Maha-Movie

Post date: Oct 15, 2009 11:00:59 PM

नागराजचं हेच तर वैशिष्ट्य आहे की, तो एक उत्तम स्टोरीटेलर आहे, तोही एकदम वास्तववादी. त्याच्या या स्टोरीटेलिंगला आयाम लाभले आहेत ते चित्रपट माध्यमाचे! या माध्यमाचे पंख घेऊन एखादा मनस्वी स्टोरीटेलर छोट्याशा कथेला किती वेगळ्या उंचीचे परिमाण लाभवून देऊ शकतो, याचं उदाहरण म्हणजे सैराट. त्यानं सैराट हाताळलायही एकदम सिनेमॅटिक पद्धतीनं.. स्टोरीटेलिंगबरोबर तंत्रावरची त्यानं घेतलेली पकडही जबरदस्त आहे. 'फँड्री'मध्ये तो प्रेक्षकाला गोष्टीबरोबर थेट झुंजवतो.. 'सैराट'मध्ये मात्र पहिल्या हाफमध्ये प्रेक्षकाला आत-आत घुसवतो आणि नंतर कोंबडीप्रमाणं त्याच्या मनावरची दांभिकतेची पिसं काढून त्याचं रबरबीत अंतरंग उघडंवाघडं करून दाखवतो.. ज्याला हे झेपतं तो अंतर्मुख होतो, झेपत नाही तो चेकाळतो.. (सविस्तर वाचा...)

नारायण कांबळेचं काय झालं?

आपल्या प्रेक्षकांना खरं तर 'ॲन्ड दे लिव्ह्ड हॅप्पीली फॉरेव्हर!' यासारख्या कोणत्या तरी कन्क्लुजनला आणून सोडणारे चित्रपट पाहण्याची नको इतकी सवय लागलेली आहे. सारा प्रवास दिग्दर्शकानंच घडवून आणायचा आणि त्यानंतर तो प्रवास व्यवस्थित घडवलाय किंवा नाही, हे ठरवणंच फक्त प्रेक्षकांच्या हातात असतं. त्यामुळं 'डोक्याला ताप नाही' किंवा 'निव्वळ डोक्याला ताप' पॅटर्नच्या चित्रपटांचा भडीमार आपल्यावर सातत्यानं होत राहिला. नागराज मंजुळेच्या 'फँड्री'नं गत वर्षी एक भला मोठ्ठा दगड भिरकावून या पॅटर्नचा चक्काचूर केला. त्यामुळं तो दगड भल्याभल्यांना कुठं कुठं लागला आणि त्या जखमा वेगवेगळ्या पद्धतीनं कशा भळभलत राहिल्या, याचे आपण सारेच साक्षीदार आहोत. चैतन्य ताम्हाणे हा नागराजच्या पुढं एक पाऊल जातो आणि एक सणसणीत चपराक थोबाडात देतो आणि 'कोर्ट' स्थगित करतो. (सविस्तर वाचा..)

‘पीके’चं एलिएनेशन!

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये ज्या धर्ममार्तंडांकडे आपण मोठ्या आशेने पाहतो, किमान त्यांनी तरी यासंदर्भात सारासार विचार करून समाजाला योग्य मार्गदर्शन करणे अपेक्षित असते; मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, अत्यंत प्रखर आणि क्रांतीकारक संदेश ‘पीके’ आपल्याला देऊ इच्छितो, तो म्हणजे डिकास्टींगचा! आजघडीला जातिविरहित समाजव्यवस्थेचा विचारही आपण करू शकत नसताना अत्यंत कौशल्यानं आणि खुबीनं या विचारधारेची पेरणी दिग्दर्शकानं या चित्रपटात केली आहे. जातिविरहित होणं किंवा तसं होण्याचा विचार करणं, ही गोष्ट सोपी नाही. कारण एक गोष्ट सोडली तर त्यानंतर आपल्याला दुसऱ्या कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. तथापि, मानवता हीच जात, तोच धर्म या मूलभूत विचारापासून आपण कोसों दूर आलो आहोत. (सविस्तर वाचा..)