‘युवक विकास मंडळ’ भालावली ही संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे भालावली या गावी १९८४ या वर्षी स्थापन करण्यात आली. १९८४ साली पंढरीनाथ अनंत बागाव (बागाव मामा) आणि त्यांचे सहकारी  यांच्या प्रयत्नातून 'ज्ञानविकास सहकारी हायस्कुल भालावली' ची स्थापना करण्यात आली.या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जुलै २०१२ मध्ये मौजे भालावली (धारतळे) या ठिकाणी ‘युवक विकास मंडळ भालावली संचलित 'कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय’ सुरु करण्यात आले. 

महाविद्यालयाची स्थापना

राजापूर तालुक्याचा विकास होत असताना भालावली परिसरात शिक्षण क्षेत्राचा विकास होणे गरजेचे असल्याने, भालावली परिसरातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उच्च शिक्षणासाठी दूर जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय दूर करण्यासाठी ‘युवक विकास मंडळ भालावली’या संस्थेने पुढाकार घेऊन वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. मा.श्री. नारायण केळकर साहेब (मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव यांचे निवृत्त स्वीय सहाय्यक) यांच्या मार्गदर्शनाने व श्री. श्रीकांत बागाव यांच्या प्रयत्नातून जूलै २०१२ या वर्षी कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय मौजे भालावली ( धारतळे ) या ठिकाणी सुरु झाले.

महाविद्यालयाला ‘मुंबई विद्यापीठ’आणि ‘महाराष्ट्र शासन’यांची मान्यता मिळाली आहे.सध्या महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष/द्वितीय वर्ष/त़ृतीय वर्ष,कला व वाणिज्य या पदवी शाखांसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार प्रवेश देण्यात येत आहे.