लातूर जिल्हा कृषि विभाग सर्वसाधारण माहीती
लातूर जिल्हा कृषि विभाग सर्वसाधारण माहीती
लातूर जिल्हा
उपविभाग
2
तालुके
10
ज जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी
1
कृषि चिकीत्सालय
3
तालुका बिजगुणन केंद्र
2
खरीप गावे
826
रब्बी गावे
117
सरासरी पर्जन्यमान
788.3 मिमी
एकुण भौगोलीक क्षेञ
7.18 लक्ष हेक्टर
लागवडीलायक क्षेञ
6.65 लक्ष हेक्टर
खरीप सरासरी क्षेञ
6.25लक्ष हेक्टर
रब्बी सरासरी क्षेञ
1.95 लक्ष हेक्टर
खातेदार संख्या (कृषि गणना 2015-16 नुसार)
434739
अल्संख्या
190447
अत्यल्प खातेदार संख्या
148729
बहुभुधारक खातेदार संख्या
95563
लातूर जिल्ह्यात कृषि विभागाचे दोन उपविभागीय कृषि अधिकारी, लातूर व उदगीर असुन प्रत्येक उपविभागांतर्गत पाच तालुके आहे. एक जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा, तीन कृषि चिकीत्सालय, व दोन तालुका बिजगुणन केंद्र आहे तसेच दोन फळरोपवाटीका आहेत.
उपविभाग लातूर अंतर्गत 13 मंडळ कृषि अधिकारी कार्यालय आहेत ते खालील प्रमाणे
तालुका लातूरः- लातूर, मुरुड, गातेगाव,
तालुका औसाः- औसा, लामजना, बेलकुंड, किल्लारी
तालुका रेणापुरः- रेणापुर, पानगाव
तालुका निलंगाः- निलंगा, कासार शिरशी, औराद शहाजनी
तालुका शिरुर अनंतपाळः- शिरुर अनंतपाळ
उपविभाग उदगीर अंतर्गत 10 मंडळ कृषि अधिकारी कार्यालय आहेत ते खालील प्रमाणे
तालुका उदगीरः- उदगीर, वाढवणा बु., देवर्जन
तालुका अहमदुपरः- अहमदपुर, किनागव, शिरुर ताजबंद
तालुका चाकुरः- चाकुर, घरणी
तालुका जळकोटः- जळकोट
तालुका देवणीः- देवणी
कृषि विभागामार्फत 2019-20 मध्ये खालील योजना राबवल्या गेल्या आहेत.
विविध योजने अंतर्गत नाविन्यपुर्ण बाबीच्या मागणीचा तपशील
-: जिल्ह्यामध्ये राबविण्याच्या नाविण्यपुर्ण बाबीचा तपशील खरीप 2019 :-
प्रधानमंत्री फ़सल बिमा योजने अंतर्गत-
पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना -
(अंबिया बहार 19-20 करिता)
कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपीकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होवुन उत्पादनात घट येते. त्यामुळे शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते.
1. या योजनेत कोणती फळपीके समाविष्ट आहेत-
संत्रा,केळी, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, द्राक्षे ही 7 फळपीके.
ही योजना महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्यात येते. प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी महावेध प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आलेली आहेत. या हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वारा वेग,आर्द्रता इ . माहिती स्वयंचलित रित्या नोंदवली जाते. या माहिती च्या आधारे अवेळी पाउस, कमी जास्त तापमान, वारा वेग त्याच प्रमाणे गारपीट या हवामान धोक्यां पासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी यांना फळपिकांसाठी विमा संरक्षण मिळते. सदर हवामान धोके (Trigger) लागू झाल्यानंतर विमा धारक शेतकरी यांना नुकसान भरपाई मिळते.
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
2. योजनेची वैशिष्टे-
i) ही योजना अधिसूचीत केलेल्या क्षेत्रातील अधिसूचीत फळ पिकां साठी आहे.
ii) योजना कर्जदार शेतकरी यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे.
iii) खातेदारांचे व्यतिरीक्त कुळा ने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.
