मुंबई विद्यापीठाच्या निर्णयानुसार प्रथम,द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या दोनहीसत्रातील परीक्षा विद्यापीठाकडून घेतल्या जातात.या संबंधीची सूचना व माहिती वेळोवेळी दिली जाईल.त्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रे,फी इ.ची पूर्तता वेळोवेळी करणे बंधनकारक आहे.विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ पासून “CHOICE BASED CREDIT, GRADING AND SEMESTER SYSTEM”लागू करण्यात आली आहे.या पद्धतीत विद्यार्थ्याना वर्षभर सातत्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे महाविद्यालयाची फी, प्रकल्प,गृहपाठ,चाचणी परीक्षा इ.बाबींची पूर्तता वेळोवेळी करणे अनिवार्य आहे.*द्वितीय वर्ष म्हणजेच SEMESTER-III ला प्रवेश मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थी SEM-I आणि SEM-IIया दोन सत्रांपैकी कोणत्याही सत्रात दोनपेक्षा जास्त विषयात अनुतीर्ण नसावा.* तृतीय वर्ष म्हणजेच SEMESTER-V ला प्रवेश मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थी SEM-Iआणि SEM-IIकिंवा SEM-III आणि SEM-IV या दोन सत्रापैकी कोणत्याही सत्रामध्ये तीन पेक्षा जास्त पेपर्समध्ये अनुतीर्ण नसावा त्याचप्रमाणे कोणत्याही एका वर्षात पुर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.