भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना - सन २०१९-२०
भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना - सन २०१९-२०
अ .लाभार्थी पात्रता-
1) शेतकरी यांचे स्वत:चे नावे 7/12 असणे आवश्यक.
2) जर 7/12 उतारावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडी साठी संमती पत्र आवश्यक.
3) 7/12 उतारा वर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.
4) ज्या शेतकरी यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य व त्यानंतर अन्य शेतकरी यांचा विचार करण्यात येइल (कुटुंबाची व्याख्या- पती पत्नी व अज्ञान मुले).
ब. क्षेत्र मर्यादा-
किमान 0.20 हे. व कमाल 6.00 हे. पर्यंत लाभ घेता येइल.
क. अनुदान मर्यादा -
100 टक्के.
अनुदान हे 3 वर्षाच्या कालावधीत मिळनार.
प्रथम वर्षी 50 टक्के, दुसरे वर्षी- 30 टक्के, व तीसरे वर्षी- 20 टक्के.
ड. अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी.
इ. लागवड कालावधी-
जून ते मार्च.
शेतकरी यांना आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड करता येइल.
शेतकरी याना फळबाग लागवडी साठी कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रिय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवाना धारक रोपवाटीकेतून कलमे रोपे खरेदी करता येतिल.
तात्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी फळबाग लागवड करावी.
ई ) लागवड अंतर व मिळणारे अनुदान प्रती हेक्टर-
आंबा कलमे (10x10 मी)- 53900 रु.
आंबा कलमे(5x5 मी)- 102530 रु.
पेरु कलमे (6x6 मी)- 62472 रु.
सन्त्रा मोसंबी कागदी लिंबू कलमे (6x 6मी)- 62578 रु.
सिताफळ कलमे(5x 5 मी)-72798 रु.
चिकू कलमे- 52355 रु.
डाळिंब कलमे(4.5x3 मी)- 107783 रु.
फ) अधिक माहिती साठी-
वैयक्तीक लाभार्थ्याच्या शेतावर, शेताच्या बांधावर व पडीत शेत जमिनिवर फळबाग लागवड-
अ) लाभार्थी पात्रता-
1) अनुसूचित जाती
2) अनुसूचित जमाती
3) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
4) भुसुधारक योजनेचे लाभार्थी
5) इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
6) कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार-
i.लहान शेतकरी (1 हेक्टर पेक्षा जास्त परंतू 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले) (जमीन मालक व कूळ)
सिमांत शेतकरी
ii. सिमांत शेतकरी( 1 हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी) (जमीन मालक व कूळ).
7) अनुसूचित जमातिचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती.
8) मग्रारोहयो साठी जॉब कार्ड धारक वरिल 1 ते 7 प्रवगातील कोणतीही व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
9) इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कूळ कायद्या खाली येत असल्यास व 7/12 वर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात येते.
ब) अर्ज कुठे करावा -
तालुका कृषी अधिकारी कार्यलयात.
क) कलमे रोपे खरेदी कोठून करावीत -
1.कृषी विभागाच्या रोपवाटीका
2.कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका
3.खाजगी शासन मान्य रोपवाटिका
4.मग्रारोहयो अंतर्गत ग्रामपंचायतीच्या रोपवाटिका
5.सामाजिक वनीकरण विभाग किंवा अन्य शासकीय रोपवाटिका
ड ) योजनेत समाविष्ट फळपीके -
1)आंबा कलमे 2) आंबा रोपे 3) काजू कलमे 4) चिकू कलमे 5) पेरू कलमे 6) डाळिंब कलमे 7) सन्त्रा कलमे 8) मोसंबी कलमे 9) लिंबू कलमे 10) नारळ रोपे 11) बोर रोपे 12) सिताफळ रोपे 13) सिताफळ कलमे 14) आवळा रोपे 15) आवळा कलमे 16) चिंच रोपे 17) कवठ रोपे 18) जांभूळ रोपे 19) कोकम कलमे 20) फणस रोपे 21) फणस कलमे 22) अंजीर कलमे 23) सुपारी 24) कोकम रोपे 25) बांबू रोपे 26) करंज रोपे 27) लिंबू रोपे 28) नारळ रोपे 29) साग रोपे 30) गिरिपुष्प रोपे 31)सोनचाफा रोपे 32) कडीपत्ता रोपे 33)कडूलिम्ब रोपे 34) सिंधू रोपे 35) शेवगा रोपे 36)हादगा रोपे 37) जट्रोफ़ा रोपे 38) करंज व इतर औषधी वनस्पती (अर्जुन, असन, अशोक, बेहडा, बेल, हिरडा , टेटू,डीकेमाली, रक्त चंदन, रिठा, लोध्रा, आइरन, शिवन, गुग्गुळ, वावडिंग, बिब्बा रोपे इ.)
इ ) फळपीक निहाय प्रती हेक्टर मापदंड (रु.) -
1) सन्त्रा, मोसंबी, लिंबू कलमे (6x6मी) - 132278.
