Websites for preparation of MPSC Exams
Maharashtra Public Service Commission (Official Website)
Websites for preparation of UPSC Exams
Govt. Websites
Union Public Service Commission (Official Website)
Press Information Bureau Government of India (for Govt. Planning updates)
PRS Legislative Research (for tracking bills in Parliament)
Institute for Defence Studies and Analyses (Defence and Foreign relations)
Indian Council on Global Relations (Globalisation and world affairs )
Ministry of Environment, Forest & Climate Change) (Govt. Environmental and forestry policies and programmes)
Ministry of External Affairs (External Affairs updates)
Ministry of Finance (Union Budget of India)
Press Trust of India- PTI (Got. of India Press News Agency & press release)
India Brant Equity Foundation-IBEF (Trust established by the Dept. of Commerce to promote and create international awareness of the Made in India label in markets overseas)
Vikaspedia (Govt. Online Information Portal for the social sectors)
National Council of Education, Research & Training (NCERT Books)
Economic Survey of India (Govt. Report on Indian Economy)
eGyanKosh (IGNOU Books)
Other Useful Websites
Websites for preparation of Bank Exams & Job Opportunities
Websites for preparation of Railway Exams & Job Opportunities
Websites for preparation of Maharashtra Police Exams & Job Opportunities
Useful Videos for Competitive Examinations
Useful Channels for UPSC
Useful Channels for MPSC
Staff Selection Commission (SSC) is an organisation under Government of India to recruit staff for various posts in the various Ministries and Departments of the Government of India and in Subordinate Offices
This commission is an attached office of the Department of Personnel and Training (DoPT) which consists of Chairman, two Members and a Secretary-cum-Controller of Examinations. His post is equivalent to the level of Additional Secretary to the Government of India.
The Estimates committee in the Parliament recommended the setting up of a Service Selection Commission in its 47th report (1967–68) for conducting examinations to recruit lower categories of posts. Later, in the Department of Personnel and Administrative Reforms, on 4 November 1975 Government of India constituted a commission called Subordinate Service Commission. On 26 September 1977, Subordinate Services Commission was renamed as Staff Selection Commission. The functions of Staff Selection Commission were redefined by The Government of India through Ministry of Personnel, Public Grievances and on 21 May 1999. Then the new constitution and functions of Staff Selection Commission (SSC) came into effect from 1 June 1999. Every year SSC conducts the SSC Combined Graduate Level Examination for recruiting non-gazetted officers to various government jobs. Know more..
Refer the Official Website of SSC for timely updates
स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सर्वात जास्त महत्वाचा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे,
अभ्यास कसा करायचा?
अभ्यास कसा करावा. ह्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत: ला पुढील ६ प्रश्न विचारावेत.
१. मला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे?
२. परीक्षेचे स्वरूप, टप्पे, पात्रता, प्रश्नाची काठीण्य पातळी ह्या बाबी माहीत करून घ्याव्यात.
३. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील (कमीत कमी ५ वर्षाच्या) प्रश्न पत्रिका सोडविल्या आहेत का ? (येथे सोडविणे म्हणजे आत्मसात करणे होय)
४. अभ्यासाच्या कोणत्या टप्यावर मार्गदर्शनाची आवश्कता आहे.
५. वेळेचे योग्य नियोजन केले आहे का ?
६. पुढील परीक्षा केव्हा आहे? त्यापूर्वी अभ्यासासाठी किती वेळ उपलब्ध आहे?
वरील ६ प्रश्न हे वैयक्तिक उत्तरे देण्यासाठी आहेत. ह्या प्रश्नाची उत्तरे म्हणजे अभ्यास कसा करावा.
उदाहरणासहीत समजावून घेऊ.
प्रश्न क्रमांक १.
मला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे?
सर्वात प्रथम करत असलेला अभ्यास करून काय मिळवायचे आहे. कोणती post हवी आहे त्यानुसार पुढे विचार करावा. कारण प्रत्येक परीक्षा नवीन पैटर्न प्रमाणे उमेदवाराकडून वेगवेगळ्या अपेक्षा ठेवते. उदाहरणार्थ. सध्या PSI STI ASST ह्या परीक्षांचे पपेर ही वेगळे आहेत. PSI साठी LAW आवश्यक आहे STI साठी Information Technology मग राज्यसेवा, केंद्रीय सेवा, SSC, NDA/CDS, RBI ह्या परीक्षांना सामोरे जाताना किती वेगळा अभ्यास लागेल, म्हणून हे प्रथम नक्की करा कि कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे? अभ्यासाचा विशिष्ट गाठल्या नंतर इतरही परीक्षा देता येतात परंतु परीक्षा आली म्हणून अभ्यास केला तर कधी कधी काहीच हाती लागत नाही म्हणून सुद्धा परीक्षा निश्चित करणे योग्य.