3. विमा संरक्षित रक्कम (प्रती हेक्टर)-
संत्रा- रु.77000/-
केळी- रु. 132000/-
4. विमा हप्ता किती भरावा लागेल (प्रती हेक्टर)-
विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के.
संत्रा- रु. 3850/-
केळी- रु. 6600/-
गारपीट या हवामान धोक्या साठी चा सहभाग ऐच्छिक राहिल व या करिता अतिरिक्त विमा हप्ता रक्कम भरावी लागेल.
5. विमा हप्ता भरण्याचा अंतीम दिनांक-
केळी- 7 नोव्हेंबर 2019
संत्रा- 30 नोव्हेंबर 2019.
6. योजनेचा हप्ता कुठे भरावा-
आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था, तसेच www.pmfby.gov.in या वेब साईट वर ऑनलाईन पद्धतीने.
सदर योजना यवतमाळ जिल्ह्यातील खालील महसूल मंडळांना लागू आहे.-
केळी पिका साठी महसूल मंडळे -
उमरखेड तालुक्यातील उमरखेड मंडळ व महागाव तालुक्यातील महागाव व मोरथ ही दोन महसुली मंडळे.
संत्रा पिकासाठी महसूल मंडळे-
कळंब तालुका- कळंब , कोठा, सावरगाव, जोडमोहा, पिंपळगाव.
राळेगाव तालुका- राळेगाव, झाडगाव.
पुसद तालुका- पुसद, जांब बाजार , वरूड.
उमरखेड तालुका- उमर खेड, मुळावा, ढाणकी, विडूळ, चातारी.
महागाव तालुका- मोरथ, गुंज, काळीदौलत.
दिग्रस- दिग्रस, कलगाव, तिवरी, तूपटाकळी.
दारव्हा तालुका- दारव्हा, महागाव
नेर तालुका- माणिकवाडा, वटफळी, शिरसगाव, मालखेड.
आर्णी तालुका- आर्णी, जवळा.
बाभुळगाव तालुका- घारफळ
7. संत्रा पिकासाठी हवामान धोके प्रमाणके(Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई-
i) अवेळी पाउस (1 डिसेंबर 2019 ते 15 जानेवारी 2020)- सलग 7 दिवसात एकुण 30 मिमी किंवा त्यापेक्षा जास्त पाउस झाल्यास रु.19250/- देय होइल.
ii) कमी तापमान ( दि.16 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी 2020)- सलग 3 दिवस 12 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु.19250/- देय होइल.
iii) जास्त तापमान (1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020) - सलग 3 दिवस 39.5 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.19250/- देय होइल.
iv) जास्त तापमान (1 एप्रिल 2020 ते 31 मे 2020) - सलग 3 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.19250/- देय होइल.
संत्रा पिकासाठी एकुण विमा संरक्षण - रु. 77000/-.
गारपीट साठी - (1 जानेवारी 2020 ते 30 एप्रिल 2020 )- विमा संरक्षित रक्कम- रु. 25667/-
विमाधारक शेतकरी यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपीकाची माहिती विमा कंपनीस/संबंधीत मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल.
संत्रा पिकासाठी एकुण विमा संरक्षित रक्कम (नियमित- रु.77000+ गारपीट- रु.25667)- एकुण रु.102667/- प्रती हेक्टर.
