N-LIST  म्हणजे काय ?

e-SodhSindhu Consortium, INFLIBNET सेंटर, INDEST-AICTE कन्सोरशिया आणि, आय.आय.टी. नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेला प्रकल्प म्हणजे Nationals Library and Information Services for Scholarly Content (N-LIST)   होय. या प्रकल्पाच्या माध्यमातून काही e-resources full text स्वरूपात प्राप्त केले जाऊ शकतात. N-LIST प्रकल्प INFLIBNET केंद्रावर स्थापित केलेल्या सर्व्हरद्वारे महाविद्यालये आणि इतर वर्गणीदार  संस्थांमधील विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना e-resources सेवा प्रदान करतो.या माध्यमातून अधिकृत वापरकर्ते म्हणून सोबत प्रमाणे नोंदणी (Registration) झाल्यानंतर महाविद्यालयातील अधिकृत विद्यार्थी,शिक्षक व संशोधक या ई-संसाधनांचा वापर करू शकतात आणि त्यांना आवश्यक असलेले लेख थेट प्रकाशकाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात.