जेव्हा आपल्या शिबिराच्या प्रतिनिधित्वासाठी ४ नावे ठरवली त्यांपैकी मी एक होतो. या आधी मी कोणत्याही कामाचा प्रतिनिधी म्हणून काम केले नव्हते. ते मला या शिबिरात करता आले. मनात खुप विचारांची अवहेलना चालू होती की , कसे होईल, आपल्याला जमेल का नाही. आणि त्यात अजून भर म्हणजे विज्ञान महाविद्यालयाचे मुलं आपल्या सोबत होती. मग त्यांच्या सोबत आपलं जमेल की नाही, त्यांना अपले विचार पटतील का वगैरे, पण असं काहीच झालं नाही . त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले .
गावाबद्दल सांगायच झालं तर...... गाव व गावातील लोक अत्यंत कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाची आहेत . त्यामुळेच कदाचित आपल्याला या गावांमध्ये शिबीर करताना काहीं त्रास झाला नाही असं मला वाटतं. गावातील लोकांकडे कला आहे,मुलांकडे शिकण्याची उत्सुकता आहे. त्यांना गरज आहे ती फक्त योग्य त्या मार्गदर्शनाची,आणि हे काम थोड्याफार प्रमाणात का होईना ते आपल्याकडून झालं . आणि हे काम यापुढेही होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.शिबरात आपण गावात अनेक कामे केली .त्याचबरोबर आपण गावकऱ्यांशी ऐवढी जवळीक साधली की ...ते ही आपल्याला त्यांच्या मुलाप्रमाणे समजू लागले आहेत. हे सर्व करत असताना आपण सुद्धा एकमेकांना जास्त समजु शकलो. आपल्यातील काही उणीवा असतील तर त्या आपण जाणून घेऊ शकलो. या गावात मला माझा लहान भाऊ भेटला....रक्ताचं नातं नसलेला, पण प्रेमाच नातं घट्ट असलेला.जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या घरी जायचो , घरी गेल्यावर अस वाटतंच नव्हतं की , कुठे अनोळखी ठिकाणी आलोय अगदी स्वतःच्या घरी आल्यासारख वाटायचं. मला गावातील जास्त लोकांशी आणि मुलांशी संपर्क करता आला नाही.पण जेवढ जमेल तेवढ त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
माझ्याकडे प्रतिनिधित्व आणि शाळेच्या रंगरंगोटी चे काम होते. या कामांमुळे मी आपल्या स्वयंसेवकाशी जास्त संवाद करू शकलो नाही . पण जेव्हा जेवणाच्या वेळी सर्व एकत्र यायचे तेव्हा, मी त्यांच्याशी संवाद करायचो, हे करताना एक वेगळीच मज्जा यायची......आणि यात अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा माझे हात रंग काम करून खूप खराब व्हाचे , तेव्हा आपल्यातील कोणी ना कोणी प्रेमाने घास भारवायचे तेव्हा तर जास्तच भारी वाटायचे...पण वाईट तेव्हा वाटायच जेव्हा जेवण झाल्यावर सगळे उठून जायचे आणि ताट मला धुवायला लागायचे...
रंगरंगोटीच्या कामाची थोडीफार माहिती मला असल्याने त्याचा फायदा झाला. शिबिराच्या पूर्ण संध्येत या गावात दोन-तीन वेळा भेटी देऊन , कामाचे नियोजन कसे करता येईल याचा अंदाज आला. आणि या अंदाजा नुसार सर्व कामे झाली सुद्धा..रंग कामाची माहिती काही मुलांना होती , तर काहींना नव्हती. ज्यांना नव्हती ते माझ्यावर प्रश्नांचा एवढा भडिमार करायचे की , मला उत्तरे देणं कठीण व्हायचं. एकाच वेळी तीन ठिकाणी काम असायचे त्यामुळे थोडीफार धावपळ व्हायची, कोणत्या ठिकाणी कोणतं साहित्य लागतंय ते पाहणं आणि त्यांच्या कडून काम पूर्ण करून घेणं, या सर्व गोष्टी मधून खूप चांगला अनुभव मिळाला.
