जगात अनेक शास्त्रज्ञ झाले, अनेक हुकुमशहा झाले, अनेक विचारवंत झाले, अनेक राजकीय नेते झाले. पण हे जग खऱ्या अर्थाने घडवलं ते म्हणजे या १० व्यक्तींनी ज्यांचा आदर, सन्मान आजही जगाच्या सर्व कानाकोपऱ्यात होतो .
इटलीत जन्मलेला क्रिस्तोफर कोलंबस जगातील महान संशोधक म्हणून ओळखला जातो. अटलांटिक समुद्र ओलांडून आशियाच्या शोधासाठी तो निघाला होता. तो आशियात काही पोहोचला नाही, पण त्याने जे ठिकाण शोधून काढले त्यास जग आज अमेरिका या नावाने ओळखते.
ब्रिटनच्या विल्यम शेक्सपियरची नाटके संपूर्ण जगाला परिचित आहेत. तो केवळ महान नाट्यलेखक नव्हता तर त्याने १५४ सुंदर व आशयधन कवितांचीही रचना केली होती. त्याच्या महान नाटकांमध्ये हेम्लेट, किंग लियर, रोमियो-ज्युलियट आणि मेकबेथ यांचा समावेश होता. शेक्सपियरने इंग्रजी भाषेसाठी १७०० नवीन शब्दही तयार केलेले आहेत.
पृथ्वीवर जीवसृष्टीचा विकास कसा झाला होता, यासंबंधी सगळ्यात आधी चार्ल्स डार्विननेच जगाला सांगितले होते. त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत निसर्गाच्या एक गहऱ्या रहस्याचा भेट करतो.
जर्मनीत जन्मलेला कार्ल मार्क्स थोर विचारवंत म्हणून ओळखला जातो. त्याने मांडलेल्या साम्यवादाच्या सिद्धांताने जगभरात भांडवलवादी शोषणाविरोधात अनेक देशांत आंदोलनाला गती दिली होती. अनेक भांडवलशाही सत्ताधीश या आंदोलनांमुळे सत्ताभ्रष्ट झाले. त्याच्या या विचारांचा प्रभाव आजही जगावर कायम आहे.
भौतिकशास्त्राची दुनिया बदलणारा हा शास्त्रज्ञ जर्मनीत जन्मला असला तरी त्याचे बहुतांश कार्य अमेरिकेत झाले. भौतिकशास्त्रात अनेक शोध लावणाऱ्या आइनस्टाईनला जग सापेक्षवादाचा सिद्धांत आणि अणुबॉम्बचा जनक म्हणून ओळखते. १९२१ मध्ये त्याला भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता.
अॅडॉल्फ हिटलरचे नाव कुणाला माहित नाही? १९३३ ते १९४५ या काळात जर्मनीवर हुकुमत गाजविणारा हा नाझी नेता प्रचंड खुनशी होता. त्याच्या या स्वभावामुळेच जगावर दुसरे महायुद्ध लादले गेले. सोबतच लाखो ज्यू धर्नियांना छळ छावण्यांमध्ये ठेवून त्यांची निर्दयी कत्तली त्याने घडवून आणल्या. युद्धात पराभव सामोर दिसताच त्याने गोळी झाडून आत्महत्या केली होती.
भारत देशाचे महान असे संविधान लिहून त्यांनी भारत देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्ष देवून अखंड भारत लोकशाही व्दारे भारताला ब्रिटीशांच्या व जाती व्यवस्थेच्या जुलमी राजवटी पासून मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक लढा लढला. कोणत्याही शस्त्राविना भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या लढ्याचा मुख्य आधार होता. तथागत बुध्द यांच्या धम्मातील सत्य व अहिंसा. रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी अशी महान क्रांती केली. भारतीय संविधान लिहून भारत देशाचा इतिहासच बदलून टाकला. त्यांच्या विचारांचा संपूर्ण जगात प्रभाव आहे.
आफ्रिकेतील वर्णभेदविरुद्ध आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या या लोकनायकाला १९६४ मध्ये कैद करण्यात आले होते. तब्बल २६ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १९९२ मध्ये त्यांची मुक्तता करण्यात आली. मात्र तुरुंगातूनच सुरु असलेल्या त्यांच्या आंदोलनाने वर्णभेदाचा अंत केला होता. तुरुंगाबाहेर येताच दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९३ मध्ये त्यांना शांततेच्या नोबेलने गौरविण्यात आले
अमेरिकेच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध लुथर किंग यांनी केलेले कार्य अवघ्या जगाला माहित आहे. गांधीजींपासून प्रेरणा घेत त्यांनीही आपले आंदोलन शांततेच्या मार्गानेच केले होते. १९६४ मध्ये नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या लुथर किंग यांची १९६८ मध्ये हत्या करण्यात आली होती, पण अन्यायाविरुद्धच्या आवाजाच्या रुपात आजही त्यांचे स्मरण केले जाते.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिल गेट्स यांनी विद्दार्थीदशेतच पहिला संगणक तयार केला होता व १९७७ पर्यंत मायक्रोसॉफ्ट कंपनी उभी केली होती. आज संपूर्ण जगात त्यांचे तंत्रज्ञान वापरले जाते. १९९३ मध्ये जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्ती बनलेल्या बिल गेट्सने २००० मध्ये आपली पत्नी मेलिंडाच्या सोबतीने एक संस्था स्थापन केली असून पोलियोसह अन्य खतरनाक आजारांविरोधात ती जगभर कार्य करते.