ढिसले हार्डवेअर अॅण्ड ट्रेडर्स या दुकानाची स्थापना २०१९ साली झाली. आमचं उद्दिष्ट म्हणजे गावातील लोकांना घराच्या बांधकाम व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी, योग्य दरात व विश्वासाने उपलब्ध करून देणं.
आमच्याकडे घरबांधणीसाठी लागणारे सिमेंट, स्टील सळया, अँगल, पाईप्स, पत्रे, पेंट, हार्डवेअर साहित्य, प्लंबिंग मटेरियल्स, तसेच बांधकामासाठी लागणारी सर्व हत्यारे (tools), दोरी, वायर व इतर साहित्य उपलब्ध आहे.
शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांमध्ये नांगर, फावडे, कुदळ, गंटोळे, खुरपे, पाणी साचवण्याचे ड्रम, वायर, प्लास्टिक पाइप्स, स्प्रे पंप, दोऱ्या, मोटार पंप यांचा समावेश आहे.
आम्ही गेल्या काही वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि विश्वासाने ग्राहकांची सेवा करत आहोत. तुम्हाला घर, शेत, गोदाम, कंपाउंड वा कुठल्याही प्रकारच्या बांधकाम किंवा शेतीसाठी साहित्य हवं असेल तर, ढिसले हार्डवेअर हा तुमचा विश्वासू आणि एकमेव पर्याय आहे.