शिबिराच्या सात दिवसामध्ये सर्व टीम ने खूप छान कामे केली ...यात विशेष कौतुक काराववस वाटत ते आपल्या स्वयंपाक टीमच ....कारण त्यांचं काम खरंच कौतुकास्पद होत. त्याचबरोबर बाकीच्या टीम ने सुद्धा खूप चांगले काम केले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
हे सर्व करत असताना ज्याचे मोलाचे मार्गदर्शन मला लाभले .....ते म्हणजे आपल्या SCOE NSS चे आधारस्तंभ ..... *पंकज दादा पाटिल* .......आणि ज्याचे सहकार्य लाभले ते आमचे लाडके मित्र ... *प्रमोद* .....
6 jan 2019 खूप भितीने सगळे गावाकडे रवाना झाले.... मनामध्ये हजारो प्रश्न घेऊन सर्वजन गृहिणीला पोहोचले पण तिथे गेल्यावर एका दिवसातच जणु सगळ्या प्रश्नांना विसर पडला...खर सांगायच तर गावकर्यांच्या प्रेमळ वागणूकीमुळे आपण सगळे तिकडचेच होऊन गेलो.....गुहिणी ला जाण्या आधी 6 jan 2019 ते 13 jan 2019 या दिवसांची भिती वाटायची...कधी वाटलही नव्हत की भिती वाटणारे हे 8 दिवस आयुष्यातले सर्वात चांगले 8 दिवस बनतील.....काम करून सगळे थकत होते पण दुसऱ्या दिवशी जणू कामाचा पहिलाच दिवस आहे असा उत्साह सर्वांमध्ये असायचा (the best way to find yourself Is to lose yourself in the service of others) .....हसत,खेळत,फोटो काढत सगळे मस्त काम करायचो पण अचानक मध्येच एखादा लहान मुलगा यायचा व चहा प्यायला बोलवायचा ,तो आनंद तर शब्दांत सांगता येणारच नाही......खूप काही नवीन नवीन शिकायला मिळाल आणि अजूनही खूप काही शिकायच आहे....camp मधल्या 150 लोकांना आधी फक्त चेहर्याने ओळखायचो आणि आता तीच 150 लोक आयुष्यातला एक महत्वाचा घटक बनले.....सगळ्यात महत्वाच म्हणजे कोणतीही गोष्ट आपण सगळ्यांमध्ये मिळून मिसळून कशी करू शकतो हे शिकायला मिळालं...थोडक्यात सांगायच तर "TEAM WORK" म्हणजे काय असत हे समजल..
#TEAMWORK !
Its less ME and more WE
Though the journey has ended , it was an experience of a life time........ Pain, passion,purpose,team work, extreme hard work and love from all the members of village,SCOE &SCOS NSS and village labours defines this beautiful journey.......
Coming together is a beginning
And
Working together is a SUCCESS !
- तुमची
1)आधी रोटी
2) half ticket
3) छटाक
Ani thodya lokanchi ---DK(Dipti Kandalkar)
दिनांक 13/01/2019
गुहिणीतला शेवटचा दिवस होता.. सगळे अनंत आठवणी आणि समाधान घेऊन घरवापसीला तयार झाले. पण कॅम्प सुरु होण्याआधी एक निश्चय घेतला होता, कि खोपडेवाडी ला 3 दिवस जास्त थांबून तिथलं काम करूनच परत जायचं. आंग त्रस्त झालेलं, "नको जायला"डोकं म्हणालं, मन मात्र अटळ होतं. आमच्यात स्फूर्तता भरायच काम केलं पंकजदादा आणि फल्लेदादा यांनी.. दादा एकदिवस बोलला होता,"मी ह्या लोकांसाठी जी कामं करतो, त्यातूनचं मला आनंद मिळते आणि कुठलीही गोष्ट चोखपणे करण्याचं प्रोत्साहन मिळते.." म्हणूनच कदाचित त्याचा तोंडावर थोडसुद्धा थकवा दिसत नाही, आणि त्याला बघून सगळ्यांना स्फूर्तता मिळते एवढं नक्की.स्वतः उपाशी राहून सगळ्यांना चिकन वाढतांना दादा म्हणाला होता "तुम्ही एका शब्दावर थांबले,तुमची किंमत आहे.." खण्यापिण्याच बघायला आपला HOK होताच.आपली कलाधारी दाखवायला विशाल,सच्या, पम्या,प्रफुल,म्युऱ्या,सौऱ्या, प्रन्या, हरश्या,राज, आणि खुद्द फल्ले दादा होतेच. दिलखुलास गप्पा झाल्या,सगळ्यांचे secret एकएक करून बाहेर निघाले. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो,तुम्ही त्या 7 दिवसात केलेले काम आणि त्यातून निर्माण झालेल्या उर्जेमुळेच काम चोख पणे पार पडलं.. म्हणून khopdewad मध्ये झालेलं कामात सगळ्या युनिट ला श्रेय जातो एवडे नक्की.तिथून परत येऊन 5 दिवस झाले ,पण कॅम्प च्या zone मधून बाहेर निघायला जरा वेळ तर लागेलच ना...