8.केळी पिकासाठी हवामान धोके प्रमाणके (Triggers), कालावधी व मिळणारी नुकसान भरपाई-
i) कमी तापमान -
( 1 नोव्हेंबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2020)- सलग 3 दिवस 8 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास नुकसान भरपाई रु.25000/- देय होइल.
ii) वेगाचा वारा (1 मार्च 2020 ते 31 जुलै 2020) -
या कालावधी मध्ये 40 किमी प्रती तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारा वाहुन नुकसान झाल्यास विमाधारक शेतकरी यांनी नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त केळी पीकाची माहिती विमा कंपनीस/कृषी विभाग यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल. कमाल नुकसान भरपाई रु.66000/-.
iii) जास्त तापमान (1 एप्रिल 2020 ते 30 एप्रिल 2020) -
या कालावधी मध्ये सलग 5 दिवस 42 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु.33000/- देय होइल.
iv) जास्त तापमान (1 मे 2020 ते 31 मे 2020) -
या कालावधी मध्ये सलग 5 दिवस 45 डिग्री सेल्सीयस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. 41000/- देय होइल.
एकुण विमा संरक्षण- रु.132000/-
v) गारपीट साठी- (1 जानेवारी 2020 ते 30 एप्रिल 2020 ) -
विमा संरक्षित रक्कम- रु. 44000/-
विमाधारक शेतकरी यांनी गारपीट मुळे नुकसान झाल्यापासून 48 तासात नुकसानग्रस्त फळपीकाची माहिती विमा कंपनीस/संबंधीत मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर विमा कंपनी, महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतींने वैयक्तीक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चीत करेल.
केळी पिकासाठी एकुण विमा संरक्षित रक्कम (नियमित- 132000/- + गारपीट 44000)- रु. 176000/- प्रती हेक्टर.
प्रधानमंत्री पिक विमा योजना रबी 2019
1.योजनेची वैशिष्ट्ये-
ही योजना कर्जदार शेतकरी यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छीक स्वरुपाची आहे.
खातेदारा व्यतिरीक्त कुळाने अगर भादेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा या योजनेत सहभागी होवू शकतात.
या योजनेत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी यांना विमा संरक्षण मिळते.
2.जोखमीच्या बाबी-
i) *हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान*-
अपुरा पाउस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकाची अधिसूचीत क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होवू न शकलेल्या क्षेत्रासाठी,पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहिल.
सदर विमा संरक्षणा ची बाब ही विमा अधिसुचीत क्षेत्रातील फक्त मुख्य पिकांना लागू राहिल.
विमा अधिसूचीत क्षेत्रावर मुख्य पिक निश्चीत करताना जिल्हा/तालुकास्तरावरील एकुण पिकाखालिल क्षेत्रापैकी(Gross Cropped Area) किमान 25 टक्के पेरणी क्षेत्र या मुख्य पिकाखाली असणे आवश्यक राहिल.
नुकसान भरपाई ही विमा संरक्षित रकमेच्या 25 टक्के मर्यादे पर्यंत राहिल व सदर क्षेत्राचे विमा संरक्षण संपुष्टात येइल
ii) *हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे झालेले नुकसान*-
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्व साधारण काढणीच्या 15 दिवस आधिपर्यंत, पूर, पावसातिल खंड, दुष्काळ इ .बाबींमुळे अधिसूचीत
विमा क्षेत्रातील अधिसुचित *पिकाचे अपेक्षीत उत्पन्न* हे त्या पिकाच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा कमी असेल तर सर्व अधिसूचीत क्षेत्र हे सदरच्या मदती साठी पात्र राहिल.
अपेक्षीत नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के मर्यादे पर्यंत आगाऊ रक्कम विमा धारक शेतकरी यांना देण्यात येइल. ही मदत अंतीम येनारया नुकसान भरपाई तून समायोजित करण्यात येइल.
जिल्हास्तरीय सनियन्त्रण समिती ही विमा कंपनीचे अधिकारी व राज्य शासनाचे अधिकारी यांची संयुक्त समिती गठीत करील आणि ही समिती पिक नुक सान सर्वेक्षण करिता कार्यवाही करेल.
जर प्रतिकूल परिस्थिती ही सर्वसामान्य काढणी वेळेच्या 15 दिवस अगोदर आली तर सदर तरतूद लागू राहणार नाही व नुकसान भरपाई देय होणार नाही.
