Post date: Oct 20, 2009 3:24:23 AM
दै. सकाळ (कोल्हापूर)नं यंदा प्रथमच स्वतंत्र दिवाळी अंक प्रकाशित केला. या अंकासाठी माझे गुरू संजय पाटोळे सर, मित्रवर्य सुजीत पाटील यांनी आवर्जून मला लिहीण्याची गळ घातली. ठोकळेबाज लेख नव्हे, तर काही वेगळं अपेक्षित होतं त्यांना. मग, थोडा विचार केला आणि घेतलं लिहायला. वरिष्ठ पत्रकार, लेखक व कवी विजय चोरमारे सर यांना बिर्ला फाऊंडेशनची फेलोशीप मिळाली असताना, सन २०००मध्ये त्यांच्या या फेलोशीपअंतर्गत सर्वेक्षक म्हणून काम करण्याची संधी चोरमारे सरांनी मला दिलेली होती. या व्यापक सर्वेक्षणानं मला एक व्यक्ती म्हणून खूप समृद्ध केलं, ज्याचा उपयोग मला पुढं माझ्या पत्रकारितेतील कारकीर्दीसाठी झाला. या सर्वेक्षणादरम्यान आलेले काही अनुभवच मी लिहायला घेतले. खूप साऱ्या अनुभवांतून द बेस्ट थ्री निवडून त्यातून हा 'थ्री पीस' साकारला. (सविस्तर वाचा...)