#SCOE$SCOS NSS
Be social, be happy
6 ऑक्टोबर 2018 ....कॅम्पसाठी गावाची शोध मोहीम चालू असताना 6-7 गाव बघून झाल्यावर पंकज दादाच्या म्हणण्यानुसार गुहिनी गावाला भेट द्यायची आणि रात्रीचा मुक्काम खोपडेवाडी ला करायचा... गावात पाऊल ठेवताच ती गंजलेली गावाची कमान, आणि शाळेला पडलेलं भगदाड पाहून मनात एक विचार आला....हेच ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेले , शिवरायांच्या काळात संपन्न असणार गावं...आज त्याच गावातील लोक पाण्यासाठी त्रासतायेत... ज्या ठिकाणी 3000-4000mm पाऊस पडून सुद्धा (जवळपास पुण्याच्या 3पट पाऊस)....ग्रामसभेतून लोकांच्या बऱ्याच समस्या समोर आल्या... खरंच मनाला वाटलं या गावाला खूप गरज आहे....अवघे 3 वर्षच नाहीतर जेवढं या गावासाठी करता येईल तेवढं कमीच...
6 जानेवारी ला गावात पोहचल्यावर introduction चालू असताना सगळ्यांना एक प्रश्न विचारलेला कॅम्प ला यायचं कारण काय...???
तोच प्रश्न जर 13 जानेवारी ला विचारलं असता तर ....
आपल्या volunteers बद्दल बोलायच झालं तर GREAT SALUTE🏻🏻 यार सगळ्यांना ...स्वतःच्या घरात झाडून न घेणारा , गुहिनी गावात जाऊन नालीमध्ये काम करत दुसऱ्यासाठी शोषखड्डे खणतो..🏻🏻
तसेच Art team , School renovation team , Kitchen team सगळ्या टीमच कौतुक करावं तेवढं कमी
गावचा निरोप घेताना डोळ्यात अश्रू आणि हृदयात-
"नको आम्हा धर्म गड्या...
नको आम्हा फरक जातीत...
आभाळ बाप , धरणी माय रे आमुची...
रमतो आम्ही सह्याद्रीच्या मातीत.."
#SCOE&SCOSNSS
Be social , Be happy
- प्रवीण फुंदे
ज्या 7 दिवसांसाठी प्रत्येक "NSS VOLUNTEER"जीव ओतुन महिने-दोन महिने काम करत होता.. तो दिवस उजाडला म्हणजे 6 जानेवारी 2019.. आतुरता होती camp ची..नवा उत्साह होता त्या गुहिनी या गावासाठी काहीतरी करायचं...जोश होता गावासाठी काहीतरी मागे ठेवून जायचा.. जिद्द होती मेहनत घ्यायची आणि 7 दिवसात गावाचा चेहरामोहरा बदलून जायचा ...आपुलकी होती त्या गावातील लोकांविषयी... हे सगळं खरं पण कोणालाच काही माहीत नव्हतं...हा पण सगळं Analysis झालेलं ...सगळं planning झालेलं...पण हे झालेलं सगळं planning सत्यात उतरवणं हेच त्या प्रत्येक VOLUNTEER डोक्यात होतं..कामाचा दिवस आला.. सगळ्यांची मने-शरीरे भान हरपून कामाला लागली काम चालू झालं सगळेजण एका नव्या उत्साहाने, जोशाने तन-मन-भान हरपून कामाला लागली..
तसं बघता Camp चं Schedul तर कुणाच्याच अंगवळणी नव्हतं सकाळी 5 ला उठून रात्री 1ला झोपणं.. तब्बल 19 तास काम ...आणि त्यात तिथलं तापमान 8 ते 10 Degree Celsius..अशक्य होते हे..पण हे सगळ् आपल्या volunteers लोकांनी सत्यात उतरवलं..अहो सत्यात म्हणजे एवढं की गावाची कायापालटच करून टाकली या आपल्या शूरवीरांनी..