नुकसान भरपाई ठरविण्याचे सूत्र-
उंबरठा उत्पन्न-अपेक्षीत उत्पन्न =----‐----------------------------------x संरक्षित रक्कम
उंबरठा उत्पन्न
iii) पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रिवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ.बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट (हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चीत करणे)-
iv) *नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान* -( वैयक्तीक स्तरावर)-
ज्या पिकांची काढ णी नंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवनी करणे आवश्यक असते असा कापणी/काढणी नंतर सुकवणी साठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणी नंतर दोन आठवड्याच्या आत (14दिवस) गारपीट, चक्रिवादळ, चक्रिवादळा मुळे आलेला पाउस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येइल.
या तरतूदी अंतर्गत अवकाळी पाउस म्हणजे त्या जिल्ह्याचे त्या महिन्याचे दिर्घ कालीन पावसाचे सरासरीच्या 20 टक्केपेक्षा अधिक पाउस व वैयक्तीक स्तरावर पंचनाम्यामध्ये आढळून आलेले नुकसान असेल तरच ही जोखीम लागू होइल.
जास्तीत जास्त दायीत्व हे बाधित पिकाच्या क्षेत्राच्या विमा संरक्षित रकमेएवढे राहील.
विमा संरक्षण घेतलेल्या शेतकरी यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सुचना विमा कंपनी, बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ़्री नंबर द्वारे देण्यात यावी.
नुकसान भरपाई चा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक त्या कागदपत्रांसह (7/12, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ .) विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे.
जर अधिसूचीत पिकाचे बाधित क्षेत्र हे एकुण पेरणी क्षेत्राच्या 25 टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणी पश्चात नुकसान भरपाई स पात्र ठरतील. संयुक्त समितीने विहित प्रमाणात केलेल्या नमुना सर्वेक्षणाच्या आधारे विमा कंपनी मार्फत नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येइल.
पिक नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समिती मार्फत करण्यात येइल ज्यात विमा कंपनीचा पर्यवेक्षक, तालुका स्तरावरील कृषी अधिकारी आणि संबंधीत शेतकरी यांचा समावेश असेल.
हंगामाच्या शेवटी प्राप्त होणार्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे निश्चीत होणारी नुकसान भरपाई जर या तरतूदी अंतर्गत मिळालेल्या नुकसान भरपाई पेक्षा जास्त असेल तर हंगामाच्या शेवटी फरकाची रक्कम शेतकरी यांना अदा करण्यात येइल.
v) *स्थानिक नैसर्गिक आपत्तिमुळे होणारे नुकसान*-(वैयक्तीक स्तरावर)-
या तरतूदी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र हे पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढुन किंवा ओसंडून वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन शेत दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे झालेले नुकसान, गारपीट, भुस्खलन, ढगफुटी अथवा विज कोसळल्यामूळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तिमुळे होणार्या नुकसानीस वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येइल.
जास्तीत जास्त दायीत्व हे बाधित पिकाच्या क्षेत्राच्या विमा संरक्षित रकमेएवढे राहील.
विमा संरक्षण घेतलेल्या शेतकरी यांनी सर्वे नंबर नुसार बाधित पिक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सुचना विमा कंपनी, बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ़्री नंबर द्वारे देण्यात यावी. नुकसान भरपाई चा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक त्या कागदपत्रांसह (7/12, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ .) विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे.
जर बाधित क्षेत्र हे अधिसुचित विमा क्षेत्राच्या 25 टक्के पर्यंत असेल तर वैयक्तीक स्तरावर व 25 टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील पात्र शेतकरी (विमा योजनेत सहभागी झालेले व पिकाचे नुकसान विहित वेळेत पुर्व सुचना दिलेले) नुकसान भरपाई स पात्र ठरतील.
