एकलव्य अकादमी ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांना देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ आणि शैक्षणिक सस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यसाठी मदत करत आहे. जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी दिल्ली, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IIT) मधील सामाजिक विज्ञान आणि मानव विद्याशाखा भारतीय, बनारस हिंदू विद्यापीठ, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, अंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई, सेंट जेवियर्स सामाजिक विज्ञान संस्था, अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर, कर्वे समाजकार्य संस्था पुणे, आणि निर्मला निकेतन समाजकार्य संस्था मुंबई अशा प्रतिष्ठित आणि नामवंत विद्यापीठ आणि शैक्षणिक सस्थांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी एकलव्य अकादमी ही सप्पोर्ट सिस्टम म्हणून मदत करत आहे.
दोन वर्षा आधी यवतमाळ येथील सावित्री ज्योति समाजकार्य महाविद्यालयात एकलव्य अकादमी ची सुरुवात झाली. पहिल्या बॅच मध्ये 7 विद्यार्थ्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर येथे पाठवण्यात यश आले. हे विद्यार्थी एम ए एड्युकेशन, डेवलपमेंट स्टडीज, रूरल डेवलपमेंट, लाइवलीहूड अँड सोशल आंत्रप्रनरशिप, दलित अँड ट्रायबल स्टडीज, मेंटल हेल्थ आणि लॉं अशा अभ्यासक्रमात उच्च शिक्षण घेत आहेत. दुसर्या बॅच मध्ये 60 विद्यार्थ्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर साठी प्रवेश परीक्षा दिली आणि जवळपास 30 विद्यार्थांनी या सस्थांमध्ये प्रवेश मिळवला. 20 विद्यार्थी टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि 10 अजीम प्रेमजी विद्यापीठ बंगळूर येथे निवड झाले असून जवळपास 15 विद्यार्थी निवड प्रतीक्षा यादीत आहेत. नवीन बॅच मध्ये 75 पेक्षा जास्त विद्यार्थी तयारी करत आहे.
Books collection drives for this project are being organised in different cities.
टीम एकलव्य तर्फे जून महिन्यात पुण्यात पहिली पुस्तक संकलन मोहीम आयोजित करण्यात आली होती, त्यात पुणेकरांनी पुस्तकांच्या स्वरूपात भरभरून योगदान दिले.त्यानंतर यवतमाळ,औरंगाबाद,अमरावती,अहमदनगर, मुंबई व ठाणे शहरांत घेण्यात आलेल्या मोहिमेत जवळ जवळ 30 हजार पुस्तके संकलित झाली.
ग्रामीण महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे,वाचनसंस्कृती जोपासली जावी व गावागावातील ग्रंथालये ही केवळ वाचनकेंद्र न राहता गावाची शाश्वत विकासकेंद्र असावीत ह्या उद्देशाने टीम एकलव्य ने गाव तिथे ग्रंथालय हा उपक्रम हाती घेतला .
पिंप्री खंदारे , जि.बूलढाना या गावी जि.प. प्राथमिक शाळेमधे Team-एकलव्य आणि विद्यार्थी विकास बचत गट यांच्या संयुक्त प्रयत्नातून एक Digital Class Room उभा करण्यात आला , याच उद्घाटन दि.१८ डिसेंबर २०१७ रोज़ी करण्यात आले.