अहो ज्या मुली कधी घरातलं स्वयंपाकाच साध एक छोटंसं काम करायला सुद्धा तयार नसायच्या त्यांनी दिवसभर त्या स्वयंपाकघरात राहून या आपल्या 125 लोकांसाठी जेवण बनवलय ...अहो मुलीच काय तर मुलं सुद्धा...एक सलाम त्या सर्वांसाठी...
या camp मध्ये सर्वात मोठे काम हाती घेतले होते ते म्हणजे गावासाठी एक छोटासा बंधारा बांधायचा...गावासाठी जलाशयाची निर्मिती करायची... हाती घेतलेलं काम पुर्ण केलं आणि बंधारा बांधला सुद्धा...अहो ज्यांना कधी 10KG पिशवी कधी उचलत नव्हती त्यांनी तब्बल 30-35 KG च्या मातीने भरलेल्या पिशव्या उचलल्या..
गावात जवळजवळ चाळीस शोषखड्डे खोदले.. असे सांगताना किंवा ऐकणार्याला 40 म्हणजे खूप छोटं..फालतू वाटतंय पण ते जे गाव आहे ना गुहिणी ते एका डोंगराच्या कुशीमधलं गाव तेथे माती हा प्रकारच नाही फक्त आणि फक्त खडक खडक आणि खडकच.. खडक फोडून शोषखड्डा तयार करणे सोपी गोष्ट नव्हे..पण आपल्या टीमने ते करून दाखवलं.. आणि होणारा रोगराईला आळा घालण्याचं काम केलं.. अहो ज्या मुलांनी मुलींना स्वतःच्या घरातील Toilet कधी साफ केलं नव्हतं अशा लोकांनी तेथील नाल्यांमध्ये उतरून शोषखड्डा साठी लागणारी जागा साफ केली शोषखड्डे खोदले..किती ते कष्ट, किती ती मेहनत..एक सलाम या सर्वांसाठी पण...
गावातील त्या छोट्या लेकरांच्या...भविष्यातील तरुण पिढीच्या मनामध्ये घर करण्याच काम आपल्या "School Team" ने केलं सलाम त्यांच्या या कर्तुत्वाला पण..आणि हो आपली "Solar Team" आपण कमी पडलो असं नाही आपण आपली मेहनत घेतली काम केलं...पण आपल्याला साधन उपलब्ध झाली नाहीत...आपण हरलो असे नाही आपण परत येऊ परत जोमाने काम करू साधने उपलब्ध करू.. आणि गावाला "Solar Energy" निर्माण करून देऊ..Keep it up Guys...एक सलाम त्यांच्या कामासाठी पण..या आपली "Goods Team" अहो तुमच्याशिवाय तर हा camp अशक्यच आहे मित्रांनो..एक सलाम तुमच्यासाठी पण..
सगळ्यांनीच सगळी कामे केली पण असं म्हणता येईल आपल्या सगळ्या कामांना सोन्याचा मुलामा देण्याचे काम "Art Team "ने केलं... सलाम त्यांच्या पण कामाला...
आपल्यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या कलागुणात निपून आहे....कुणाच्याही कामाची बरोबरी करणे हे चुकीचे आहे..प्रत्येकाचा कामातील वाटा ही तितकाच महत्त्वाचा आहे...
सलाम आपल्या प्रत्येक त्या "volunteer" ला....
या 7 दिवसात अनेक अनोळखी चेहरे ओळखीचे झाले..ओळखीचे चेहरे जवळचे झाले...आणि हे सर्व चेहरे मनातील आठवणीच्या एका कप्यामध्ये कायमच वास्तव करून गेले..
