Post date: Mar 23, 2013 8:18:31 PM
किती वेळा सांगितले हो बाप्पा
इतकं गोड खाऊ नका, जपा जीवाला
दहा दिवसासाठी येता, रोज रोज मोदक खाता,
हवा वरुन हो दुधाचा घोट कशाला?
गोड गोड खाऊन हो किडेल तुमचा दात,
का नाही खात तुम्ही साधा वरण भात?
साध्या वरणभाताची हो भीती कशाला?
इतका गोड खाऊ नका जपा जीवाला.