दुःखात डुबलेल्या तुझ्या
अमाप इच्छांना
तू रगडलयसं
भाकरीच्या पिठासारखं
मी मात्र उब मानून
सतत शेकत राहिलो देह माझा
तुझ्या पोळलेल्या
हातांच्या स्पर्शांनी_
---
म्हणून आज बाहेर
कसाही पाऊस पडत असला
गारा पडल्या
आकाश सप्तरंगी झालं
तरी करपलेल्या माझ्या मनाला
कविता सुचते
तुझ्या अकांताची
जेवतांना...
जेवण बनवतांना
~ ज्ञानेश | दु. ४:५०; १५/७/२०१८
दैनंदिनीतं अनुभवलेखणाच्या मांडणीत
मुश्किल असा पेच जाणवतो प्रत्येकदा…
बाह्यरूपी दिलखुलास मी
आणि आरस्यातील कोंडवाडा
यांमध्ये परस्परविरोधी मैलोंमैल अंतर असतांना
कसं उलगडावं हे अस्तित्व निष्पक्षपणे...
---
पारंपारिक अंधारात अदृश्य दडलेला 'सेपियन'
जगण्याच्या आशेची हाळी देत असतो वारंवारं
आणि 'लोकप्रिय समाजसेवी' मन शोधतं देखीलं
आंधारातल्या काळोखाला 'उदारमते'
मात्र नाही पोहचतं आरपारं
काळ्याकुट्ट उरलेल्या सांगाड्या पर्यंत...
~ ज्ञानेश | दु.०२:०४; २४, जुलै २०१७
तुच पहिला अन शेवटचा पण
भारत माझ्या देशा
“देश” संकल्पनेची जागृती
अजुनही अनभिज्ञच इथल्या जनमाणसांत
ज्यामध्ये पुरुण उरते “राजकीय स्वातंत्रता”
“सामाजिक लोकशाहीच्या” नरड़यावर पाय रोवून
पंच्याहत्तराव्या अमृत वाढदिवसाला
भेट म्हणून तुला मी द्याव काय?
हर घर असलेला भांडवली तिरंग़ा की
जातपिडान दाबलेल्या तहानलेल्याचा गळा
शेवटी तुलाही माहितीहे,
दोघही क्रूसासमान मातीतच मिळतायत
“द ग्रामर ऑफ़ ऐनर्की” मध्ये.
रक्ताळलेली ही पडिक माती,
अन कुजलेली मनबुध्दी
मानुसपणानं भूसभुशीत होऊण
शांततेची वर्षा कुणास ठाव कधी बरसेण?
जर का फुललेत इथे प्रेम, करुणेची बीज़,
पोसला अन पसरला समतारूपी बोधिवृक्ष
तर मी ही म्हणेन तुला
सुजलाम, सुफलाम, महान…
~ ज्ञानेश | १५ ऑगस्ट २०२२
शेवटी काय ते कमीत कमी
सगळ्यांनी तुला वाचतांना मरावं
बुजावं, कुजवावं स्वतःलाच.
अन परत उगावं मातीतून
एका नवीन रोपासारखं
अभेदी, अखंड!
~ ज्ञानेश (विषय ढसाळ) | सप्टेंबर २०१९
मला अपेक्षा हि नाहीहे
कि तू निस्तरावस माझं दुःख
तुझ्या कृतज्ञ शब्दांनं
आणि संवेदनशील मनानं
होशील तयार तर ये सोबत
हातात मशाल घेऊन
ढसाळ-कथित शहरांना आग लावायला!
~ ज्ञानेश (संवेदनशील) | ऑगस्ट २०२०
बेल हूक म्हणते,
"जेव्हा तुम्ही संवेदनशील होता,
प्रेम करायला लागता,
तेव्हा तुमची डॉमिनेशन, ऑपरेशनच्या विरोधात
आणि फ्रीडम, लिबरेशनच्या समर्थनात
वागण्याची सुरुवात होते."
हळू हळू आपण आजुबाजुच्या
ऑप्रेसीव स्ट्रक्चरांना तोड़ण्याची तयारी दाखवतो,
जात, पितृसत्ताकता, लैंगिकता,
कलर, धर्म, वर्ग... कदाचित सगळ्यांनाच.
पितृसत्ताकता सध्या खोल वाटते मला,
कोणीतरी, "ती" माझ्यापेक्षा जास्त भारी सांगू शकेन.
तर सवेंदना अखंड असतात,
तशीच संवेदनशीलताही अखंड, अविरत, अमाप...
म्हणजे मानवी जग हे प्रेमाच्या पातळीवर
कायमस्वरूपी एस्ट्रक्चरलचं वाटायला लागत.