पिक नुकसानीचे सर्वेक्षण संयुक्त समिती मार्फत करण्यात येइल ज्यात विमा कंपनीचा पर्यवेक्षक, तालुका स्तरावरील कृषी अधिकारी आणि संबंधीत शेतकरी यांचा समावेश असेल.
हंगामाच्या शेवटी प्राप्त होणार्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे निश्चीत होणारी नुकसान भरपाई जर या तरतूदी अंतर्गत मिळालेल्या नुकसान भरपाई पेक्षा जास्त असेल तर हंगामाच्या शेवटी फरकाची रक्कम शेतकरी यांना अदा करण्यात येइल.
3.आवश्यक कागदपत्रे-
7/12, आधार कार्ड,बँक पासबूक प्रत, पिकाची पेरणी बाबत स्वयंघोषना पत्र, भादेपट्टा करार असल्यास करारनामा/सहमतिपत्र.
4. योजनेचा हप्ता कुठे भरावा-
आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक, प्राथमिक कृषी पत पूरवठा सहकारी संस्था, तसेच www.pmfby.gov.in या वेब साईट वर ऑनलाईन पद्धतीने.
5. पिक विमा कोणत्या पिकांसाठी लागू आहे-
गहू(बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रबी कांदा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग.
6. विमा हप्ता किती भरावा लागेल (प्रती हेक्टर)-
गहू(बागायत)- 525 रु..
हरभरा- 360 रु.
उन्हाळी भुईमूग- 570 रु.
7. योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम तारीख-
गहू(बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रबी कांदा - 31 डिसेंबर 2019.
उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग- 1 एप्रिल 2020
8. विमा संरक्षित रक्कम-
गहू(बागायत)- 35000 रु.
हरभरा- 24000 रु.
उन्हाळी भुईमूग- 38000 रु.
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, विज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इ.नैसर्गिक आपत्तिमूळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बरेच शेतकरी यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवुन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
1. पात्रता-
महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदी नुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई,वडिल, शेतकर्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकुण दोन जण.
2. नुकसान भर्पाइची रक्कम-
अ.-अपघाती मृत्यू- रु.2 लाख.
ब.अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.2 लाख
क- अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 हात किंवा एक पाय निकामी होणे- रु.1 लाख.
3. विमा हप्ता भरावा लागत नाही-
सर्व शेतकरी यांची विमा हप्त्याची रक्कम (प्रती शेतकरी रु.32.23 रु) शासनामार्फत विमा कंपनीस भरण्यात येते. त्यामुळे शेतकरी यांनी विमा हप्ता भरण्याची गरज नाही.
4. विमा पॉलिसी कालावधी-
10.12.2019 ते 9.12.2020
5. सदर योजने अंतर्गत लाभास पात्र शेतकर्याने /शेतकर्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजने अंतर्गत लाभास पात्र असणार नाही.
6. आवश्यक कागदपत्रे-
अ) लाभ घेन्याकरिता दावा दाखल करताना सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे-
i) विहित नमुन्यातील पुर्व सुचनेचा अर्ज (सहपत्र क्र.1) पुर्व सूचने सोबत आवश्यक कागद पत्रे-
a)7/12 उतारा किंवा 8अ.(मुळ प्रत)
b) मृत्यू दाखला (स्वयं साक्षांकीत प्रत)
c)प्रथम माहिती अहवाल
d)विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, उंचावरुन पडून झालेला मृत्यू, सर्प दंश/ विंचू दंश व अन्य कोणतेही अपघात यासाठी प्रथम माहिती अहवाल किंवा पोलिस पाटील अहवाल
e)घटनास्थळ पंचनामा (स्वयं साक्षांकीत प्रत)
f) वयाचा दाखला (नसल्यास शपथपत्र)
सदरचा दावा दुर्घटने नंतर शक्यतो 45 दिवस कालावधीत नोंदवण्यात यावा.