कॅम्प मधील सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे कॅम्प मधील खाण... नाष्टा ,जेवण,चहा....अहो कुणी जर बिस्कीट खायला काढले ना तर प्रत्येकाच्या वाटल्या फक्त चुराच यायचा... मग हळू हळू प्रत्येकाच्या team पडायला लागल्या...या team कुठे school मागे जा...कुठे झाडाखाली जा...अस करून चोरून खाऊ लागल्या...चोरून आणि मागून खायला काय भारी मज्जा आहे विचारूच नका... पण याच पोरांनी स्वतः च्या घासतला घास काढून पण दिलाय.... अहो एका ताटामध्ये 8-10 जण....जेवायला बसायचे....कोणता धर्म नाही ...कोणती जात नाही...आणि जेवतांना एकमेकांना 'प्रेमाचा घास"...आता प्रेमाचा घास ही Concept म्हणजे... त्या घासामध्ये "मीठ" नाहीतर 'लिंबू"घालून भरवणे....एकमेकांना त्रास देणं..चिडवण.. जस एका भाऊ-बहिणीच नात असत ना अगदी तस...
बघता बघता सात दिवस संपले... Camp चा शेवटचा दिवस ....का आला हा दिवस अस वाटत होतं प्रत्येकाला ...कुणाचीच इच्छा नव्हती घरी जायची.... अहो आमच्या मुलांची तर नव्हतीच नव्हती...पण त्या गावकऱ्यांची...त्या गावातील छोट्या छोट्या लेकरांची पण नव्हती....सगळयांना किती दुःख झालाय हे त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूनमधून दिसू लागले... ते गावकरी ...ती लहान लहान लेकरे आणि आमची "NSS Family" सगळेजण रडू लागले.. एकमेकांना बिलगु लागले....एक थांबला कि एक रडायला लागायचा...हे सगळं दृश्य पाहून वाटलं की आपण काहीतरी बदल घडवून निघालोय...आपण या "गुहिनी" साठी काहीतरी करून निघालोय...आपण माणसं जोडून निघालोय..ते म्हणतात ना बघा...'रक्ताचं नात दगाबाज निघत प्रेमाची नाही',अशी प्रेमाची नाती आपण जोडली आहेत मित्रांनो...
या camp मधून फक्त गावाचाच नाही तर आपण आपल्या वाक्तिमतत्वाचा सुद्धा विकास करून आलोय..सुख काय आहे..?सुख म्हणजे आपल्याला ,आपल्या घरातल्या सगळ्यांना सगळं मिळणं म्हणजे सुख नव्हे... तर या जगातल्या सगळ्यांना सगळं मिळणं म्हणजे सुख होय...
मित्रांनो ...मी कोण आहे?मी का आहे?मी कुणासाठी आहे?अश्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण सोबत घेऊन आलोय ...अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं असणं महत्त्वाचं नसतं ,तर आपल्या असण्याने दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण येणं महत्त्वाचं असतं...
मित्रानो,NSS काय शिकवत..?तर माणूस काय आहे हे शिकवत आणि या माणसाची माणुसकी काय आहे हे शिकवत...नात काय आहे हे शिकवत आणि हे नातं जपतात कस हे शिकवत....त्याग काय असतो हे शिकवतं... सोप्या शब्दात म्हणताल तर NSS जगणं काय आहे हे शिकवत...आणि हे जगणं ताठ मानेने जगायचं कस असत हे शिकवतं..
माझ्या या सगळ्या मित्रांच्या कामासाठी कितीही लिहलं तरी ते अपुरेच पडेल.. माझा "Pen" पण थांबत नाहीये आज तुमच्या या कामासाठी... पण शेवट हा करावाच लागेल...शेवटचे हे दोन शब्द तुमच्यासाठी...
ते म्हणतात ना,"बरेच लोक देव मानत नाहित ,पण ती देवाची काम करतात"...हे वाक्य माझ्या या "FAMILY" साठी लागू पडत...
एक सलाम माझ्या सगळ्या मित्रांसाठी...
।। निस्वार्थता हेच जीवन ।।
-जयदीप जयश्री दिलीप शिनगारे
नवीन आशा घेऊन घरट्यातून बाहेर निघालेल्या पिल्लांना आकाशात उंच भरारी घ्यायला शिकवले आहे या आठ दिवसांनी...
रम्य ते आठ दिवस...आठवणी जाग्या झाल्या आहेत खरे पण कागदावर उतरवण्यासाठी शब्द कुठेतरी अपुरे पडताय अस वाटतयं. स्वतःला आलेला अनुभव हाच खरा शिक्षक असतो अस म्हणतात अन या आठ दिवसात ते कळले. प्रत्येक दिवशी एक नवीन कार्य, त्यातून आलेले विविध अनुभव यातून स्वतःला बदलत गेले. "I'm not a morning person", अस म्हणणारे माझ्या सारखे बरेच लोक इथे शिस्तीत पहाटे 5 लाच उठून तयार असायची. 'कष्टाची भाकर' काय असते ते थकून आल्यावर जेवताना कळल. एकीकडे शिस्त आणि रोजच एक ध्येय मनात घेऊन आपण सगळेच कामाला लागायचो तर दुसरीकडे मजा मस्ती करत सगळेच एकमेकात रमलो.
