ऋणनिर्देश

भाषा, चित्रकला, संगीत, अध्यात्म या विषयी अभिरुची आणि त्यासाठी आवश्यक असलेले उपजत गुण, पूरक वातावरण, प्रोत्साहन हे मला माझ्या आई वडिलांकडून मिळाले. दोघांनी सर्व लेख वाचून त्यामधील प्राथमिक शुद्धलेखन तपासले आणि तत्त्वज्ञानाच्या दृष्टिने कमतरता दूर व्हाव्यात म्हणून माझ्या बरोबरीने काम केले. माझ्या सर्व यशापयशामधले नेहमीचे भागीदार असणा-या माझ्या आई वडिलांचे ऋण मानावे तितके थोडेच आहे !

ऑगस्ट 2018 मध्ये माझे मांडीचे हाड मोडले त्यामुळे मग पुढचे अनेक महीने घरात राहून विश्रांती घेण्याशिवाय पर्याय नव्हता. या कालावधीमध्ये मला भावलेल्या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर लेखन झाले. माझ्या पत्नीने या आजारपणामध्ये माझ्या शुश्रूषेमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. माझ्या मुलाने प्रत्येकवेळा लेखांचे प्रिंट काढणे, चित्रांचे डिजिटायजेशन करणे, पुस्तके शोधणे, स्टेशनरी आणणे यासारखी असंख्य कामे माझे हात पाय होऊन केली. तसेच अनेक जिवलगांनी मला हे काम करीत असताना प्रोत्साहीत केले. माझ्या या लेखमालेच्या निर्मितीमध्ये या सर्वांचे योगदान आहे असे मी मानतो. अन्याथा हे शक्य झाले नसते. सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.