2) आवळा रोपे (7x7) - 90602
3) डाळिंब कलमे(5x5) - 145864
4) आंबा कलमे(10 x10) - 146595
5) पेरू कलमे(6x6) - 118673
6) सिताफळ रोपे - 116747
7) फणस रोपे(10x10) - 78495
8) जांभूळ रोपे(10x10) - 80304
9) चिंच रोपे(10x10) - 80304
10) बांबू रोपे (5x5) - 78483.
ई ) लागवड कालावधी -
जुन ते मार्च.
राष्ट्रिय फलोत्पादन अभियान अंतर्गत सामुदायिक शेततळे
शेततळे अस्तरिकरण -
1. शेततळ्याचे प्लास्टीक फिल्म ने अस्तरिकरण करण्यासाठी शेतकरी यांना 50 टक्के, जास्तीत जास्त रु.75000 इतके अनुदान देण्यात येते.
हे अनुदान प्रधानमंत्री कृषी सिन्चाई योजना ( other interventions) , तसेच राष्ट्रिय फलोत्पादन अभियान यामधून देण्यात येते.
2.अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी कार्यालय.
अ. योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -
1. लाभ हा शेतकरी समूहाला देय आहे.
2. लाभार्थी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. तसेच त्यांचे जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असावेत .
3. सामुदायिक शेततळे २ अथवा अधिक लाभार्थ्याने करणे आवश्यक आहे.
4. जेवढे क्षेत्र लाभार्थी समूहाकडे असेल तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमतेचे सामुदायिक शेततळे घेता येईल.
5. शेततळ्यातील पाणी वापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल लाभार्थींमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करावा.
6. शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे.
ब) अर्ज कुठे करावा - इच्छुक शेतकऱ्यांनी https//hortnet.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
क) आवश्यक कागदपत्रे - 7/12, 8 अ, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बैंक खाते पासबूक च्या प्रथम पानाची छायांकीत प्रत, विहित नमुन्यातील हमिपत्र, संवर्ग प्रमाणपत्र(अजा/अज शेतकरी यांचे साठी). ऑनलाईन नोंदणी करतानाच ही कागदपत्रे अपलोड करावीत.
ड) पुर्वसंमती व करावयाची कामे-
तालुका कृषी अधिकारी यांचे कडून पुर्व संमती प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसाचे आत वरिल कागद पत्रां सह प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करावा.
पुर्वसंमती मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत काम सुरु करावे व 4 महिन्याच्या आत पुर्ण करावे.
शेततळे खोदाई, अस्तरिकरण, आणि कुंपण करणे इ. कामे झाल्यानंतर संबंधीत कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांना कळवावे.
पुर्व संमती मिळाल्यानंतर शेतकरी बँकेचे कर्ज घेऊ शकतील.
शेतकरी यांना कर्ज मंजूर करण्यात अडचण असल्यास शेतकरी यांचे संमतीने अनुदानाची रक्कम बँक कर्ज खात्यात जमा करण्याची हमी तालुका कृषी अधिकारी देतील.
शेततळ्यासाठी BIS Standard 500 मायक्रॉन रीइनफोर्सड जिओ मेंबरेन फिल्म IS 15351:2015 TypeII या दर्जाची वापरणे आवश्यक आहे. शेतकरी यांना अधिकृत फिल्म पुरवठा दारां ची यादी तालुका कृषी अधिकारी हे उपलब्ध करुन देतील. शेतकरी यांना त्यांच्या पसंती नुसार विहित दर्जाच्या अस्तरी करणासाठी वापरावयाच्या फिल्म चे उत्पादक निवडण्याचा अधिकार राहिल.
इ ) अनुदान वितरण-
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी स्तरावरुन देय अनुदान pfms प्रणाली द्वारे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येइल.
शेततळे खोदकाम , अस्तरिकरण व तार कुंपण ही सर्व कामे पुर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात अनुदान देण्यात येइल.
मंजूर आकारमाना पेक्षा मोठे शेततळे खोदल्यास अधिकचा खर्च शेतकरी स्वत: करतील.
प्लास्टीक फिल्म चा पुरवठा दर रु.77 प्रती चौ.मी. आणि फिल्म बसविण्यासाठी रु.18 प्रती चौ.मी. असा एकुण रु.95 प्रती चौ.मी. दर निश्चीत करण्यात आला आहे.
24x24x4 मी.व 34x34x4.7 मी. या आकारमानाचेच हाफ डग आऊट शेततळे घेण्यात यावेत.
