Zero To Eight
बाल मेंदूचा पूर्ण विकास, हाच असे अमुचा ध्यास !
पालक , शिक्षक आणि प्रत्येक शिक्षणप्रेमी नागरिकासाठी उपयुक्त वेबसाईट !
बाल मेंदूचा पूर्ण विकास, हाच असे अमुचा ध्यास !
मेंदू विकास आणि बालशिक्षण याबाबत सोप्या मराठीतून वैज्ञानिक माहिती देणारी वेबसाईट
A website with a focus on Brain Based Learning
‘मेंदू ज्या नैसर्गिक पद्धतीने शिकण्यासाठी निर्माण झाला आहे, त्या पद्धतीला अनुसरून शिकणे,म्हणजे मेंदूआधारित शिक्षण होय’.
- प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ. एरिक जेनसेन
पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले तर कोणत्याही बालकाच्या मेंदूचा पूर्ण क्षमते एवढा विकास होणे शक्य आहे. जन्मापासून आठ वर्षे हा त्यासाठी सर्वात उत्तम काळ असतो. याबाबत सर्वांची जागृती करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मेंदूचा पूर्ण विकास झालेले बालक मोठेपणी वैयक्तिक,कौटुंबिक, शैक्षणिक, व्यावसायिक,सामाजिक अशा जीवनाच्या सर्व बाबतीत यशस्वी होण्याची शक्यता वाढते.
Our Focus
आमची निवड का करावी ?
आम्ही विषयाचे जाणकार आहोत. ( Content Knowledge )
विषय सोप्या पद्धतीने मांडण्यामध्ये आम्ही अनुभवी आहोत. ( Pedagogical Knowledge )
माहिती सर्वत्र पोहोचविण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान वापरतो. ( Technological Knowledge )
Please see our credentials in` About ' section .
आमचे काही लोकप्रिय ऑनलाईन कोर्सेस आणि इतर साहित्य
शिक्षणासाठी मेंदू कसे कार्य करतो ?
ऑनलाईन कोर्स
मेंदू आधारित शिक्षणाचा आग्रह धरा !
ऑनलाईन कोर्स
बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय ?
ई - बुक
पालकांना ही माहिती असायलाच हवी ! (माहिती, ज्ञान, क्षमता, कौशल्य यांचा नेमका अर्थ )
ऑडिओ बुक
आमच्या या साहित्याबाबत निवडक अभिप्राय
डॉ. बाळकृष्ण बोकील हे एक निष्णात शिक्षक आहेत.....बालशिक्षणाच्या क्षेत्रात सध्या आमूलाग्र बदल होत आहेत......हे नवे ज्ञान समाजात उतरविण्याचे फार मोठे काम डॉ. बोकील यांनी हाती घेतले आहे.....याची साक्ष म्हणजे हे श्राव्य पुस्तक आहे.....पालकांनी हे पुस्तक विकत घ्यावे, रोज थोडे थोडे ऐकावे, जमले तर त्याचे नियमितपणे पारायणही करावे......त्यामुळे प्रौढ व्यक्ती आपल्या बालकांच्या जीवनशास्त्रात तरबेज होतील.....डॉ. बोकीलांचा हा श्राव्य ग्रंथ...... बालकांच्या संदर्भात प्रौढांना अधिक प्रौढ करणारा आणि ज्ञानसंपन्न करणारा ग्रंथ आहे.
डॉ. दिनेश नेहेते, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद
' बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय ? ' ह्या
ई - बुकला गोष्टीरूप दिल्याने रचना अत्यंत उत्तम आणि समजायला खूप सोपी झाली आहे. हे पुस्तक वाचल्याने खूप छान जनजागृती होऊ शकणार आहे.
सुषमा पाध्ये, ग्राममंगल प्रायोगिक शाळा , जि. पालघर.
देश विदेशातील अनेक कोर्सेस डॉ. बोकील यांनी केले आहेत. या सर्व अभ्यासातून त्यांनी पालक आणि शिक्षकांना उपयोगी पडतील असे on line कोर्सेस आणि ऑडिओ पुस्तके तयार केली आहेत.
मेंदू रचना आणि कार्य, मेंदू आधारित शिक्षण, मेंदूतील शिकण्याची प्रक्रिया इत्यादी ऑडिओ पुस्तके आठ वर्षे वयापर्यंतच्या बालकांच्या मेंदूचे विश्व आपल्या समोर सोप्या भाषेत उलगडून ठेवतात.
पालक,शिक्षक,समाज आणि बालशिक्षण हे ऑडिओ पुस्तक बालकांशी संबंधित सर्वांनाच उपयुक्त आहे. खूपच उपयुक्त संदर्भ दिले आहेत.
बागेश्री नाईक, शिक्षिका , मिशिगन, USA
Early Childhood Education मध्ये येथील (USA मधील ) डिग्री मिळाली. त्यामुळे हा जॉब मिळाला . या संपूर्ण प्रोसेसमध्ये मला डॉ . बोकील यांच्या या साहित्याची आणि मार्गदर्शनाची खूप मदत झाली.
या अनुभवांच्या आधारे मी या क्षेत्रात अधिक प्रगल्भतेने विचार करायला शिकले आणि परिणामकारकरित्या उपक्रम योजून राबवले.
डॉ. बोकील यांच्या योगदानामुळे आमच्या कार्यक्रमांची गुणवत्ता तर वाढलीच, पण याशिवाय या कार्यक्रमांचा प्रसारही मोठ्या प्रमाणावर साधता आला.
त्यांनी शैक्षणिक दृष्टीकोन आणि प्रत्यक्ष वास्तव यांची सांगड घालून एक शाश्वत आणि परिणामकारक बालशिक्षणाचा नमुना घडविण्यास हातभार लावला, जो आज अनेक शिक्षक, पालक व समुदायासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सुहास परळे, साहित्यिक आणि निवृत्त ऑडिट ऑफिसर, पुणे.
‘बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय ?’ हे आपले ई-बुक वाचले. आपण सांगितलेले बुद्धिमत्तेचे आठ प्रकार वाचून 'आपण या दृष्टीने कधी विचारच करीत नाही', याची प्रखरतेने जाणीव झाली.
पालक, शिक्षक आणि बालशिक्षणाचे अभ्यासक यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे आणि मुलांच्या ख-या बुध्दिमत्तेच्या .विकासाला चालना द्यावी असे वाटते.
इतके सुंदर पुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद.
प्रज्ञा कुलकर्णी, गृहिणी , दुबई, (UAE)
माझ्या दोन्ही मुलांची मानसिकता समजून घेण्यासाठी मला या साहित्याचा फार उपयोग झाला.
माहिती, ज्ञान, बुद्धिमत्ता या संकल्पना नेमकेपणाने समजल्या. त्यामुळे आधीच्या काही चुकीच्या समजुती दूर झाल्या.
आमचे हे साहित्य तसेच इतर ऑनलाईन कोर्सेस, ऑडिओ बुक्स आणि ई-बुक्स याबाबत अधिक माहिती
`Study Materials ' या विभागात पहा.
चला, आपण एकत्रितपणे पुढील पिढी सक्षम करू या !