#NSS_FAMILY आता रोजच आठवतय ते एका ताटलीतील जेवण, एका वाटीत पाच लोकांनी पीलेला चहा SWEET साठी 'अजून थोडासा दे ना', 'भेटलाच नाही' 'हा आता बसलाय याच्या वरच दे', अश्या खोट्यानाट्या केलेल्या मागण्या आणि प्रेमाने एकमेकांना भारवलेले घास हे देखील आठवणींचाच एक भाग. मोबाईल आणि इंटरनेट च्या विश्वात हरवलेली माणसं हे आठ दिवस मात्रं निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येक दिवशी उगवत्या सूर्याच्या तेजासारखे नवीन काहीतरी शिकत होते. Confidence, personality & Other Skills यात तर बदल झालाच सोबतच अनेक Introvert
Extrovert मधे बदललेले बघितले
बाकी गावाविषयी बोलायच झाल तर खरंच एखादं गाणं हृदयाला जस भिडत ना तसेच गावकऱ्यांचे आपुलकीचे चार शब्द मनात घर करून गेलेत. सारे दुःख पदरात घेऊन चेहर्यावर हास्य ठेऊन लेकरांसाठी राबणारी आई तिथे भेटली..."माझी नात काय अन तुम्ही काय सारे सारखेच...." असे गोड गोड बोलून आग्रह करत चहा पाजणारी आजी सुद्धा भेटली
गुहिणी अश्या या छोट्याशा ठिकाणी मोठ्या मनाची माणस अन् कष्टाची जाण असलेले लोक बरचसं काही शिकवून गेले.
कुठे तरी वाचला होता पण अगदी Relatable आहे म्हणुन इथे लिहित आहे:- "एक मुद्दत बाद मिली कैद से आजादी, पर किस्मत तो देखो जब मिली आजादी तो पिंजरे से प्यार हो गया था"
*#स्वच्छन्द*🦋
"ती बंदूक कशाला वापरता ओ दादा"🤔 सुम्या न प्रश्नर्थक नजरेने मातीच्या भिंतीला असलेल्या लाकडी खुंटणीला अडकवलेल्या एका लांबसडक रायफलीकडे बघत पुटपुटला...
''पोरानो .... रानात जंगली जनावर असत्यात, रात्री बित्री च कधी फिरावं लागतं बघ मंग आपली सुरक्षा कोण करणार बरं,म्हणून ही बंदूक,सरकारकडूनच मिळालीय बघ!'' एक मोठा श्वास घेऊन सुनील दादा सांगत होता ...
सुनील दादा चा अनुभव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता
"पाटील दादा, सगळ्यांना घेऊन परत या निवांत....,
मस्त हुरडा पार्टी करूया"
पंकज कडे बघत दादा ने एक जिव्हाळ्याचं आमंत्रण च दिलं होतं....
पाटील ही धीरगंभीर कोल्हापुरी आवाजात क्षणभर विचार करून थोडेसे आमच्याकडे बघून चष्म्यातले डोळे वर करून हसतच उत्तरला "येउ की दादा, हे जरा पोरांच्या कॉलेज परीक्षा बघून करतोच प्लॅन"
सगळ्यांनी चहा फुररकन वढून आवरत घेतले पण हिकडं वेगळंच चालू...
बंदुकीला बघून धीरूभाईने लाल सलाम ठोकला तर SSB ने अचूक निशानेपटू ची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला ..
आपल्या गायकर च तर वेगलीच पोज राव...
काल चा बंधाऱ्याच काम थोडे राहिले होते अन त्या रात्री आम्ही काहीसे लोक तिथेच थांबलो होतो *#खोपडेेवाडीला*
वेल्हे तालुक्यातील तोरणा गडकिल्याचा मागचा भाग म्हणजे खोपडेवाडी..
