अपंगत्वाचे 'त्वरीत निदान व हस्तक्षेप'

शुन्य ते पाच वयोगटात विकलांग मुलांचे 'त्वरीत निदान व हस्तक्षेप' (Early detection and Intervention) झाल्यास त्यांना त्यांच्या विकलांगतेवर मात मिळवणे मोठ्या प्रमाणावर सहज शक्य होते. अशा प्रकारचा प्रयोग आम्ही यशस्वीरित्या राबविलेला आहे.

कर्णबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद व अंध प्रवर्गातील मुलांवर वेळीच निदान झाले तर योग्य उपचार करुन त्यांना बरे करणे सहज शक्य आहे. यादृष्टीने जीवनधारा विकलांग ( दिव्यांग ) पुनर्वसन व विकास केंद्राने जनजागृती व उपाययोजनेसाठी पाऊलं उचलली आहेत. या ना त्या कारणाने मुलांना वेगवेगळे अपंगत्व येवून त्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याच्या घटना आजुबाजुला घडतांना दिसतात. मात्र मुलांनी, पालकांनी, वैद्यकीय व्यावसायिकांनी व स्वयंसेवी संस्थांनी वेळीच काळजी घेतली तर अपंगत्वावर मात करणे सहज शक्य आहे. यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.