महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील शिव प्रतिष्ठानच्या सामान्य सामान्य सभासदांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पंचायत समिती गणावर एका पदाधिकाऱ्याची निवड शिव प्रतिष्ठान कडून केली जाते त्या पदाधीकाऱ्याला गाव प्रतिनिधी असे म्हटले जाते. या पदाधीकाऱ्यांच्या माध्यमातून दरवर्षी नविन सामान्य सभासदांची नोंदणी करून घेणे तसेच स्थानिक पातळी वरील सामान्य सभासदाच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जाते. संस्थेने गाव प्रतिनिधींची निवड करण्याचा अधिकार तालूकाध्यक्षांना दिलेला आहे, परंतू त्यासाठी तालूकाध्यक्षाने संस्थेची पुर्व परवानगी घेणे अवश्यक आहे. गाव प्रतिनिधींना आपल्या कार्यक्षेत्रात संपर्क प्रमुखाची निवड करण्याचा अधिकार आहे, परंतू त्यासाठी त्याने संस्थेची पुर्व परवानगी घेणे अवश्यक आहे. तालूकाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळी वरील कामे गाव प्रतिनिधी करत असतांना त्यास दिलेल्या कामाचे मानधन संस्थे तर्फे गाव प्रतिनिधींना दिले जाते. वेळोवेळी संस्थेने दिलेल्या सुचनांचे पालन गाव प्रतिनीधींना करावे लागते. संस्थेने गाव प्रतिनिधीं या पदाची निवड सामान्य सभासदांच्या अडचणी सोडविण्यासाठी केली आहे त्यामुळे त्याला आपल्या पदाचा दुरूपयोग करता येत नाही किंवा या पदाचा वापर वयक्तीक स्वार्थासाठी करता येत नाही. गाव प्रतिनिधीचे वर्तन संस्थेच्या हिताच्या, उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा त्याच्या वर्तनामुळे संस्थेला नुकसान होत असेल तर संस्था अशा गाव प्रतिनिधीला पदावरून दूर करू शकते.
महाराष्ट्रातील प्रत्येक तालूक्यावर एका पदाधीकाऱ्याची निवड संस्थेच्या जिल्हाध्याक्षा मार्फत केली जाते त्या पदाधीकाऱ्यांना तालूकाध्यक्ष म्हटले जाते. ज्या तालूक्यासाठी तालूकाध्यक्ष म्हणून निवड झालेल्या पदाधीकाऱ्यास संबंधीत तालूक्यातील रीक्त आसलेल्या गाव प्रतिनिधींच्या जागा भरण्याचा अधिकार असतो परंतू त्याने संस्थेची पूर्व परवानगी घेणे अवश्यक आहे. जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली तालूक्यात गाव प्रतिनिधी मार्फत संस्थेचे संघटन वाढवून सामान्य सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालूकाध्यक्षांची निवड करण्यात येते. वेळोवेळी तालूक्यातील गाव प्रतिनिधींच्या मिटिंगा घेवून गाव प्रतिनिधींना मार्गदर्शन करून गाव प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे काम तालूकाध्यक्षांना करावे लागते. वेळोवेळी संस्थेने सोपवलेले काम करत असतांना तालूकध्यक्षांना मानधन दिले जाते. तालूकाध्यक्षांची निवड संस्थेचे संघटन संबंधीत तालूक्यात वाढवून सामान्य सभासदांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. तालूकाध्यक्षांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा तालूकाध्यक्षास पदावरून संस्था दूर करू शकते.
जिल्हाध्यक्ष जिल्हयातील प्रत्येक तालूक्यात एका पदाधीकाऱ्यांची निवड तालूकाउपाध्यक्ष पदी करू शकतात, परंतू त्यासाठी त्यांनी संस्थेची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आसते. तालूकध्यक्षांच्या अनुपस्थित कालावधीत तालूकाध्यक्षांची सर्व कामे सांभाळण्याचा अधिकार तालूकाउपाध्यक्षांस आसतो. तसेच तालूकाध्यक्षांच्या कामात त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तालूकाउपाध्यक्षांची निवड करण्यात आलेली असते. वेळोवेळी संस्थेचे काम करत आसतांना तालूकाउपाध्यक्षांस संस्थे कडून मानधन दिले जाते. तालूकाउपाध्यक्षांची निवड संस्थेचे संघटन संबंधीत तालूक्यात वाढवून तालूकध्यक्षांना त्यांच्या कामात मदत व्हावी उद्देशाने करण्यात आलेली आहे. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. तालूकाउपाध्यक्षांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा तालूकाउपाध्यक्षास पदावरून संस्था दूर करू शकते.
