जीवनधारा बहुउद्देशीय संस्था , पांढरकवडा मध्ये मी डॉ. प्रितेश मल्हारी बत्तलवार आपले सहर्ष स्वागत करीत आहो. समाज सेवेचे व्रत घेऊन तन मन धनाने काम करणाऱ्या लोकांचा हा समूह आहे. समाजामध्ये राहून समाजापासून विरक्त लोकांना माणसात समाजात आणण्याचे कार्य करण्या साठी खऱ्या अर्थाने जीवनधारा बहुउद्देशीय संस्था २१ सप्टेंबर २००७ साली पांढरकवडा मंगलमूर्ती लेआऊट तह . केळापूर जिल्हा यवतमाळ येथे हि संस्था स्थापन करण्यात आली.
जीवनधारा अपंग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र, पांढरकवडा हे शासन मान्यता प्राप्त स्वयंसेवी व लोककल्याणकारी अपंगांच्या कल्याणासाठी संस्था जीवनधारा बहुउद्देशीय संस्था, पांढरकवडा र. नं. महा /४८३/२०१० एफ १३९३०/य द्वारा स्थापित विनाअनुदानित केंद्र आहे.
२०१३ साली २१ सप्टेंबर ला जीवनधारा अपंग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्र विधिवत स्थापन करून महाराष्ट्रातील अपंग , विकलांग, दिव्यांग बंधू आणि भगिनी यांच्या सर्वांगीण विकास साधने त्यांना शासकीय प्रशासकीय नियम कायदे योजना यांची माहिती देणे प्रशिक्षण देणे स्वावलंबी बनविणे हा आमचा मानस आहे.
या साठी संस्था जीवनधारा बहुउद्देशीय संस्था अपंग / दिव्यांग बंधू भगिनींना मोफत नोंदणी करून संस्थे अंतर्गत व शासकीय व धर्मादाय मदत करते.
आमचा उद्देश्य :
अपंगत्वावर मात मिळवण्यासाठी सर्वतोपरी उपाय करणे , ज्याने अपंगत्वावर मात मिळून मुलाचे / लाभार्थ्यांचे सार्वजनिक जीवनात योग्य पध्दतीने समावेशन होईल.
यवतमाळ विभाग पांढरकवडा विभाग
डॉ. प्रितेश बत्तलवार श्री. शिरीष क्षीरसागर
डॉ. संदीप वानखडे श्री. प्रकाशभाऊ पुरोहित
श्री. अखीन आचार्य कु. बबिता कुंडावे
चंद्रपूर विभाग अकोला विभाग अमरावती विभाग अंजनगाव विभाग
कु. अर्चना मानलवार श्री. सुधीर कडू श्री. अनिरुद्ध जोशी डॉ. नंदकिशोर पाटील