---
साहित्यात नावाजलेल्या पॉपुलर
लोकांच्या कादंबऱ्या, कविता ती मला गिफ्ट करते,
त्यांची फोटोज व्हाट्स अप करते,
फेसबुकला पर्सनली टॅग करते,
तिला आवडणाऱ्या ग़ज़ल्स, शायऱ्या, चारोळ्या,
यूट्यूबचे नवनवीन वीडिओज़,
कधी फोनवर तर कधी समोर वाचून दाखवते.
इनवाइट पन करते आवडीच्या
साहित्य मैफिलींसाठी.
मनाला भावनिक बनवणाऱ्या
आणि निष्कर्षात निष्क्रिय करणाऱ्या तिच्या फर्मायशी
बांधतात मला सकाळी, दुपारी, संध्याकाळी.......... रात्री
अब्स्ट्रक्ट, स्पिरिच्युअल साखळ्यांनी.
तिच्या साहित्यातल्या प्रेमाची नैतिकता
भावनिक गुलाम बनवू पाहते मला दररोज,
हिप्नोटाइज करते, बाथरूममध्ये बंद ठेवते,
अन्थरुणामध्ये उशीला आसवांनी ओल करू पाहते.
हे सगळ काही विचार करून एक्सेप्ट करण
म्हणजे शेवटी स्वतःलाच एपिस्टेस्मिकल दुविधेत पुरण.
---
पुढे ही दुविधा चक्रवाढि पसरत जाते_
तिच येणं तिच्यासाठी
अन माझ जाणं माझ्यासाठी
एकटं जरी पुरेस असल
तरी तिच्या घरच्यांना माझ्याबद्दल,
माझ्या घरच्यांना तिच्याबद्दल,
आवड-निवड, शिक्षण-विचार,
स्वभाव-हुशारी, प्रेम-फ्यूचर सोडून_
प्रश्न पडतात
कोण खालच्या जातीच अन कोण वरच्या?
दोघींही जातींच्या शिडीला पायऱ्या किती?
खाली सेप्टिक चेम्बरमध्ये उतरायचं की
वरती "सोनेरी स्वर्गा" कडे चढायचं?
उतरायच असेन तर काळजी वाटते
पायऱ्यांंना लागलेल्या कार्बनी गंजाने
गोरेगोमटे तळपाय काळे होतील याची.
चढायच ठरवलं तर भीति वाटते
हाताला चिकटलेल्या गंजामुळे
सोन्याच्या भट्टित सिजण्याची.
एन्डोगॅमी - एक्झॉगॅमी
हायपरगॅमी - हायपोगॅमीच्या
डेफिनेशन्स नसल्या तरी रित्या सगळ्या तोंडपाठ.
गणित शिकलेल्या-न शिकलेल्या
किंवा पास-फेल झालेल्या
कश्याहि मायबापाला
जातितल अंतर अचूक मोजता येत
निष्कर्ष सर्वांची सारखीच येतात
अगदी विज्ञानाच्या प्रयोगासारखे.
माझ्या शिडीबाहेरिल आणि ऍण्टी-शिडी असलेल्या
नवबुद्धिस्ट असण्याचा फरक सध्या
मलाच पडत असावा कदाचित.
जे ओढतं मला शिडी बाहेर,
जाळेण शिडीलाही मुळांपासून_
ज्ञानेश (मार्च २०१८)
कश्मीर-लडाखची,
एकीकडे दुष्काळ दुसरीकडे महापुराची
किंवा जागतिक आदिवासी दिनाची
बातमी वाचत गरम होऊन
समकालीन चर्चेत मग्न झालेला विचारवंत
क्लोरोफ्लोरो फ़ैलावत
एसीच्या हवेत
डोकं थंड करण्याचा प्रयत्न करतो...
हे सर्व विसरून
ऐन पंचविशीत आलेली त्याची मनबुद्धी
आपल्या एकतर्फी प्रेम असलेल्या प्रेयसीच्या
वॉल वरील फोटो बघत,
कॅप्सन वाचत
मनमिळावू स्वप्ने रचू म्हणत होती ...
पण उकिरड्यावर पडलेलं घर,
गावाकुसा बाहेर फेकलेला समाज,
इतिहास, राजकारण,
श्वासा-श्वासात दडलेल्या भेदाभेदीच्या कहाण्या
ज्ञानाची गरज समजावून भाग पाडतात
कि भाई
तुझं दुतर्फी प्रेम पुस्तकांवरच लवकर होईल
तेंव्हा कुठे ज्ञानाचं,
इतिहासाचं,
राजकारणाचं
अन प्रेमाचपण द्वंद्व मिटनं...
