आजच्या जगात आपणास माहीत असलेले वेद हे संस्कृत या क्लिष्ट भाषेतील सुभाषितांनी रचलेले आहेत सुभाषित म्हणजे चार ओळीतील कविताच म्हणावी लागेल कारण कवितेत कमी शब्दांत जास्त अर्थ सामावलेला असतो , यमक जुळणारे शब्द असतात म्हणजे त्यांचे गायन आणि पठन , वदन करणे सोपे जाते आणि म्हणुनच कोणत्याही privacy आणि piracy चा ञास न होता आजही पठन आणि वदनाने हे वेद टिकवून ठेवले गेले आहेत बाकी वैदीक वाङमय बरयाच अंशी बदलत आहेत आणि वेदाच्या ऋचांचाही एक दोष म्हणा किंवा गुणधर्म म्हणा प्रत्येक वाचक स्वतः वाचताना त्या गोष्टींचा वेगवेगळ्या अर्थाने वापर करू शकतो
म्हणुन अनेक लेखक आधुनिक पुराणे बनवण्यात मग्न असताना आधुनिक वेद बनविण्यास सुरुवात करुन त्यांना आव्हान देने आणि तथाकथित जडवाद म्हणा विज्ञान म्हणा किंवा देव,धर्म , अध्यात्म यापेक्षा अन्न, वस्ञ निवारा , आयुष्य याचे महत्व जास्त असते हे समजावण्यासाठी आमचा प्रयत्न
कारण कोणत्या तरी समुहाने कधीतरी आम्हाला कोणत्या तरी ज्ञानापासुन वंचित ठेवल्याची गोष्ट सांगितली जाते आणि आम्हीही आंधळेपणाने त्या गोष्टीसोबत वाहत जातो
पण परिस्थिती कोणतीही असो जो पर्यंत मनुष्य येथे आहे तो ज्ञान संकलित करतो , वापरतो आणि त्या ज्ञानाचा प्रसार करतो हेच ज्ञानाचे हे चक्र चालु ठेवुनच जातो मग ज्ञानाचा प्रसार सर्वदुर होतच असेल तर वंचिताचा प्रश्न नसतो प्रश्न असतो तो गरजेचा आजही काळी जादु , संमोहन यांविषयीचे ज्ञान जगात उपलब्ध असेल गरज नसल्याने ते कोण्या एका समुहाकडेच आहे असो ....
प्रथम गद्यापासुन सुरुवात पुढे क्लिष्टता आणि समुहाचा विस्तार झाल्यावर पद्य आणि अभंग , भारूडे, ऋचा सामाविष्ट होतीलच पण प्राचीन प्राकृतची वंशजा मराठी येथे प्राथमिक भाषा राहील
तरी जगातील मराठीचा अभ्यास करणारया १३ टक्के लोकांपर्यंत हे संकेतस्थळ पोहोचेल अशी अपेक्षा
knowledge ज्ञान
art कला
science विज्ञान
commerce वाणिज्य
languages भाषा
social sciences सामाजिकशास्त्रे