ii) खातेदार शेतकरी कुटुंबाची शिधापत्रिका (राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकीत केलेली)
आ) प्रस्तावा सोबत सादर करावयाची आवश्यक कागद पत्रे-
i) ज्या नोंदी वरुन अपघातग्रस्त शेतकर्याचे नाव 7/12 वर आले असेल अशी संबंधीत फेरफार नोंद (गाव नमुना नं.6 ड) मुळ उतारा अथवा फेर फार नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.
ii) शेतकर्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्या कडील गाव नमुना नं. 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. मुळ उतारा अथवा वारसाच्या नोंदी बाबत सक्षम प्राधिकृत अधिकार्याने दिलेले प्रमाणपत्र.
iii) विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर केलेले प्रतिज्ञापत्र (प्रपत्र-ग). (मुळ प्रत.)
iv) याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरुपा नुसार पुराव्यादाखल सादर करावयाची प्रपत्र-क मधील कागद पत्रे.
1) रस्ता/रेल्वे अपघात- इन्क़्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचा मोटार वाहन परवाना.
2) पाण्यामध्ये बुडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल व क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
3) जंतू नाशक अथवा अन्य कारणा मुळे विषबाधा- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल).
4) विजेचा धक्का अपघात / विज पडून मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल.
5) खून- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, रासायनीक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र.
6) उंचावरून पडून झालेला मृत्यू- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
7) सर्प दंश/ विंचू दंश- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, वैद्यकीय उपचारा पुर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकार्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.
8) नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, नक्षलवादी हत्ये संदर्भातील कार्यालयीन कागदपत्र.
9) जनावरांच्या चावण्यामूळे रेबिज होवुन मृत्यू- औष धोपचाराची कागदपत्रे.
10) जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवुन मृत्यू-इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल
11) जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवुन शव न मिळणे- क्षतीपूर्ती बंधपत्र आवश्यक.
12) दंगल- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
13) अन्य कोणतेही अपघात- इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मोर्टेम अहवाल, पोलिस अंतीम अहवाल.
14) अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे- अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतीम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी, प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्र/जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.
वरिल 1) ते 13) मधील कागदपत्र मुळ किंवा राजपत्रीत अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले अथवा स्वसाक्षांकीत (घोषणापत्र-ब नुसार) असल्यास ग्राह्य धरण्यात येइल.
मृत्युच्या कारणाची नोंद सक्षम प्राधिकार्याने स्पष्ट केली असल्यास रासायनीक विश्लेषण अहवाल(व्हिसेरा अहवाल) या कागद पत्रांची आवश्यकता राहणार नाही.
4. अर्ज कुठे करावा- तालुका कृषी अधिकारी कार्या लयात.
a)विमा दाव्याच्या अनुषंगाने पुर्व सुचना अर्ज विहित कागद पत्रांसह ज्या दिनांकास तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दाखल/प्राप्त होइल व संगणक प्रणालीमध्ये अपलोड होइल त्या दिनांकासच तो विमा कंपनीस प्राप्त झाला आहे असे समजण्यात येइल.
b)विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह योजनेअंतर्गत विमा संरक्षित कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे तसेच योजनेच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांसाठी योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेले प्रस्ताव स्वीकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील.
शिवाय योजनेचा चालू वर्षाचा मंजूर कालावधी संपल्या नंतर 90 दिवसां पर्यंत संगणक प्रणाली मध्ये नोंद झालेल्या पुर्व सुचना अर्जान्वये तालुका कृषी अधिकारी यांचे कडे प्राप्त होणारे विमा प्रस्तावसुद्धा विमा पॉलिसी चा कालावधी संपल्याच्या दिवसापासून 365 दिवसां पर्यंत स्विकारणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. मात्र सदर कालावधी नंतर कोणताही प्रस्ताव स्विकारला जाणार नाही. तसेच या संदर्भात ग्राहक मंच किंवा इतर निर्णय/आदेश शासनावर बंधनकारक राहणार नाहीत.