प्रश्न क्रमांक २.
परीक्षेचे स्वरूप, टप्पे, पात्रता, प्रश्नाची काठीण्य पातळी ह्या बाबी माहीत करून घ्याव्यात.
लहान मुले सहज बोलून जातात कि मला डॉक्टर बनायचं आहे परंतु डॉक्टर होण्यासाठी कोणती पात्रता लागेल हे माहित नसते. जवळचे उदाहरण म्हणजे दिल्ली येथे सर्व देशातून मुले IAS बनण्यासाठी येतात परंतु परीक्षे बद्दल त्यांना काहीच माहीत नसते आणि सर्व वेळ स्वप्ने पाहण्यात घालवतात की मी कलेक्टर झाल्यावर काय करेन आणि आयुष्याची महत्वाची वर्ष निघून जातात हाती काही येत नाही त्यामुळे प्रथम परीक्षेचे स्वरूप, टप्पे, पात्रता, प्रश्नाची काठीण्य पातळी ह्या बाबी जाणून घ्या. यात साधारण पणे परीक्षा किती दिवसांनी होते कारण परीक्षेतील अनियमितता आपला अमुल्य वेळ वाया घालवेल त्यापेक्षा आपण दुसरा पर्याय शोधणे योग्य उदाहरणार्थ २०१५ साली महाराष्ट्रात महिला बाल विकास अधिकारी परीक्षा जाहिरात आल्यानंतर एक वर्षांनी झाली मग कुणी जर महिला बाल विकास सोडून इतर फॉर्म भरला नसेल तर संपूर्ण वेळ वाया जाईल म्हणून हे परीक्षा किती वेळेवर होते हे जाणून घ्या. तयारी करताना बऱ्याच वेळा सर्व स्तरांची एकत्र करावी लागते. Prelim Mains आणि interview हे टप्पे सारखेच आवश्यक आहेत म्हणून तयारी एकत्र करावी (एकत्र तयारी कशी करावी या साठी वेगळ article लवकरच इथे उपलब्ध होईल ) स्वतःच्या क्षमता आणि परीक्षेची काठीण्य पातळी ह्या बाबी तपासून पाहिल्यास नंतर भ्रमनिरास होत नाही कारण आपण त्यापूर्वीच आपल्या क्षमता वाढवतो.
प्रश्न क्रमांक ३.
परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील (कमीत कमी ५ वर्षाच्या) प्रश्न पत्रिका सोडविल्या आहेत का ? (येथे सोडविणे म्हणजे आत्मसात करणे होय)
समजा तुम्हाला एखाद्या नवीन ठिकाणी जायचं आहे पूर्वी तुम्ही तिथे कधीच गेला नव्हता मग सर्वप्रथम आपण काय कराल तर त्या गावाचा रस्ता विचाराल किंवा गूगल वर शोधाल म्हणजे त्या गावी जाण्याअगोदर रस्ता माहित होईल नंतर तिथे जाण्याचा रस्ता कसा आहे यासाठी पूर्वी कुणी तिथे जाऊन आले असेल तर त्यास विचाराल की रस्ता कसा आहे. हे सर्व आपण सुरक्षित आणि वेळेवर पोहचण्यासाठी करतोच.
स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सुद्धा तसेच आहे प्रथम रस्ता म्हणजे अभ्यासक्रम नंतर तो कसा पार करायचा म्हणून मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या. अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासताना महत्त्वाच म्हणजे
अ. अभ्यासक्रम नीट समजून घ्या प्रत्येक घटक आणि उपघटक या बदल माहिती मिळवा. नेहमी वाचन करताना अभ्यासक्रम बरोबर असुद्या आणि वाचन अभ्यासक्रमातील घटकाचे होत आहे कि नाही ते तपासा. कालांतराने अभ्यासक्रम कायमस्वरूपी लक्ष्यात राहील याची काळजी घ्या त्यासाठी प्रयत्न करा.
