स्वावलंबन

शिक्षण प्रशिक्षण

माहिती व अर्ज

योजना

  • संगणक / कॉम्पुटर प्रशिक्षण योजना
  • टंकलेखन / टायपिंग प्रशिक्षण
  • निर्मिती प्रशिक्षण
  • उद्योग समृद्धी सहायता

स्वावलंबन योजना

मोफत सौर ऊर्जा उपकरण निर्मिती व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित

नगर परिषद पांढरकवडा व जीवनधारा बहुउद्देशीय संस्था पांढरकवडा द्वारा संचालित जीवनधारा दिव्यांग पुनर्वसन व विकास केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १० जानेवारी २०१८ ते १२ जानेवारी २०१८ स्थानिक भचत भवन येथे सकाळी १२ ते ४ वाजेपर्यंत वेळेत सौर ऊर्जा उपकरण निर्मिती व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून सदर प्रशिक्षण हे दिव्यांग , विकलांग, अपंग व्यक्ती, एन. जी. ओ .जीवनधारा संस्थेचे सभासद व नगर परिषद डे -एनयुएलएम स्थापित बचतगटातील महिला सभासदांकरिता निःशुल्क असेल तरी इच्छुक व्यक्तींनी दिनांक ९ जानेवारी २०१८ पर्यंत नगर परिषद कार्यालयातील दिव्यांग कक्षात आधारकार्ड, ३ पासफोटो, देऊन आपला प्रवेश निश्चित करावा जास्तीत जास्त युवक, युवती, महिला बचत गटातील महिला यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन न.प. च्या नवनिर्वाचित अध्यक्ष मा. वैशालीताई नहाते, मा. मुख्याधिकारी व जीवनधारा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ. प्रितेश बत्तलवार यांनी केले आहे.