पुण्याहून वेल्हे पोहचून तोरणाला वळसा घातला की आलंच खोपडेवाडी...(इतकेही सोप्प नाही बरं का)
एका उंच टेकडीवर असलेले गाव जिथं सूर्यप्रकाशाचा पहिला किरण आपल्या अंगावर झेलण्याचा सोहळा पार पडतो अन साऱ्या जगाला विसरून आपल्याच धुंदीत बेभान होऊन आजूबाजूच्या खोऱ्यात मोठयाने ओरडून आनंदाचा अनुभव घ्यावा असे हे गाव...
मोजकेच उंबरे असलेले
मध्यभागी एक मंदिर
शेजारीच शाळा
ज्ञान प्रबोधिनीने केलेली विहीर...
अन BSNL चा सॅटेलाईट फोन असलेले दादांच घर....
सगळीच मातीची घर पण विशेष खासियत म्हणजे 3 टप्प्यात बांधलेली
स्वयंपाक घर सर्वात वर
खाली झोपायचा तसेच सगळं सामान असलेला रूम (हॉल आपल्या भाषेत)
अन सगळ्यात खाली गायी गुरांसाठी चा गोठा...
गुरांना पण परिवाराचा भाग मानणारी अशी घर हल्ली कमीच ..
त्या रात्री आम्ही मंदिरात च झोपलो होतो म्हणजे हल्ली आता कुठेही गेलो ना तरी ''अरे झोपायचं कुठं,कसं होईल काय अंथरू पांघरयला काय ? " असे असे प्रश्न कफल्लक वाटतात,"अवघे विश्वची माझे घर"
पंकज सोबत असल्यावर प्रश्न अनुत्तरित राहातील अस खूप कमी वेळाच झालंय..
ssb Phalle असो वा M भाई
मग '१६ असो वा '१७
प्रत्येक कॅम्प ची अशीच स्टोरी..
मंदिराची उब विलक्षण होती त्यामुले थंडी तर जाणवली च नाही...
सकाळ सकाळी तो प्रकाशगोळा डोंगररांगा ओलांडयाच्या आतच आम्ही पहिला किरण टिपायला तयार जेंड्या नवीन फोन मध्ये फोटो काढून हवा तर करतच होता...
ज्ञानप्रबोधिनी च्या प्रयत्नातून साकार झालेली तिथली विहीर म्हनजे खोपडेवाडी साठी वरदानच आहे...
सगळंच मिनिटाला मिनिटाला सोशीअल करणाऱ्या या जगात तिथंल *#ऑनलाइन आयुष्य* तर भारीच..
तिथे खरा संवाद घडतो..
मोठ्या आरोळ्या शिट्ट्या हाका मारून वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढुन त्यांच लांब लांब च कनेक्शन लगेच sent... Delivered...Read...Reply अस फटकन होतं...
मी तर म्हणतो तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अविलक्षण प्रगती करणार्यांनी इकडेही फिरकावे अन एक टेक्नोसॅव्ही छोटासा हात वाढवावा
सगळ्यात जास्त पर्जन्यमान असलेला हा भाग मात्र पाण्याच्या प्रश्नासाठी झगडतो..
म्हणूनच बंधारा तसेच डोंगर उतारावर बांध घालून पाण्याचा जलसाठा जमिनीत मुरण्यास मदत होईल..
आपल्याकडे पाणी फौंडेशन सोबत जोडलेली सायली, अश्विन अन टीम पण आहेच...
त्यांचा अनुभव अन आपली मेहनत जिद्दीने एक दिशेने लावून नक्कीच निस्वार्थतेचे तुफान जागवूया...
(विस्तृत अनुभव हा शनिवार ११ नोव्हेंबर २०१७ ला दिवसभर वनराई बंधारे बांधून व रविवारी राहिलेलं काम पूर्ण करत असताना अनुभवलेले शब्दात कैद करण्याचा एक प्रयत्न.... )
#अभिजित शोभा विठोबा लभडे
९७६२६१६०१०
नवं जग होतं..
नवे मित्र होते..
नवे विचार होतें...
नवी नातीही ...
सुंदर होत सगळे एकमेकांना कधीही न विसरणारे आज मात्र पाठ करून बसलेत एकमेकांकडे वैरी होऊन
आश्चर्यकारक च ना..।।
मग का करतोय उगाच अट्टहास हा मोठं होण्याचा अन कालचक्रात मिसळून विलीन होण्याचा....
जुनेच दिवस होते मनं मौजी ...