ब. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका कमीत कमी ५ वर्षाच्या सोडवा आणि सोडवताना हा विचार करू नका की माझा अभ्यास झालेला नाही, मी नंतर अभ्यास केल्यावर प्रश्नपत्रिका सोडवेन, माझी सर्व उत्तरे चुकत आहेत, मग मी प्रश्नपत्रिका सोडवणे थांबविले पाहिजे आणि जास्त अभ्यास करून पुन्हा प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. असा कोणता ही विचार करू नका प्रश्नपत्रिका सोडवण्याचा उद्देश्य प्रश्न बरोबर सोडवणे नसून प्रश्नाचे स्वरूप समजून घेणे आणि वाचन करीत असताना स्व:ता असा विचार करणे आहे की ह्या वाचलेल्या घटकावर कोणते प्रश्न येउन गेले आहेत. त्या प्रश्नांचे स्वरूप काठीण्य पातळी आणि कोणत्या प्रकारचे अजून प्रश्न बनू शकतात. या साठी प्रश्न चुकले तरी सोडवा आणि पुन्हा पुन्हा सोडवा जेणे करून तुम्हाला ते आत्मसात होतील आणि नेहमी वाचन करताना तुम्ही तुलना कराल की पूर्वी कोणते प्रश्न आले होते आणि कोणते प्रश्न येऊ शकतात.
अभ्यास सुरु करताना मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम नेहमी बरोबर ठेवा आणि प्रथम मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम ह्यांचा अभ्यास करा मग पुस्तके वाचा कारण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम यामुळे काय वाचायचं हे कळेल आणि काय वाचायचं नाही हे सुद्धा कळेल आणि स्पर्धा परीक्षेत काय वाचायचं नाही ये कळाल की यश मिळत.
प्रश्न क्रमांक ४.
अभ्यासाच्या कोणत्या टप्यावर मार्गदर्शनाची आवश्कता आहे.
अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका नीट आकलन केल्यानंतर कोणती पुस्तके वाचावीत आणि कोणते अभ्यासक्रमातील घटक अतिआवश्यक आहेत ह्या सर्व गोष्टी ठरवता येतील. अभ्यासक्रमातील विविध विषय त्या विषयांचे आपले ज्ञान किंवा स्वंअभ्यासाची तयारी तसेच स्वतः जवळ असणारा वेळ आणि मार्गदर्शनाची आवश्कता आहे किंवा नाही हे सुद्धा ठरवता येईल.
विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेला विध्यार्थी इतिहासाचा अभ्यास करण्यापेक्षा क्लास लाऊन आधी इतिहासाबद्दल जाणून घेईल मग इतिहास कमी वेळात आणि लवकर समजावून घेऊ शकेल.
कला शाखेतून उत्तीर्ण झालेला विध्यार्थी विज्ञान आणि गणित यांचा अभ्यास करताना स्वं अध्ययनाने बराच वेळ खर्च करेल परंतु जर ह्या विध्यार्थ्याने केवळ विज्ञान आणि गणितासाठी क्लास लावला व इतर विषय स्वं अध्ययनाने पूर्ण केले तर विज्ञान आणि कला शाखांमधील विध्यार्थी एकाच पातळीवर येतील.
मार्गदर्शन घेताना केवळ क्लासच लावावा असे नाही जर त्या विषयातील तज्ञ, आधी पासून परीक्षा देणारे, इंटरनेट, youtube, या पैकी किंवा इतर कोणत्या ही माध्यमातून ज्ञान मिळवा काय ज्ञान मिळवायचं हे तर आधीच अभ्यासक्रम आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यातून कळाल आहे मग कस मिळवायचं हे सुध्या ठरवा आणि यश मिळवण्यासाठी तयार व्हा.
तुम्हाला स्वताच्या क्षमता ओळखून मार्गदर्शक निवडणे गरजेचे आहे केवळ मित्राने लावला म्हणून क्लास लाऊ नका तुम्हाला गरज आहे का हे ठरवा मग क्लास लावा. महाभारतात अर्जुनाने श्रीकृष्णाची निवड केली म्हणून पांडव जिंकले दुर्योधनाने गर्दी (संख्या) पाहून सैन्य निवडले म्हणून हरला तेव्हा अर्जुन व्हा.
ज्या विषयासाठी क्लास लावयचा आहे तो विषय कमीत कमी एकदा वाचून झाल्याशिवाय क्लास लाऊ नका कारण काय सुरु आहे ते समजणे आवश्यक आहे.
