शिक्षणातून समाज बदलासाठी एकलव्य
भारत हा जगातील सर्वांत तरुण देश आहे असे आपण मागील काही वर्षांपासून बोलत आणि ऐकत आलो आहोत. पण ते संतूर साबणाच्या जाहिरातीप्रमाणे नुसतं तरुण दिसणं हे आपल्याला परवडणारं नाही. देशाच्या विकासासाठी तरुणांचे किती योगदान आहे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. तेंव्हाच त्या तरुण असण्याला अर्थ आहे. पण दुर्दैवाने आपला देश तरुण बेरोजगारांचा अशी ओळख झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार या वर्गाला तर वेगळा आरक्षण लागू करावे की काय अशी पाळी आलेली आहे. यांच्यासाठी सुशिक्षित बेरोजगार सक्षमीकरण योजना करावी लागली तर नवल वाटू नये. तो एवढा दुर्बल झाला आहे की फक्त कीव येते. एकीकडे तरुण देश म्हणून भारताकडे जग जिंकण्याची संधी असताना दुसरीकडे हा तरुणच पीडित असणे यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते. अशी परिस्थिति जन्माला घालण्यात जेवढे सरकार जबाबदार आहेत तेवढेच स्वतः तरुणही जबाबदार आहेत.
देशाच्या विकासात तरुणांचे जास्तीत जास्त योगदान निश्चित करण्याची काळाची गरज असून त्यासाठी तरुणांना सक्षम करणे आवश्यक आहे आणि त्यांना तसे सक्षम बनवण्याची जबाबदारी तेथील शिक्षण व्यवस्थेची आहे. पण दर्जेदार उच्च शिक्षणाची आपल्या देशात वानवा आहे. जी काही थोडेफार चांगली विद्यापीठे वा संस्था आहे तिथे शहरी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांचा टक्का जास्त असून ग्रामीण विद्यार्थ्यांची मोठी संख्या अजून वंचित आहे. ग्रामीण भागात उच्च शिक्षण घेण्याची परांपराच नाही. खेड्यापाड्यात उच्च शिक्षण वगैरे या अंधश्रद्धा असतात. विदर्भ मराठवड्यातली पोरं 12 वी झाल्याबरोबर पोलोस भरती, रेल्वे भरती, कर्मचारी चयन आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर सरकारी खात्याच्या भरती परीक्षेच्या तयारी साठी तालुक्याच्या,जिल्ह्याच्या ठिकाणी, नागपूर आणि पुण्या सारख्या ठिकाणी धाव घेतात. पुढची काही वर्षांसाठी ती स्पर्धा परिक्षार्थी होऊन जातात. अशा विद्यार्थ्यांची नवीन जात महाराष्ट्रभर उदयास आली आहे. दरवर्षी अशा लाखो स्पर्धा परिक्षार्थ्यांची भर पडत आहे. त्यांचे पुढचे शिक्षण स्पर्धा परीक्षांच्या शिकवणी वर्गातून घडते. शैक्षणिक विद्यापीठांची जागा अशा खाजगी शिकवणी सस्थांनी घेतल्याचे चित्र आज महाराष्ट्रभर दिसत आहे.
शासकीय नोकरीतील संधी कमी असल्यामुळे तीन वर्षे, पाच वर्षे आणि दहा वर्षे परीक्षांच्या तयारीसाठी घालवूनही हाती यश लागण्याची शक्यता अत्यंत कमीच. असे असूनही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण, कुंटुंबाचा आणि आणि समाजाचा दबाव, पालकांच्या अपेक्षा, पर्यायांची अनभिज्ञता यामुळे ग्रामीण रातून स्पर्धेच्या दुष्टचक्रात फसलेले आहेत. आयुष्यातील महत्वाची वर्षे घालवूनाही यश न आल्याने असे तरुण आत्मविश्वास हरवून शेवटी हताश होऊन बसतात.
अशा तरुणांना उच्च शिक्षणाच्या मार्गाने योग्य वाट दाखवून समाज विकास क्षेत्रात करीयरच्या पर्यायी संधी मिळवण्यासाठी एकलव्य हे तरुणांचे व्यासपीठ बनले आहे. ग्रामीण तरुणांची गरज लक्षात घेऊन एकलव्य ने विविध उपक्रम सुरू केलेले आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील टक्का वाढवून समाज परिवर्तनासाठी तरुण कार्यकर्ते निर्माण करण्याच्या ध्येयाने एकलव्य ही महाराष्ट्रात चळवळ म्हणून उदयास येत आहे. उच्च शिक्षणापासून ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेने वंचित आहेत. ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाविषयीचा नकारात्मक दृष्टीकोण, पालकांचे अज्ञान आणि आर्थिक दुर्बलता यासारख्या अनेक कारणांमुळे ग्रामीण विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातून होणारी गळती ही गंभीर समस्या आज आपल्यासामोर आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सप्पोर्ट सिस्टम
एकलव्य अकादमी ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ आणि शैक्षणिक सस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यसाठी मदत करत आहे. जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी दिल्ली, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IIT) मधील सामाजिक विज्ञान आणि मानव विद्याशाखा भारतीय, बनारस हिंदू विद्यापीठ, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, अंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई, सेंट जेवियर्स सामाजिक विज्ञान संस्था, अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर, कर्वे समाजकार्य संस्था पुणे, आणि निर्मला निकेतन समाजकार्य संस्था मुंबई अशा प्रतिष्ठित आणि नामवंत विद्यापीठ आणि शैक्षणिक सस्थांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी एकलव्य अकादमी ही सप्पोर्ट सिस्टम म्हणून मदत करत आहे.
दोन वर्षा आधी यवतमाळ येथील सावित्री ज्योति समाजकार्य महाविद्यालयात एकलव्य अकादमी ची सुरुवात झाली. पहिल्या बॅच मध्ये 7 विद्यार्थ्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर येथे पाठवण्यात यश आले. हे विद्यार्थी एम ए एड्युकेशन, डेवलपमेंट स्टडीज, रूरल डेवलपमेंट, लाइवलीहूड अँड सोशल आंत्रप्रनरशिप, दलित अँड ट्रायबल स्टडीज, मेंटल हेल्थ आणि लॉं अशा अभ्यासक्रमात उच्च शिक्षण घेत आहेत. दुसर्या बॅच मध्ये 60 विद्यार्थ्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर साठी प्रवेश परीक्षा दिली आणि जवळपास 30 विद्यार्थांनी या सस्थांमध्ये प्रवेश मिळवला. 20 विद्यार्थी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि 10 अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर येथे निवड झाले असून जवळपास 15 विद्यार्थी निवड प्रतीक्षा यादीत आहेत. नवीन बॅच मध्ये 75 पेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करत आहे.
विविध विषयावरील वैचारिक बदल घडवणारी पुस्तके एकलव्य टीमच्या वतीने देण्यात आली.
कारागृहातील बंदिस्त बंदी बांधवांच्या विचारात परिवर्तन व्हावे, त्यांच्या जगण्याला नवा आयाम प्राप्त व्हावा, जिल्हा कारागृहातील बांधवाच्या जगण्यातील निराशा दूर व्हावी आणि त्यांच्या जगण्यात नवी उमेद निर्माण होण्यासाठी एकलव्य टीमने पुढाकार घेतला.
https://www.facebook.com/hashtag/firststep4roboticsinruraleducation?source=feed_text