सिंहगड अभियांत्रिकीच्या रा.से.यो स्वयंसेवकांतर्फे भव्य श्रमदान : वनराई बंधारा
11 नोव्हेंबर , वेल्हे
जगातील सर्वोत्तम जैवविविधतेपैकी एक भाग म्हणजे पश्चिम घाट... म्हणजेच सह्याद्री....याच सह्याद्री च्या साक्षीने शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला आणि हाच पाया म्हणजे राजगड तोरण्याचा परिसर
वरूनराजाची कृपा दृष्टी लाभलेल्या या परिसरात 3000 ते 3500 मिमी इतका प्रचंड पाऊस पडतो ...पण विरोधाभास म्हणजे या भागातील रयतेला जानेवारी नंतर आपल्या मूलभूत गरजांपैकी एक असणाऱ्या पाण्यासाठी जवळ पास 2 ते 3 डोंगरांची चढउतार करवी लागते.
पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकानी ज्ञान प्रबोधिनी या संस्थेच्या साहाय्याने वेल्हे खोऱ्यामध्ये तीन वनराई बंधारे 11 नोव्हेंबर रोजी बांधले.
या उपक्रमाअंतर्गत खोपडेवाडी ,शेणवड आणि वरोती या गावामध्ये अनुक्रमे 400, 250, 600 गोण्यांचा वापर करून बंधारा बांधण्यात आला, त्यासाठी 10 ते 11 ब्रास इतक्या मातीचा वापर करण्यात आला.
वनराई बंधाऱ्यांमध्ये साठणाऱ्या पाण्याचा वापर प्रामुख्याने लोकांना व तेथील जनावरांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पुढील 5 ते 6 महिने होणार आहे.
हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या अजित देशपांडे व त्यांचे सहकारी, गणेश गायकवाड आणि आ. भीमराव तापकीर यांचे विशेष सहकार्य लाभले.
रा.से.योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, रोटरी क्लब शनिवारवाडा, पुणे व ज्ञानप्रबोधिनी पुणे, यांचा संयुक्त विद्यमाने वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ल्या जवळचा डोंगराळ भागातील खोपडेवाडी या गावात सलग समपताळी चर हे तीन दिवसीय शिबीर यशस्वीपणे राबवण्यात आले. सदरचे शिबीर दि. ९ मार्च ते ११ मार्च २०१८ या दरम्यान धेण्यात आले , या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे १५० स्वयंसेवकांनी श्रमदान केले .
श्रमदानातून स्वयंसेवकांनी १५मी x ०.६ मी x ०.४५ मी एकूण २३ चर खोदले. या संपूर्ण चारांची एकून क्षमता ५० घन मीटर ( m3.) एवढी आहे. त्यातून एका वेळी ५० हजार ली. पाणी साठवण्यास मदत होईल. या उपक्रमातून या दुर्गम भागातील भूजलपातळी वाढेल व यामुळे जवळपासच्या विहिरी, बोअरवेल यांचा पाण्याचा साठ्यात लक्षणीय वाढ होईल. हे पाणी तेथील शेती, गावकरी आणि जनावरांसाठी जीवनदायी ठरेल. या संपूर्ण शिबारासाठी रोटरी क्लब, शनिवारवाडा व ज्ञानप्रबोधिनी, पुणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. लोखंडे , उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. दीक्षित, डॉ. एस. एस. शास्त्री सर. ज्ञानप्रबोधिनीचे अजित देशपांडे व कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय बनकर सर यांचे अनुभवी मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय सेवा योजना, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय,पुणे आणि 'युग फाऊंडेशन,पुणे यांचा संयुक्त विद्यमाने शहरात गणेशोत्सवा निम्मित ठिकठिकाणी ( कसबा पेठ , तांबडी जोगेश्वरी , भाऊ रंगारी गणपती मंडळ ) पथनाट्य "हल्ला बोल" सादर करण्यात आले .
या उपक्रमातून पथनाट्या सोबत सुमारे ४०००० विद्यार्थिनींना स्वच्छता पॅड (सॅनिटरी नॅपकिन) देण्याचे योजिले आहे. पथनाट्याच्या माध्यमातून भारतीय युवक, बलात्कार, स्वच्छता पॅड द्वारे होणारे प्रदूषण या विषयांवर जनजागृती तसेच स्वच्छता पॅड साठी निधी उभारण्यात येत आहे.