Post date: Mar 23, 2013 8:34:16 PM
एकदा स्वातंत्र्य दिनी खुप गंमत झाली
एक परी पाहुणी म्हणून आमच्या शाळेत आली
परीने तिरंगी झेंडा आभाळात चढविला
तेंव्हा आम्ही टाळयांचा कडकडाट केला.
परीच्या हस्ते मग खाऊवाटप झाले
मी हुशार म्हणून मला दोन पुडे मिळाले.
नंतर त्या परीने छान भाषण केले,
खरं सांगू, खाऊ सारखे मला ते आवडले.
अखेर राष्ट्रगीत परीनेच म्हटले
म्हणतात ते जगात चहुकडे घुमले.
समारंभ संपला परी म्हणाली नमस्ते!
आणि ती उडून गेली कुणास ठाऊक कुठे ते!