आम्हाला तुमची कुंडली माहित नाहीये. परंतु एक भविष्य आम्ही निश्चित वर्तवतो की आज तुमचे जीवन निश्चित बदलणार.  एका मोठ्या यक्ष प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मिळणार  : ज्योतिष खरच आहे की नाही ?

आपल्याला यश मिळण्या मागे दैव, ग्रह, तारे असतात का, हे  एकदाच कायम साठी समजून घ्या आणि मग लागा कामाला!

आणि हो, आमचा - 'लग्न आणि पत्रिका बघणे - एक संशोधन' हा ब्लॉग बघायला विसरू नका 


ज्योतिष शास्त्र खरे का खोटे?  दहा वर्षाच्या अथक संशोधनानंतर आम्ही या प्रश्नाचे उत्तर मिळवले आहे. रतर या प्रश्नाचा प्रभाव आपल्या समाजावर एवढा मोठा आहे की त्याचा शोध आम्हाला घेणे भाग पडले. विचार करा, आज आपल्याकडे 90 टक्के मॅरेजेस ही अरेंज मॅरेजेस होतात आणि त्यातील 90 टक्के मॅरेजेस मध्ये पत्रिका जुळवल्या शिवाय आपण लग्न करत नाही. हा केवढा मोठा प्रभाव आहे! लग्नच कशाला, व्यवसाय असो की करियर असो या सर्व बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर पत्रिका बघून निर्णय घेतले जातात. आणि ज्योतिष शास्त्राची शास्त्रशुद्ध सत्यता कधीही पडताळून न बघता हे सर्व करोडो लोक वर्षानुवर्ष करत आहेत. याला काय म्हणावे? आणि म्हणूनच आम्ही गेले 10 वर्षे संशोधन करून या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन उत्तर मिळवले आहे. प्रश्न जेवढा अवघड, उत्तर तेवढेच कठीण. म्हणूनच काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण असे करायची जरूर होती. भारतात प्रथमच ज्योतिष शास्त्राची सत्यता कम्प्युटरचा वापर करून आणि हजारो पत्रिकांचा (तुम्ही बरोबर वाचले आहे, खरोखर हजारो पत्रिकांचा) एकत्रित अभ्यास करून हे संशोधन केले आहे. कुठल्याही शास्त्राला सिद्ध होण्यासाठी 'एम्पिरिकल टेस्टिंग' (Empirical Testing) नावाची एक परीक्षा आहे ती  पास करावी लागते. तीच परीक्षा आम्ही या प्रयोगामध्ये केली आहे. यामध्ये आम्ही पत्रिकांचे दोन संच (groups)  केले आणि त्यांची ज्योतिष शास्त्राच्या आधारेच एकमेकाशी तुलना केली. दोन्ही संच (groups) एकमेकाच्या अगदी विरुद्ध असे तयार केले, म्हणजे कॅन्सर विरुद्ध कॅन्सर नसलेले, घटस्फोट विरुद्ध दीर्घ वैवाहिक आयुष्य असलेले, मतिमंद विरुद्ध हुशार, आणिक असे कितीतरी... मग आम्ही ज्योतिष शास्त्रातील ज्याला आपण मूळ तत्व (fundamental principles) म्हणू, त्यांना घेऊन त्त्यांना या दोन संचातील पत्रिका ना लावून त्यांची तुलना केली. आणि ही तुलना ज्योतिष शास्त्राप्रमाणे च केली. म्हणजे प्रत्येक ग्रहाची, घराची किंवा आणि ज्याला ते भावेश म्हणतात त्याची निगेटिव्हिटी (ते किती बिघडलेले आहेत) घेऊन तुलना केली. मग पॉझिटिव्हिटी घेतली आणि त्याची पण तुलना केली. असे बरेच मापदंड घेऊन त्यांची तुलना केली आणि या यक्ष प्रश्नाचे उत्तर मिळवले. हे काम एका उच्च शिक्षित अशा टीम ने (Ph. D. Science, Ph. D. Statistics, Analytics experts) ज्योतिष शास्त्राचा 20 वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या संशोधकानं बरोबर अनेक प्रयोग करून पूर्ण केले. हा प्रोजेक्ट आम्ही आमच्या स्वतहाच्या निधी मधून केवळ समाजाला उपयोगी पडेल असे काम करायचे या भावनेने पूर्ण केलेला आहे. ज्योतिष हा विषय क्लिष्ट आहे. त्यामुळे सर्व सामान्य माणूस ते खरे का खोटे हे पहाण्याच्या फंदात पडत नाही. म्हणूनच आम्ही येथे एकदम सोप्या आणि कोणालाही समजेल अशा भाषेत हा विषय आणि केलेले काम, याची एक गोष्ट सांगणार आहोत. सर्व प्रथम खाली दिलेले व्हिडिओ बघा, वेबसाईट वर एक फेरफटका मारा आणि मग तुमचे तुम्हीच ठरवा - तुम्हाला ज्योतिषाच्या शिवाय (Astrology free) असे आयुष्य घालवायचे आहे का त्यावर अवलंबून जगायचे आहे. दैव वादी व्हायचे आहे का प्रयत्न वादी हे ही ठरवा.

ज्याला आपण यश (success) म्हणतो ते अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयातूनच येत असते. तेव्हा ज्योतिष शास्त्रा शिवाय (Astrology free) जीवन जगणे आणि आपल्या घरातील लोकांना तसे जगायला प्रवृत्त करणे हे आयुष्यातील खूप मोठे पाऊल आहे.  

आणि म्हणूनच आम्ही वर तुमचे भविष्य वर्तवले होते की आज तुमचे जीवन निश्चित बदलणार.

शुभेच्छा !!