संस्थेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एका पदाधीकाऱ्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करतात. संबंधीत जिल्ह्यात संस्थेचे संघटन मजबुत करून सामान्य सभासदांच्या अडचणी सोडविण्याचे संपूर्ण नियोजन करून जिल्ह्यातील सर्व पदाधीकाऱ्यांना कामाचे नियोजन देवून संबंधीत जिल्ह्यातील सामान्य सभासदांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्याचे काम जिल्हाध्यक्षांना करावे लागते. जिल्ह्यातील सर्व पदाधीकार्यांच्या मिटिंगा घेवून प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या सुचने नुसार आपल्या जिल्ह्यात कामाचे नियोजन सर्व पदाधकाऱ्यांकडून कामे करून घेणे. संस्थेने वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकांना उपस्थित राहणे. संस्थेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे. जिल्हाध्यक्षांची निवड संस्थेचे संघटन संबंधीत जिल्ह्यात मजबुत आणि भक्कमपणे उभे राहावे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधीकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहे. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. जिल्हाध्यक्षांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा जिल्हाध्यक्षांना पदावरून संस्था दूर करू शकते.
जिल्हाध्यक्षांच्या अनुपस्थित काळात संस्थेचे काम थांबता कामा नये ते अविरतपणे चालू राहावे तसेच जिल्हाध्यक्षांना त्यांच्या कामात त्यांना मदत व्हावी उदेशाने संस्थेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हीउपाध्यक्ष पदावर करतात. या पदाधीकाऱ्यांना वेळोवेळी मानधन दिले जाते. संस्थेने वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकांना उपस्थित राहणे. संस्थेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे. जिल्हाउपाध्यक्षांची निवड संस्थेचे संघटन संबंधीत जिल्ह्यात मजबुत आणि भक्कमपणे उभे राहावे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधीकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहे. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. जिल्हाउपाध्यक्षांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा जिल्हाउपाध्यक्षांना पदावरून संस्था दूर करू शकते.
संस्थेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सरचिटनिस पदी एका व्यक्तीची निवड करतात. या पदाधीकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधीत जिल्ह्याचा पत्र व्यवहार आणि आर्थिक व्यवहार पाहण्याचे काम केेले जाते. तसेच जिल्हाध्यक्षांंना त्यांच्या कामाात मदत करण्याचे कामही जिल्हा सरचिटनिस करत आसतात. तालूका सरचिटनिसनां मार्गददर्शन करण्याचे काम जिल्हा सरचिटनिस करत आसतात. या पदाधीकाऱ्यांना वेळोवेळी संस्थे कडूून मानधन दिले जाते. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. जिल्हा सरचिटनिसांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा जिल्हा सरचिटनिसांना पदावरून संस्था दूर करू शकते.
महाराष्ट्रातील संस्थेचेे संघटन अधिक मजबुत व्हावे आणि प्रत्येक पदाधीकाऱ्यांंचे एकमेेकांशी कम्युनेकेशन व्यवस्थित राहावे यासाठी प्रत्येक जिल्ह्ययावर जिल्हा संपर्क प्रमुखांची निवड प्रदेशाध्यक्ष करतात. हे पदाधीकारी जिल्ह्यातील सर्व पदाधाकाऱ्यांना जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करतात. जिल्हा संघटन बांधणीमध्ये मोलाचे योगदान जिल्हा संपर्क प्रमुखाचे आहे. वेळोवेळी संस्थे तर्फ या पदाधीकाऱ्यांना मानधन व प्रवास भत्ता दिला जाते. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. जिल्हा संपर्क प्रमुखांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा जिल्हा संपर्क प्रमुखांना पदावरून संस्था दूर करू शकते.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा स्तरावर संस्थे कडून एका जिल्हा प्रवक्ताची निवड केली जाते. संबंधीत जिल्ह्यात संस्थेच्या संदर्भात किंवा एखाद्या पदाधीकाऱ्यांच्या विरोधात काही वाद निर्माण झाला तर संस्थेची बाजू भक्कपणे जनते समोर आणि मिडीयात मांडण्यासाठी या जिल्हा प्रवक्तांची निवड केली जाते. या पदाधीकाऱ्यांना वेळोवेळी मानधन आणि प्रवास भत्ता दिला जातो. जिल्हा प्रवक्ता पदाची निवड संस्थेचे संघटन संबंधीत जिल्ह्यात मजबुत आणि भक्कमपणे उभे राहावे तसेच जिल्हाध्यक्षांस त्यांच्या कामात मदत व्हावी या उद्देशाने करण्यात आलेली आहे. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. जिल्हा प्रवक्तांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा जिल्हा प्रवक्तांना पदावरून संस्था दूर करू शकते.
