दिनांक-२४/०६/२०२२
सेबीच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत भालावली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग भारतीय स्वातंत्राच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त ‘आझादी का अमृत महोत्सव’साजरा करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून SEBI म्हणजेच Securities and Exchange Board of India आणि आर्थिक व्यवहार विभाग आणि वित्त मंत्रालयभारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा व निबंध स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.यामध्ये भालावली महाविद्यालयातील व्दितीय वर्ष वाणिज्य शाखेतील कु.संकेत लाड,कु.विशाखा पारकर.कु.प्राजक्ता पेटावे तसेच व्दितीय वर्ष कला शाखेतील कु.सोनिया जुवळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.प्रश्न मंजुषा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सेबी कडून प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांना प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी अर्थशास्त्र प्रमुख प्रा.सानिका सावंत मार्गदर्शक लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य नामजोशी सर यांनी अभिनंदन केले.
भालावली महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
युवक विकास मंडळ संचलित कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, भालावली येथे गुरुवार, दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते.हा कार्यक्रम सकाळी ०९:०० ते १०:०० या वेळेत साजरा करण्यात आला. कार्यक्रम Online असल्यामुळे Zoom App चा वापर करून साजरा करण्यात आला. त्याकरीता विद्यार्थांना Zoom ची लिंक आणि कार्यक्रमपत्रिका WhatsApp ग्रुप वरती पाठविण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रणित लिंगायत यांनी केले. कार्यक्रम सुरु झाल्यावर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्राचार्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषवावे अशी त्यांना विनंती करण्यात आली.
प्रास्ताविकामध्ये प्राध्यापक प्रणित लिंगायत यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा थोडक्यात आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमत्त राज्यभर सुरु असलेल्या सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत संविधान जागर-संविधान जनजागृती अंतर्गत महाविद्यालयामध्ये दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन, निबंध स्पर्धा यांचे अयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेमध्ये द्वितीय वर्ष कला शाखेतील कु.सोनिया चंद्रकांत जुवळे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नामजोशी सर यांचे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानातील योगदान” याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आंबेडकरांचे योगदान, स्त्री सुधारणा संदर्भातील कार्य, दलित वर्गाच्या उद्धारासाठीचे कार्य इ. अनेक मुद्यांच्या आधारे त्यांनी विषयाची मांडणी केली.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रणित लिंगायत यांनी केले. अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने Online Quiz Competition चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना ई- प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
युवक विकास मंडळ संचलित कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय भालावली येथे मंगळवार दिनांक ०८/०३/२०२२ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. शाश्वत भविष्यासाठी आजचे लैंगिक समानत्व या थीम वर या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आणि निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य श्री. नामजोशी यांनी भूषविले होते.या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला विकास कक्षामार्फत शाश्वत भविष्यासाठी आजचे लैंगिक समानत्व या विषयावरती निबंध स्पर्धा व स्त्री आणि शाश्वत विकास या विषयावरती पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक संकेत नवनाथ लाड व द्वितीय क्रमांक प्राजक्ता चंद्रकांत पेटावे आणि पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहित अरविंद ठूकरूल व द्वितीय क्रमांक जुवाना इशराफ हुन्ना यांनी पटकावला. यावेळी महिला विकास कक्ष विभागप्रमुख, इतर प्राध्यापक वर्ग व विद्याथी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष विभागप्रमुख प्राध्यापिका सुप्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. प्रमोद वारीक यांनी महादेव गोविंद रानडे आणि पेरिआर यांची समाजातील असलेली भूमिका मध्यवर्ती आहे आणि विकासासाठी होणारा उपयोग महत्वाचा आहे असे प्रतिपादन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य चंद्रशेखर नामजोशी यांनी आपल्या मनोगतातून ग्लास सिलिंग या मानसशास्त्रीय संकल्पनेद्वारे स्त्रियांनी समाजात स्वतःहून पुढाकार घेऊन सिद्ध करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. आरजू मोनये हिने केले.
युवक विकास मंडळ संचलित कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, भालावली येथे दिनांक २८ फेब्रु २०२२ रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य श्री.नामजोशी यांनी भूषविले होते. या राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी वाङ्मय मंडळाकडून हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी वाङ्मय मंडळातील विद्यार्थी,मराठी विभागप्रमुख व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. “मराठीच्या प्रमुख बोलीभाषा व त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे”.असे मराठी विभागप्रमुख सौ.रचना सावंत यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. कवी कुसुमाग्रज यांचा जीवन परिचय व साहित्यकृतीचा परिचय महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी कु. सम्यक जाधव याने मनोगतातून करून दिला.तर ‘भाषेचे महत्व प्रचार व प्रसार’हि मध्यवर्ती भूमिका ठेवून प्रा.सौ.सानिका सावंत यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. “प्रमाण भाषेचा वापर करताना करणे कसे गरजेचे आहे.तसेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करावा.” असे आवाहन प्र.प्राचार्य श्री.नामजोशी यांनी मनोगतातून व्यक्त केले. 'मराठी राजभाषा दिन’हा कार्यक्रम मराठी वाङ्मय मंडळ व प्र.प्राचार्य यांच्या पाठीब्यांमुळे आणि विद्यार्थ्याच्या भरघोस प्रतिसादामुळे यशस्वीरित्या पार पाडला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार मराठीवाङ्मय मंडळ सदस्य कु. आरजू मोनये हिने केले.