~ ज्ञानेश | दु. १२:४५, ०९ ऑगस्ट २०१९
पता है तुम्हारी बाते, सन्नाटे, गुफ्तगू
बड़ी शानदार होती है
वो हरएक लब्ज
जो सीधा दिखता है आते... किसी गहरी खाई से
मुझे दो आवाजे सुनाई देती है
एक जो तुम बोलती हो... दूसरी जो मै समझता हूँ
मोहतरमा बोहोत पढ़ना पड़ा हमें
आपकी समज को समजने के लिए
कौशल्या से लेकर सुशीला तक
गुलज़ार से लेकर गुरिंदर तक
जो समजा, सोचा जरा लिखभी दे उसे
ज़माने रंजिश-ए-जुल्म की बहती नालों से
एक तूफानी बाढ़ सी टकराती हो तुम
हर दमन संघर्ष के किस्तों से
एक नई उभरती पहचान हो तुम
तुम जो चाहो तो ज़माना बदल जायेगा
गर चाहो... की चाह कायम रहे...
~ ज्ञानेश | २९ नोव्हेंबर २०१८
चांदुमामा, चांदोबा, चांद, चंद्र
वयानुसार आलटून-पालटून ठेवलेली हि तुझी संमधी नावं
आजपर्यंत वाचलेल्या सर्वच
चरित्र-आत्मचरित्रांची अनुक्रमणिका वाटावीत एवढी सत्यं
तुझ्या अमाप शितलतेत रमून पाहिलेली,
दिसाड कोंबवुन ठेवलेली अगण्य निरागस स्वप्नं
न्याहाळत, गवसत सरकवलेत घड्याळाचे काटे
जगाची पर्वा न करता, गावं-स्वदेस सोडून
त्यांना पूर्ण करण्याचा धीर
तुझ्या त्या अंधाऱ्या आकाशात
शाश्वत चमकण्यानं दिलाय
प्रदेश-सिमा बदलल्या तुझी सोबत मात्र तशीच...
ज्ञानेश | एप्रिल, २०१९
खिड़की से उड़ते परिंदे को देखते हुए
उसने अपनी थ्री बी.एच.के. फ्लॅट की गैलरी खोली,
और सोचने लगा
"ये परिंदा है कितना खूबसूरत!
सफ़ेद रंग, लाल चोंच, साफ-सुतरे पंख, घुंगराले बाल "
शायद परिंदे का नाम वो गूगल पे धुंढ़ नहीं पाया
क्युकी ऑप्शंस बोहोत आगये
वो छोड़, फिक्शन लिखने वाला ये लेखक
जिसके खयालो में पंछी-भी बाते करते है
जंगल बुक के कायदे से
अपनी मनघडन कहानी को रेटते हुए
बडी सिद्धत से पूछने लगा
“परिंदे, तुम्हारा नाम क्या है?
अच्छा छोड़ो अपना उपनाम बतावो पहले
दिखने में तो कोई देशवासी नहीं लगते
यही के हो या दूसरे देश के?"
प्रश्नार्थक आँख मीचकके
अपने फोन की स्क्रीन की तरफ देखके बोला,
“नार्थ-ईस्ट से हो?
मतलब काफी बर्ड सेंच्युरीज है वहा इसलिए पूछा
अकेले ही हो?
बाकि पंछियो की टोली नहीं है साथ?
मिया, बीवी, बच्चे, माँ-बाप, गांव-शहर..."
लेखक की कहानी को किरदार मिल गया
जियोग्राफी भी मिल गयी,
थोड़ा इतिहास,
थोड़े रिस्ते-नाते का ड्रामा,
और कुछ राजीनीति के चूनिन्दा किस्से डालो
तो कहानी के बेसिक्स पुरे
क्या पता नेटफ्लिक्स-अमेझोन वाले खरीद ले?
पंछी, एक पंछी था,
वो न बोला, ना समझा
अगर बोला तो क्या बोला?
समझा तो क्या समझा?
कुछ भी नहीं पता
न लेखक से किसीने पूछा, न समजने का सोचा
इतिहास-राजीनीति के वो फिक्शनल पन्ने,
शायद ही कभी किसी परिंदे के थे…
~ ज्ञानेश | मार्च २०१९
गोष्ट शंबूकाची की रामाची, बळीराजाची की वामनाची—
मिमांसा, विवेक, आकलन आणि प्रश्न विरहित,
सत्याची ओढचं खुडून टाकणारा असा आजचा दिवस
हा सण भासतो फडफडत्या दिव्यासारखा,
जो कोंडतो आंतरिक कल्लोळ घट्ट तेलात,
जाळतो हजारो वर्षांचा शोषित इतिहास,
वातीरूप तर्काचं अस्तित्व संपवत.
जग काढत असतं दिव्याचा अन्वयार्थ
शांतता, आनंद, आपुलकीच्या
बाह्यरूपी रंगीबेरंगी भाषेत.
खुडलेल्या ओढीस जर का कोंब फुटला,
तर जाणिवेला उगतील
माणुसकीची पानं, फांद्या, फुलं, फळं;
सुटतील गुलामगिरीच्या भौतिक-मानसिक बेड्या—
खोल मातीतल्या मुळांपासून दूरवर आकाशात
बहरेल तर्करूपी सत्याचा बोधिवृक्ष.
~ ज्ञानेश । २५ ऑक्टोबर २०२२