Dhisle Hardware and traders
Dhisle Hardware and traders
धिसले हार्डवेअर अँड ट्रेडर्स ही 2019 साली स्थापन झालेली एक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणारी हार्डवेअरची दुकान आहे. रायमोहा गावात सुरुवात झालेलं हे दुकान आज घरबांधणीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तूंचं एकमेव केंद्र बनलं आहे. आम्ही सिमेंट, स्टील, Paint यासारखी मूलभूत बांधकाम साहित्य देतो, त्यासोबतच इंडिगो पेंट्सचे अधिकृत वितरक आहोत. पाणी साठवण्यासाठी टाक्या, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल वस्तू, तसेच प्लास्टिक साहित्य देखील आमच्याकडे सहज उपलब्ध आहे.
दुकान सुरू करताना आमचं एकच उद्दिष्ट होतं – गावातील आणि परिसरातील लोकांना बांधकामासाठी लागणारं सर्व काही एकाच ठिकाणी, योग्य दरात आणि चांगल्या सेवेसह मिळावं. गेल्या काही वर्षांत ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम यामुळेच आम्ही सतत प्रगती करत आहोत. आमचं काम हे फक्त व्यवसाय नाही, तर प्रत्येक ग्राहकाचा घरस्वप्न पूर्ण करण्यातील एक भाग आहे, याच भावनेने आम्ही सेवा देत आहोत.