क्लास लावला कि नाही यासाठी लवकरच नवीन लेख येथे यॆइल. सध्या तुम्ही स्वतः हे ठरवा की मार्गदर्शन गरजेचे आहे किंवा नाही कारण त्यात जास्त वेळ आणि पैसे जाणार आहेत. पैसा मिळवता यॆइल पण वेळ परत मिळणार नाही.
प्रश्न क्रमांक ५.
वेळेचे योग्य नियोजन केले आहे का ?
ह्या प्रश्नासाठी प्रथम एक सवांद पाहू राम आणि श्याम दोन मित्र आहेत आणि पुण्यातील अ ब क चौकात पुस्तके घेण्यासाठी गेले आहेत.
राम :- ही UPSC, IIT, करणारी मुल इतका अभ्यास कधी करतात कारण PSI, STI आणि राज्यसेवा करता करता नाकीनऊ आले मग हा इतका अभ्यास करायचा कधी?
श्याम :- सोप्प आहे, ही UPSC, IIT करणारी मुले वेळ चोरतात.
राम :- वेळ चोरतात कशी चोरतात.
श्याम :- चल तुझच उदाहरण देतो तेव्हा…
अ. जेव्हां तू सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा करतोस तेव्हा…
ब. जेव्हां तू अभ्यसिकेत आल्यावर अभ्यास न करता वेळ मोबाईल मध्ये वय घालवतो तेव्हा…
क. जेव्हां तू नाश्ता करण्यासाठी जातोस आणि सरळ २ तासांनी परत येतोस तेव्हा…
ड. जेव्हां तू दुपारच्या जेवनानतर २ तास झोपतोस तेव्हा…
इ. जेव्हां तू अभ्यास सोडून परीक्षा, निकाल, अभ्यासक्रम, आयोग, सिनेमा, cuttoff ह्या जरुरी नसणाऱ्या गोष्टीबद्दल चर्चा किंवा विचार करतोस तेंव्हा
ई. जेव्हां तू केवळ परीक्षेची वाट पाहतोस आणि फॉर्म भरल्यावर अभ्यास सुरु करतोस तेव्हा…
उ. जेव्हां तू अपयश आल्यावर निराश होऊन अभ्यास थांबवतो तेव्हा….
ऊ. जेव्हां तू प्रत्येक रविवारी कंटाळा आला म्हणून ब्रेंक घेतोस तेव्हा…
अशा असंख्य वेळी हा अभ्यास करणारा वेळ चोरतो आणि अभ्यास करतो.
वरील संवादाचा उदेश्य वेळेचे नियोजन न केल्यास वेळ कसा वाया जातो हे सांगण्यासाठी आहे. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. कारण यश हे तुम्ही वर्तमानात काय करता यावर अवलंबून आहे म्हणून नियोजन आवश्यक आहे. प्रथम केवळ वेळ कसा जातो हे लिहा मग त्यात वाया गेलेला वेळ कसा वाचवता आला असता हा विचार करा आणि दुसऱ्या दिवशी वेळ वाचवा.
वेळेचं नियोजन कसे करावे. स्व:ताचा वेळ कसा वाचवावा आणि अभ्यासाचे वेळापत्रक यावर लवकरच येते लेख उपलब्ध होईल.
प्रश्न क्रमांक ६.
पुढील परीक्षा केव्हा आहे? त्यापूर्वी अभ्यासासाठी किती वेळ उपलब्ध आहे?
हा प्रश्न सर्वात महत्वाचा कारण त्यानुसार संदर्भ साहित्य आणि अभ्यासक्रमातील कोणते घटक महत्त्व देऊन करायचे हे ठरवता येते. परीक्षेला एक वर्ष असताना अभ्यासाची पद्धत आणि दोन महिने असतानाची पद्धत संपूर्ण वेगळी असणार.
परीक्षेला १ वर्ष असताना पूर्ण वर्षाच नियोजन करून प्रत्येक विषयासाठी २ संदर्भ निवडता येतील आणि भरपूर उजळणी व प्रश्नांची तयारी करता यॆइल परुंतु परीक्षेला २ महिने असताना केवळ उजळणी आणि शक्य तितके प्रश्न सोडविता येतील.
वेळ असताना नियोजन करून तयारी सुरू केल्यास नंतर त्रास होत नाही आणि सर्वात महत्त्वाच आत्मविश्वास टिकून राहतो. म्हणून वेळ असताना नियोजन करा म्हणजे परीक्षा झाल्यावर काळजी वाटणार नाही. चांगली वेळ येण्यासाठी आधी चांगला अभ्यास करावा.