मराठी विभाग 

marathi@ruparel.edu

स्थापना : १९५३ 

विभागप्रमुख: वैशाली जावळेकर 

सहाय्यक: डॉ. अनघा मांडवकर


१९३२ साली स्थापन झालेल्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटी,पुणे अंतर्गत मुंबई,पुणे विभागातील कला,विज्ञान,वाणिज्य,अभियांत्रिकी,विधी आणि व्यवस्थापनाची अनेक महाविद्यालये आहेत जसे की नवरोसजी  वाडिया महाविद्यालय (पुणे), न्यू लॉ कॉलेज (मुंबई), नेस वाडिया कॉलेज (पुणे) इ. या संस्थे अंतर्गत असणारे आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणारे मुंबई माटुंगा विभागातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणजे डी.जी.रुपारेल कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय होय. या महाविद्यालयाची स्थापना १९५२ मध्ये झाली.

१९५३ साली रुपारेल मध्ये मराठी विभाग सुरु झाला आणि मराठी विभागाचे पहिले विभागप्रमुख ल.ग. जोग ह्यांनी मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली.मराठी विभागाच्या या ६४ वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोगा पुढीलप्रमाणे-

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांची नावे :

मीनाक्षी पाटील (सनदी अधिकारी), डॉ.जयश्री शिंदे (एस.एन.डी.टी,शिक्षण तंत्रज्ञान -विभाग प्रमुख) ,डॉ.पुष्पलता राजपुरे तापस (मुंबई विद्यापीठ,मराठी विभाग -विभाग प्रमुख),डॉ.प्रकाश परब (व्याकरणकार, प्राध्यापक वझे-केळकर महाविद्यालय),विजय तापस (नाट्यसमीक्षक,प्राध्यापक राम नारायण रुईया), सुशांत देवळेकर (संशोधक,राज्य मराठी विकास संस्था), अलका रानडे (संपादक),श्वेता प्रधान,कुणाल जाधव  (पत्रकार), रश्मी वारंग (रेडिओ,आकाशवाणी),मेघना एरंडे (आंतरराष्ट्रीय डबिंग कलाकार), श्रुतिका शितोळे, किरण सावंत (सामाजिक संशोधन),अनघा मोडक (निवेदक),शोभा तुंगारे (दूरदर्शन ,बातमीदार),अभिनेते-आसावरी जोशी, प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव, वीणा जामकर, दीपक राजाध्यक्ष इ.

अशाप्रकारे रुपारेल महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे कलावंत,लेखक,प्राध्यापक,अभिनेते,समीक्षक घडविण्यामध्ये मोलाचे योगदान दिसते.अभ्यासक, कलावंत यांच्या अनेक पिढ्या मराठी विभागाने घडविल्या.

विद्यार्थी घडविण्यासाठी मराठी विभागाने मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली आणि वाङ्मय मंडळातर्फे अनेक कार्यक्रम,उपक्रम आयोजित केले.

मराठी वाङ्मय मंडळ (स्थापना १९५३)

प्राचार्य एस.बी. जोशी आणि मराठी पहिले विभागप्रमुख ल.ग जोग यांनी १९५३ साली मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना केली. त्याच्या उद्घाटनासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संचालक श्री. प्रियोळकर ह्यांना बोलावण्यात आले होते. ह्या वाङ्मय मंडळाच्या निमित्ताने अनेक दिग्गज व्यक्ती रुपारेल मध्ये आल्या,अनेक कार्यक्रमांची पायाभरणी झाली आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडल्या.

या वाङ्मय मंडळाच्या उपक्रमाचा आढावा पुढीलप्रमाणे:

उद्घाटन सोहळा :

१९५३ - मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे संचालक  श्री. प्रियोळकर

१९५४ – प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते ना.ग.गोरे,आचार्य अत्रे,इतिहासकार पोतदार व विनोदी साहित्यिक चि.वि.जोशी. 

१९५५- प्रमुख पाहुणे प्रा.श्री.म.माटे आणि वसंत बापट.