आज वो दिन है , जो ख्वाबो में भी ना सोचा था कभी |
सुना है ऐसा होता है, उस ख्वाजा के दरबार मे भी ||
शरीर आणि आत्मा
शरीराचे असणारे क्षणिक अस्तित्व आणखी आत्माचे भावनाविश्व यांचा समतोल, तसेच या दोघांचा एकमेकांशी असणारा संबंध व एकमेकांना पूरक असणारे गुण व दोष समजण्याचा एक अयशस्वी प्रयत्न .....
तुझ्या असण्याला एक लकेर
माझ्या हसण्याला एक दुःख
जाणीवेडीच्या पलीकडले हे जे सत्य
एकमेका बांधणारे हेच विश्व
आयुष्य म्हणजे उत्सव असावा | रोजच्या जगण्याचा एक सोहळा असावा ||
प्रत्येक क्षण फक्त अन फक्त आनंदाने भरलेला |
कारण दुःखाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असावा ||
आयुष्य म्हणजे उत्सव असावा | रोजच्या जगण्याचा एक सोहळा असावा ||
नाव चैतन्याने डवरलेले हि पाने फुले रस्ते | या सर्वांमध्ये तुझाही सहभाग असावा ||
तू असाकाही त्यांच्याशी एकरूप व्हावास | कि त्यांनाही तू त्यांच्यातलास एक वाटावास ||
आयुष्य म्हणजे उत्सव असावा | रोजच्या जगण्याचा एक सोहळा असावा ||
- प्रमोद उबारे
पाहतो मी रोज स्वतःला मरताना |
स्वतःला थोडे थोडे दुसऱ्यांसाठी बदलताना ||
हट्ट त्यांचेच पुरवण्याचा प्रयत्न सुद्धा असतो इथे|
कारण माझा आनंदच हरवला आहे ,या साऱ्यांच्या गर्दी मध्ये||
राहिलो नाही आता मीच माझा माझ्यासाठी|
त्यांच्याच साठी होतो कदाचित
पण त्यांनीही कधी आपले केले नाही ||
- प्रमोद उबारे
या एकाच नाण्याच्या दोन बाजू
का एका वळणावरचे दोन मार्ग
कारण.........
लढण शक्य नसते जेव्हा मान्य असते रडण ||
अन,
रडण विसरून जाते जेव्हा स्वीकारलेलं असतं लढण ||
बऱ्याच वेळेस असे होते, आपण काहीही करत नसताना एकदम निवान्त क्षणी डोक्यात कोणतेच टेन्शन, काम नसताना मन उगाचच आपल्या आयुष्यातील जुने जुने अनुभव, प्रसंग यांचे सिंहावलोकन करायला सुरु करते, आणि त्या सर्व आठवणीत आपण पूर्ण बुडून जातो. त्यावेळच्या मनाची हि अवस्था ....
जन्मापासूनचे क्षण सारे, एकाच वेळी जगतो मी ||
ताज्या दमाच्या आठवणी, म्हणून जपून ठेवतो मी ||
मग दाटिवाटीमध्ये या साऱ्यांच्या, गुदमरायला होते सुरु ||
तरीही तसेच राहावे वाटते, या मनाचे मी काय करू ||
- प्रमोद उबारे
दोघांचे जेव्हा भांडण होते, मग काही वेळानी किंवा तासांनी किंवा दिवसांनी , तर कधी काही मोठ्या स्थित्यंतरनंतर काही वर्षांनी ते दोघे जर एकत्र येतील. त्यावेळी त्यांची भावना काही अश्या असू शकतात ...
तुझे नि माझे हे क्षण आत्ताचे
जशी ओढा मातीला पावसाची असे
शोधू पुन्हा नव्याने एकमेकास तेव्हा
भेटेल तेच हळवे मृदगंध सोबतीचे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
सारत नाही रात्र शी हि | आठवणींनी सजलेली ||
त्याचच आठवणींच्या झगमगाटात | डोळ्यावरची झोप उडालेली ||
भविष्यातल्या माझ्या उदयाला
आजची माझी आस असे
हातात आहे तो मी आत्ताच
तरी पामराला भान नसे
-----------------------------------------------------
शब्द माझे रंग होती | संगतीत या तुझ्या सवे ||
रंग संगती अशीच त्यांची | घडवतील आयुष्य नवे ||
---------------------------------------------------
बऱ्याचदा आपणास आपल्या कामामध्ये परिपूर्णता नाही आढळत. तेव्हा थोडे वाईट वाटते. पण तेथे परिपूर्णता जरी नसली तरी त्या कार्यात आपलेपणा किव्हा एक स्व-पण आपणास समाधान देणारे असते. त्याबद्दलच .......
चुकलो जरी मी येथे स्पर्श माझा त्याला
परका कधीच नसतो भावनांच्या रस्त्यांना
मिळतो तेव्हा अर्थ वाट्यातल्या अनुभनांना
एवढेच पुरे आहे ओंजळीतल्या आनंदाला
Thanks for Marathi typing : https://marathi.indiatyping.com/