5. विमा कंपनी- दि. युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी ली.
ब्रोकर कंपनी- जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. नागपुर.
अधिक माहिती साठी -
शासन निर्णय दि.31.8.2019
शासन निर्णय दि.19.9.2019
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी-
अ. पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकरी यांना बियाणे खते किटक नाशके तसेच इतर निविष्ठा खरेदी कराव्या लागतात. शेतकरी यांच्या या आर्थिक गरजांना पुरक म्हणून केंद्र शासनामार्फत शेतकरी कुटुंबाला प्रती वर्ष 6000 रु थेट शेतकरी कुटुंब यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. (शेतकरी कुटुंब म्हणजे पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील मुले).
ब. शेतकरी कुटुंबात खालील प्रमाणे एक किंवा अधिक सदस्य असल्यास त्या कुटुंबास या योजनेचा लाभ मिळनार नाही-
1) आजी/माजी संवैधानीक पद धारण करणारे
2) आजी व माजी मंत्री/राज्य मंत्री .आजी/माजी लोकसभा/राज्य सभा/विधान सभा/ विधान परिषद सदस्य. आजी/माजी महानगर पालिकेचे महापौर. आजी/माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.
3)सेवेत असणारे/निवृत्त झालेले सर्व अधिकारी/कर्मचारी. (वर्ग-4 कर्मचारी वगळून).
4) सर्व निवृत्ती वेतन धारक ज्यांचे उत्पन्न रु.10000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (वर्ग-4 कर्मचारी वगळून).
5. सर्व व्यक्ती ज्यांनी मागिल कर निर्धारण वर्षी इन्कम टैक्स भरलेला आहे.
6) नोंदणी कृत व्यावसायिक उदा. डॉक्टर्स, इंजिनीअर, वकील, लेखापाल, आर्किटेक्ट.
या योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता ठरवण्यासाठी अंतीम दिनांक- 1 फेब्रुवारी 2019. या तारखे नंतर पुढिल 5 वर्षे या पात्रता यादीत बदल केला जाणार नाही. मात्र खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर वारस पात्र राहिल.
* PM KISAN योजना *
या योजनेअंतर्गत आपला 2000 रुपयांचा हप्ता जमा झाला किंवा नाही हे पाहण्याकरिता खालील लिंकचा वापर करा....
http://www.pmkisan.gov.in/BeneficiaryStatus/BeneficiaryStatus.aspx#
यादी पाहण्यासाठी-
प्रधानमंत्री किसान मानधन योजना-
या योजनेत शेतकरी यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रु. पेन्शन मिळते.
1. कोण अर्ज करु शकतो-
18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टर पर्यंत जमीन असणारे सर्व शेतकरी.
2. अर्ज कुठे करावा-
आपले सरकार सेवा केंद्रावर.
योजना ऐच्छिक आहे.
अर्ज करताना आपले सरकार सेवा केंद्रावर कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
3. विमा हप्ता-
आपल्या वयानुसार रु.55 ते 200 दरमहा विमा हप्ता लागेल.
आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर विमा हप्ता यामधून थेट कपात होणार व शेतकरी यांना विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.
4.आवश्यक कागदपत्रे-
7/12, 8अ, आधार कार्ड, बँक पासबूक प्रत.
5.पेन्शन किती मिळेल-
वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रु.पेन्शन मिळते. पेन्शन सुरु झाल्यानंतर लाभार्थिचा मृत्यू झाल्यास पत्नीस 50 टक्के म्हणजेच रु.1500 दरमहा पेन्शन मिळणार.
जर लाभार्थिचा 60 वर्षे वयाआधिच मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी/पतीस ही योजना पुढे सुरु ठेवता येते किंवा योजनेतून बाहेर पडता येते. योजनेतून बाहेर पडल्यानंतर जमा झालेले पैसे व्याजासहित परत मिळनार. प्रधानमंत्री किसान मानधन योजना