६ जुलै १९७२ रोजी लावलेल्या रोपट्याचे आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर होत असताना पाहून अत्यानंद होत आहे. हिंद सेवा मंडळ ही शैक्षणिक संस्था अहिल्यानगर जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. अशा या हिंद सेवा मंडळाच्या शिक्षकांनी एकत्र येऊन ६ जुलै १९७२ रोजी हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढी लि. ची स्थापना केली. सुरुवातीपासूनच सर्व संचालकांनी नेहमीच वैयक्तिक स्वार्थापेक्षा संस्थेला प्राध्यान्याने महत्त्व दिलेले आहे आणि म्हणूनच ही संस्था आदर्श असे काम करून इतरांना दिशादर्शक व प्रेरणादायी ठरली आहे.
संस्थेला स्थापनेपासून आजपर्यंत कायमस्वरूपी ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे. आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम आहे.
निधी : १ कोटी ३३ लाख
गुंतवणुक : १७ कोटी
ठेवी : ४७ कोटी
कर्ज : ३६ कोटी
वार्षिक उलाढाल : १५० कोटी