महाराष्ट्रातील एकूण सात विभाग असून या प्रत्येक विभागावर एका विभाग प्रमुखाची निवड संस्थेकडून केली जाते. या पदाधिकाऱ्या मार्फत संबंधीत विभागातील प्रत्येक जिल्ह्याच्या कामाचे नियोजन केले जाते आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात संस्थेचे संघटन वाढविण्याची जबाबदारी दिली जाते. या पदाधीकाऱ्यांना विशेष अधिकर संस्था देत असते परंतू कोणताही निर्णय घेण्यपुर्वी त्यांनी संस्थेची पुर्व परवानगी घेणे अवश्यक आहे. या पदाधीकाऱ्यांना संस्थे कडून मानधन आणि वेळोवेळी प्रवास भत्ता दिला जातो. विभाग प्रमुख आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. विभाग प्रमुखाचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा विभाग प्रमुखांना पदावरून संस्था दूर करू शकते.
महाराष्ट्रातील एकूण सात विभाग असून या प्रत्येक विभागावर एका उपविभाग प्रमुखाची निवड संस्थेकडून केली जाते. या पदाधिकाऱ्या मार्फत संबंधीत विभागातील विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या कामाचे नियोजन केले जाते आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यात संस्थेचे संघटन वाढविण्याची जबाबदारी दिली जाते. या पदाधीकाऱ्यांना विशेष अधिकर संस्था देत असते परंतू कोणताही निर्णय घेण्यपुर्वी त्यांनी संस्थेची पुर्व परवानगी घेणे अवश्यक आहे. तसेच विभाग प्रमुखांना त्यांच्या कामात त्यांना मदत करण्याचेही काम करावे लागते. या पदाधीकाऱ्यांना संस्थे कडून मानधन आणि वेळोवेळी प्रवास भत्ता दिला जातो. विभाग प्रमुख आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. विभाग प्रमुखाचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा विभाग प्रमुखांना पदावरून संस्था दूर करू शकते.
महाराष्ट्रातील संस्थेचेे संघटन अधिक मजबुत व्हावे आणि प्रत्येक पदाधीकाऱ्यांंचे एकमेेकांशी कम्युनेकेशन व्यवस्थित राहावे यासाठी प्रत्येक विभागावर विभाग संपर्क प्रमुखांची निवड प्रदेशाध्यक्ष करतात. हे पदाधीकारीविभागीतील सर्व पदाधाकाऱ्यांना विभाग प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन करतात. विभाग संघटन बांधणीमध्ये मोलाचे योगदान विभाग संपर्क प्रमुखाचे आहे. वेळोवेळी संस्थे तर्फ या पदाधीकाऱ्यांना मानधन व प्रवास भत्ता दिला जाते. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही.विभाग संपर्क प्रमुखांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा विभाग संपर्क प्रमुखांना पदावरून संस्था दूर करू शकते.
महाराष्ट्रातील प्रत्येक विभाग स्तरावर संस्थे कडून एका विभाग प्रवक्ताची निवड केली जाते. संबंधीत विभागात संस्थेच्या संदर्भात किंवा एखाद्या पदाधीकाऱ्यांच्या विरोधात काही वाद निर्माण झाला तर संस्थेची बाजू भक्कपणे जनते समोर आणि मिडीयात मांडण्यासाठी या विभाग प्रवक्तांची निवड केली जाते. या पदाधीकाऱ्यांना वेळोवेळी मानधन आणि प्रवास भत्ता दिला जातो.विभाग प्रवक्ता पदाची निवड संस्थेचे संघटन संबंधीत विभागात मजबुत आणि भक्कमपणे उभे राहावे तसेच विभाग प्रमुखास त्यांच्या कामात मदत व्हावी या उद्देशाने करण्यात आलेली आहे. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. विभाग प्रवक्तांचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा विभाग प्रवक्तांना पदावरून संस्था दूर करू शकते.
संस्थे कडून महाराष्ट्र राज्यात संस्थेची संघटना मजबूत करून कामाचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पदावर एका पदाधीकाऱ्याची निवड केली जाते. या पदाधिकाऱ्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भरातून संस्थेच्या कामाचे नियोजन निश्चित केले जाते या पदाधिकाऱ्यास संस्थेचे निर्णय घेण्याचे सर्व प्रकारचे अधिकार बहाल केलेले असतात. राज्यातील सर्व पदाधीकाऱ्यांना कामाचे निर्देश देण्याचे अधिकार असतात. या पदाचा वापर स्वत:च्या स्वार्थासाठी किंवा दूरूपयोग करता येणार नाही. प्रदेशाध्यक्षाचे वर्तन संस्थेच्या उद्देशाच्या विरूध्द जात असेल किंवा संस्थेला नुकसान पोहचवत असेल तर अशा प्रदेशाध्यक्षांना पदावरून संस्था दूर करू शकते.