelligent ) व्यक्तींच्या. या दोन्ही संचाना, ज्योतिष शास्त्रात मतिमंदत्व असण्यासाठी सांगितलेले नियम लावले आणि ते किती लागू पडतात याची तुलना केली. ज्योतिष शास्त्र आणि ते नियम खरे असेल तर मतिमंद संचाला ते नियम जास्तीत जास्त लागू पडतील आणि Intelligent संचाला अगदी कमी , बरोबर? बघा समजायला इतका सोपा असा हा प्रयोग आहे. यालाच एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात.
सगळे मिळून आम्ही ज्योतिष शास्त्राची 22 most fundamental अशी तत्वे तपासली (नीच ग्रहाची शनी मंगळाशी युती / प्रतियोग, ग्रह क्रूर नक्षत्रात, स्थानात पापग्रह वगैरे), पण empirical टेस्टिंग नुसार ती सर्व तत्वे अवैध आढळून आली. वेगवेगळे १३६ मापदंड तपासले. आम्हाला दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. मित्रांनो, या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण 338अधिक 338 अशा 678 पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा. आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून हजारो वर्षांची विद्या खोटी कशी ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका), ज्यात आम्ही लग्नासंबंधींचे ज्योतिष विद्येचे नियम लावले. जसे कि (1) शुक्र नीचेचा आणि शनी मंगल सारख्या पाप ग्रहांच्या कुयोगात, (2) सातव्या घरात पापग्रह, (3) सप्तमेश नीचेचा आणि कुयोगात, ह्यासारखे अनेक नियम. यातही आम्हाला हेच निष्कर्ष मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक, असे अनेक प्रयोग केले. पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच निष्कर्ष मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.
या सर्व संशोधनाचे अनेक research papers international journals मध्ये publish झाले आहेत ज्याची यादी इथे दिली आहे, ती तुम्ही बघू शकता.
जी प्रमुख तत्त्वे अवैध (invalid) म्हणून ठरली ती वापरूनच तर तुमच्या आमच्या पत्रिका बघितल्या जातात. ती वापरूनच तर तुमचे आमचे लग्नाचे, करिअर चे निर्णय सांगितले जातात, आणि इतर भविष्य सांगितले जाते. आता तुम्हीच ठरवा ज्योतिषाच्या मागे किती जायचे ते.
अजून जास्त तपशीलवार माहिती पाहिजे असल्यास - Our computer based solution, How did we test? From where we got Data?