भालावली महाविद्यालयामध्ये ‘आर्थिक साक्षरता सप्ताह’साजरा
युवक विकास मंडळ संचलित कला,वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालय भालावली येथे दिनांक १४ फेब्रुवारी ते १८
फेब्रुवारी दरम्यान ‘आर्थिक साक्षरता सप्ताह’ साजरा करण्यात आला.या सप्ताहात दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ रोजी
प्रा.सानिका सावंत यांचे ऑनलाइन व्यवहारांची सुविधा आणि सुरक्षितता यामध्ये ऑनलाइन व्यवहार कशा पद्धतीने
हाताळणे गरजेचे आहे या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.या सप्ताह करिता ‘Go Digital Go Secure’ ही थीम RBI
मार्फत निवडण्यात आली होती.
या सप्ताहाच्या निमित्ताने ‘ National Centre for Financial Education’या संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या
ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या सर्व कार्यक्रमाचे नियोजन
अर्थशास्त्र विभागामार्फत प्रा.सानिका सावंत यांनी केले.या नियोजनातून महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य नामजोशी सर यांचे
मार्गदर्शन लाभले.
भालावली महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
युवक विकास मंडळ संचलित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय भालावली येथे शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी
२०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम सकाळी ०९:०० ते १०:०० या वेळेत zoom app चा वापर करून साजरा करण्यात आला.
त्याकरिता zoom ची लिंक What's app द्वारे विद्यार्थ्यांच्या ग्रुप वरती पाठविण्यात आली होती. या कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्राद्यापक प्रणित लिंगायत यांनी केले. कार्यक्रम सुरु झाल्यावर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राध्यापिका रचना सावंत यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था' या
विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते.महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेतील विविध पैलूचा उलगडा करण्याचा प्रयत्न त्यांनी
आपल्या व्याख्यानातून केला. यानंतर महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी रोहित ठुकरूल याने छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
प्रभारी प्राचार्य नामजोशी सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगी असलेल्या गुणांपैकी एक तरी गुण
आत्मसात करावा आणि आपले भविष्यातील नियोजन करावे असे आपल्या मनोगतातून सांगितले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक प्रणित लिंगायत यांनी कार्यक्रमाच्या समारोपामध्ये शिवकालीन प्रशासन आणि
सद्यकालीन प्रशासन याविषयी तुलनात्मक विचार मांडले. ह्या कार्यक्रमाला प्र.प्राचार्य, सर्व प्राध्यापक वर्ग तसेच
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.
|| भालावली महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प कार्यक्रम संपन्न ||
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा भारती,आयुष मंत्रालय,पतंजली योग विद्यापीठ,गीता परिवार,नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशन हार्ट फुलनेस अशा ०६ अखिल भारतीय सामाजिक क्रीडा संघटनांमार्फत संपूर्ण भारतात ७५ कोटी सूर्यनमस्कार करण्याचा उपक्रम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी युवक विकास मंडळ संचलित कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय भालावली येथे महाविद्यालयाने सामुहिकरित्या विद्यार्थ्यांकरिता सूर्यनमस्काराचे आयोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना प्र.प्राचार्य मा.श्री.नामजोशी यांनी युवकांच्या आरोग्यासाठी सूर्यनमस्कार किती महत्व आहेत याविषयी माहिती देऊन मागील दोन वर्ष कोरोनाच्या भीषण पार्श्वभूमीवर उर्जावान होऊन शारीरिक, मानसिक संतुलन साधण्यासाठी हा उपक्रम दैनंदिन जीवनामध्ये किती महत्वाचा आहे असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे प्राध्यापक प्रकाश कोंडसकर यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाचे नियोजन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन क्रीडा विभाग प्रमुख प्रा.श्री शैलेंद्र प्रभूदेसाई यांनी प्र.प्राचार्य मा.श्री.नामजोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
भालावली महाविद्यालयामध्ये 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उत्साहात साजरा
युवक विकास मंडळ कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय भालावली येथे ऑनलाईनरित्या दि.१४ जानेवारी २०२२ ते २८जानेवारी २०२२ 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उत्साहात साजरा केला गेला.या पंधरवड्याचे औचित्य साधून महाविद्यालयात मराठी विभागाकडून ऑनलाईनरित्या निबंध स्पर्धा,कथाकथन स्पर्धा,चारोळी स्पर्धा,काव्य स्पर्धा इ.स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग दर्शविला होता.या पंधरवड्याची सांगता २८जानेवारी २०२२ रोजी प्रा.श्री.प्रभुदेसाई शैलेंद्र यांच्या ‘मराठी भाषा संवर्धन’ या व्याख्यानाने झाली.”मराठी भाषेचे संवर्धन करणे किती गरजेचे आहे व त्यासाठी आपण बोलींचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करावा.”असे प्रा.श्री.प्रभुदेसाई यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले.हा पंधरवडा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य श्री.नामजोशी व महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद,विद्यार्थी-विद्यार्थिनीनी विशेष मेहनत घेतली.तर या स्पर्धांचे नियोजन मराठी विभागप्रमुख सौ.रचना सावंत यांनी केले.
भालावली महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा
युवक विकास मंडळ संचलित कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय,भालावली येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा झाला. हा कार्यक्रम निवडणूक साक्षरता मंडळ आणि राज्यशास्त्र विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाविद्यालायचे प्र. प्राचार्य आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री. नामजोशी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वर्षी राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “निवडणुका सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागी निवडणुका” हि थीम निश्चित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय मतदार दिवसाचा इतिहास, निवडणूक आयोगाची निवडणुकामधील उल्लेखनीय कार्य आणि लोकशाही यशस्वी होण्यासाठी युवकांचे योगदान, आणि विशेषतः कोरोनाच्या आव्ह्यानात्मक काळात यशस्वी रित्या निवडणुका घेण्याचे पेललेले आव्हान या विषयी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करावी त्यासाठी महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाचे सहकार्य निश्चित राहील असे आवाहन करण्यात आले.