सर्वांची मन सांभाळत मिळून मिसळून आनंदलेले जुने दिवस..
वाढीदिनी रात्रीची धमाल अंडफोडी...
सकाळी 15 मिनिटात आवरून लेक्चर पकडणायची मजा...
अन सर्वांसोबत बंक मारून उनाड खेळणायची मज्जा..
तो रविवार जेव्हा नवनवीन हॉटेल धुंडाळत चव चाखण्याची धडपड...
अन सुट्टीच्या दिवशी फिरण्याची पडझड....
निखळ आनंदाने अनुभवलेले हेच दिवस असतात...
अन आपण मात्र भविष्यकाळकडे डोळे बसतात....
येतात सोबत बरेच जण
अन संगत ही सोडतात बहू....
पण मग का उगाच आपल्याच माणसाने आपल्याच जीवलंगाशी करायचा बाऊ...
जुनेच दिवस बरेच ना हो...
कान साफ..
डोळे साफ..
ना मनात कचरा कुणाविषयी..
ऐशी दोस्ती लै भारी ....
वाखाण्याजोगी....
हळू हळू उगाच येतो मी पणाचा गर्व....
अन अलगद मिठीत घेतो तो सर्व...
का हो मिळतील का परत ते दिवस मन मौजीपणाचे अविभाज्य.....
जेव्हा एकेकाळी ही दोस्तीचे किमयागार करायचे हृदयावर राज्य....
हल्ली तर *निवांत* हा शब्द ही फक्त डिक्शनरी त सापडतोय....
कोण जाणे माझा मित्र कोणतं सुख शोधतोय....
#स्वच्छन्द🦋
#अभिजीत शोभा विठोबा लभडे
पण ....
पण.....
लै आठवण येतेय त्या सॉक्स ची ..
इथं पोस्ट कॉम्प्लिट झाली लिहून तरी मनातून त्या सॉक्स ची आठवण काही जाईना. आजही आठवतो तो दिवस पुणे स्टेशन बाहेर किती शी गर्दी असतानाही मी त्याला शोधले होते 60 रुपये जोडी वरून 30 रुपयात किती भाव करुन या सॉक्स जोडीला मी आपलेसे केले होते..
आता त्या एक सॉक्स सोबत नवीन जोड दिला तर त्या बिचार्याला जोडीदार गमावलायच दुःखच वेगळं...हल्ली जगात तर किती प्रश्न आहेत जटिल पण मला एक साधा सॉक्स पण सांभाळता येत नाही..
लाल पिवळा बावटा काळा कितीतरी रंगात ही जोडी आवडली अन त्यांना अशी कुणाची नजर लागेल असे वाटलं नाही च्यायला एक काळा ठिपका तरी लावायला हवा होता नाहीतर आता ते लिंबू मिर्ची च काहीतरी करून माझा सॉक्स मिळवायला हातपाय हलवायला लागतील
ऍमेझॉन फ्लिपकार्ट वाले एक सॉक्स देता का म्हणून गुपचूप सर्च करून बघतूूया की फेरीवल्याकडे हवा असलेला रंग दिसतोय का म्हणून संध्याकाळी एक पट्टा ही मारून आलो
बऱ्याच दिवसापासून मला साथ होती त्यांची पावसाळ्यात त्यांना भिजू देऊ नये म्हणून माझी धावपळ अन हिवाळ्यात थंडीसोबत माझी झुंज आठवतेय अजून त्यांचे भाउंबन्द तर तर्हेवाईक आहेत कुणी आखूड कुणी लांबलचक चपलेसोबत वेगळा स्पोर्टस लूक वाला वेगळा अस बस कितीतरी...
चला उठा...
बघता काय...
शोधा म्हणजे सापडेल..
कुणीतरी म्हटलंय शोधला तर देव पण सापडतो...
तिकडे लादेन पण सापडतो भुयारात अन मी कुठे आहे ...
मला माझा सॉक्स पण सापडेना
मग काय चला मोहिमेवर ..
शु रॅक ,दोरीवर , की गार्डन मध्ये, की पोर्च मध्ये, की चोरी...
माझ्या 2 GB रॅम च्या मेंदू ला आता 2GHz चा प्रोसेसर वापरून काम करावं तर काही आशा आहे...
पण म्या काय म्हणतोय थोडी तुम्ही ही करा की मदत..