ई) मापदंड व अनुदान-
जमिनीचे वर बांध घालून पाणी साठा करावयाचे सामुदायिक शेततळे
आकारमान (मी) लाभक्षेत्र (हे.)अनुदान (लाखात)
३४x३४x४.७० ०५ ३.३९
२४x२४x४ ०२ १.७५
24x24x4 मी च्या शेतत ळ्या साठी फलोत्पा द न क्षेत्र 1 ते 2 हे.असावे. तसेच 24x34x7 मी च्या शेत तळ्या साठी फलोत्पाद न क्षेत्र हे 2 ते 5 हे.किंवा जास्त असावे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गातील शेतकरी यांना फलोत्पादन पिके सध्या असण्याची अट शिथिल आहे. मात्र संबंधीत शेतकरी यांनी भविष्यात फलोत्पादन पिके घेण्यावीषयी हमी पत्र द्यावे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत शेडनेट हाऊस उभारणी करणे
1. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
. ७/१२
.- ८ अ
. आधार कार्डाची छायांकित प्रत
. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
. पासपोर्ट फोटो
३ . शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा
४ . शेडनेटचे प्रकार (आकारमान ) फ्लॅट टाईप उंची ४ मीटर अनुदान मर्यादा (प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के)
(१००० चौ. मी आकारमानासाठी ३१२५२० रुपये).,
(२००० चौ. मी आकारमानासाठी ५३६५७६ रुपये).,
(३००० चौ. मी आकारमानासाठी ७४६३२० रुपये).,
(४००० चौ. मी आकारमानासाठी ९४०००० रुपये).,
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी सम्पर्क साधावा.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत पॉलीहाऊस हाऊस उभारणी करणे
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
. ७/१२
. ८ अ
. आधार कार्डाची छायांकित प्रत
.आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
.जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी)
.पासपोर्ट फोटो
३ . शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरील कागद पत्रांसह अर्ज सादर करावा
४ . पॉलिहाऊसचे प्रकार (आकारमान ) (ओव्हीपीएच उंची ६ मी )
अनुदान मर्यादा - प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के
५०० चौ.मी आकारमानासाठी - २६१८०० रु.अनुदान
१००० चौ.मी आकारमानासाठी - ४७१२४० रु.अनुदान
२००० चौ.मी आकारमानासाठी - ९२५६०० रु.अनुदान
४००० चौ.मी आकारमानासाठी - १६८८००० रु.अनुदान
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत कांदाचाळ
सर्वसाधारणपणे कांदा जमिनीवर पसरवून ठेवून किंवा स्तानिकरीत्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांदयाची साठवणूक करतात. त्यामुळे कांदा सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच कांद्याची प्रत व टिकाऊपणा यावर विपरीत परिणाम होतो. शास्त्रशुद्द कांदाचाळ उभारणीमुळे कांद्याची योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.
१. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी हॉर्टनेट (http://www.hortnet.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी करावी.
२. अर्थसहाय्यचे स्वरूप -
५, १०, १५, २० व २५ मे. टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये ३५००/- प्रति मे. टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील. एका लाभार्थ्याला २५ मे टन क्षमतेच्या कमाल मर्यादा पर्यंतच अनुदान देय राहील.
३. लाभार्थी निवडीचे निकष -
अ . शेतकऱ्याने योजने अंतर्गत अर्ज करतांना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. ७/१२ वर कांदा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे.
ब . शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे.
क . सादर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ, नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
४. ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे
अ . ७/१२
ब. ८ अ
क. आधार कार्डाची छायांकित प्रत
ड. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
इ. जातीचा प्रमाणपत्र (अनु.जाती/ अनुजमाती शेतकऱ्यांसाठी)
ई. यापूर्वी कोणत्याही योजनेतून कांदाचाळीचा लाभ घेतला नसल्याबाबतचे हमीपत्र
५ . शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा, तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर काम कांदाचाळ उभारणीचे काम सुरु करावे. पूर्वसंमती दिल्यापासून दोन महिन्याच्या आत कांदाचाळ उभारणे आवश्यक आहे .
अधिक माहिती साठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
राष्ट्रिय शाश्वत शेती अभियान अंतर्गत वनशेती उप अभियान-
गावात ज्याचे नावावर शेत जमीन आहे असे सर्व शेतकरी.
ब. अर्ज कुठे करावा-
तालुका कृषी अधिकारी.
क.आवश्यक कागदपत्रे-
7/12 व 8.
ड. क्षेत्र मर्यादा-
सदर योजनेत लागवडीसाठी प्रती लाभार्थी कमीत कमी व जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा राहणार नाही.
इ. अनुदान मर्यादा-
मंजूर मापदंडाच्या 50 टक्के, किंवा कमाल 35 रु.प्रती झाड अनुदान.
हे अनुदान 4 वर्षात देण्यात येते.
प्रथम वर्षी- 40 टक्के,
दुसरे वर्षी 20 टक्के,
तीसरे वर्षी-20 टक्के व
चौथ्या वर्षी- 20 टक्के.
दुसरे तीसरे व चौथ्या वर्षी अनुक्रमे 90 टक्के, 75 टक्के व 65 टक्के झाडे जिवंत ठेवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीकरिता
राष्ट्रिय शाश्वत शेती अभियान अंतर्गत वनशेती उप अभियान मार्गदर्शक सूचना