स्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ आहेर बोरगाव संचलित नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव ची स्थापना 17 जून 1997 रोजी करण्यात आली. महात्मा गांधी यांचा खेड्याकडे चला हा संदेश , कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श मा.आ.हरिभाऊ काका लहाने यांची प्रेरणा व राजेन्द्र लहाने यांच्या नेतृत्वाखाली " जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे " हे ब्रीद घेऊन संस्था यशस्वी वाटचाल करत आहे .