App login केल्या नंतर नविन वापरकर्ते असल्यास प्रथम शाळा नोंदणी करायचे आहे. शाळेची माहिती अचूक व मराठीत भरायची आहे. कारण हीच माहिती PDF वरती वापरला जाईल. Profile tab वर "शाळेची महिती" पाहण्याची व माहिती मध्ये बदल करण्याची सोय केली आहे. शाळेची काहीतरी बनावट माहिती भरल्यास शाळा हटवण्यात येईल.
शाळा नोंदणी नंतर वर्ग जोडू शकता. तुकडी असल्यास टाकावा. तुकडी अ असे मराठीत असल्यास मराठीत type करावा. वर्ग शिक्षक ची नाव अचूक व मराठीत भरावी. कारण हीच माहिती PDF वरती वापरला जाईल. त्या नंतर वर्गासाठी शैक्षणिक वर्ष मूल्यमापन संग्रह सक्रिय करा.
वर्गाच्या screen वर विद्यार्थी कार्ड वर click करा. येथे विद्यार्थ्यांची महिती भरायची आहे. महिती पाहण्याची व महिती मद्ये बदल करण्याची सोय केली आहे. विद्यार्थी हटवण्यासाठी यादी मध्ये नावाला उजव्या बाजूला ओढायचा आहे. नाव, हजेरी क्रमांक व टोपण नाव इंग्लिश मध्ये जे की सोपे search साठी वापरला जाणार, इत्यादी महिती अनिर्याय आहे. बाकीचे महिती प्रगती पत्रकाकरीता वापरला जाईल. ही महिती नंतर भरू शकता. प्रगती पत्रक चा feature लवकरच येईल.
मूल्यमापन स्वरूप मध्ये गुण विभागणी करू शकता. कोणत्या भागला किती गुण आहेत तितकेच टाकावे. पर्यायी भाग म्हणुन अतिरिक्त गुण टाकू शकता. पण हे गुण कोणत्याही अनिर्वाय भागाच्या गुणा इतके असायला पाहिजे. मग कोणताही एक पर्यायी व एक अनिर्वाय म्हणुन विद्यार्थी नुसार ठरवू शकता. स्वरूप तयार अथवा कोणतेही बदल करताना पुढे पुढे जात शेवटी जतन करायचे आहे.
चालू सत्रासाठी विद्यार्थ्यांची गुण नोंदणी करायची आहे. संकलित मधील दोन्ही भागांना गुण नाही दिल्यास एकूणमध्ये १०० पैकी फक्त आकारिक गुणांना ग्रहीत केला जाईल. तसेच श्रेणीनिहाय तक्ता मधील उपस्थिती मध्ये मोजला जाणार नाही. पण निकाल पत्रकमध्ये नाव असणार आहे.
चालू सत्रासाठी विद्यार्थ्यांची वर्णनात्मक नोंदी निवड करा. विशेष नोंदी type करून लिहू शकता.
ही माहिती प्रगती पत्रकासाठी लागेल. वर्गाच्या screen वरती "उपस्थिती दिवस / कामाचे दिवस" या कार्ड वरती क्लिक करा. जर कामाचे दिवस व शाळा भरण्याचा दिनांक भरला नसेल तर त्याचा फॉर्म दिसेल. ही माहिती सर्व वर्गां करीता वापरला जाईल. या माहिती मध्ये नंतर बदल सुद्धा करू शकता. त्यांनतर विद्यार्थीनुसार उपस्थित दिवस भरायचे आहे. हे सोपे जावे म्हणून मागच्या महिन्यांचे कामाचे दिवस उपस्थित दिवस मध्ये भरला जाईल. जर एखाद्या महिन्यामध्ये उपस्थिती १०० टक्के नसल्यास त्यात बदल करावा.
सूचना: PDF button वर click केल्यावर सुरुवातीला जे दिसेल ते पूर्वावलोकन असणार आहे. थोड्या क्षणात PDF तयार होइल. मग PDF पाहू शकता. PDF यादी मध्ये टाकला जाईल. गुण अथवा नोंदणी मध्ये काही बदल करून पुन्हा PDF button वरती click केल्यास, PDF तयार होऊन PDF यादी मध्ये त्याची बदली केली जाईल. PDF यादीमध्ये PDF उजव्या बाजूला ओढून delete करू शकता. नावावरती दाबून धरल्यास, शेअर करण्यासाठी एकाधिक PDF निवडू शकाल.
PDF technology वेगळी आहे. खूप zoom केल्यास PDF वरचे अक्षर फाटल्या सारखे दिसेल. अक्षर select किंवा copy करता येणार नाही. झेरॉक्स छान निघतील. हे पुरेसा आहे.
१. मूल्यमापन + वर्णनात्मक नोंदी (A4): नोंदी साठी जागा कमी पडल्यास नोंदी नविन पानावरती येतील. फक्त मूल्यमापन किंवा नोंदी असेही PDF तयार करू शकता.
२. प्रगती पत्रक PDF: यात वरचा भाग उलट असेल जे की दुमडून प्रगती पत्रक तयार करता येइल.
१. अलीकडील मूल्यमापनातील बदलानुसार ५वी व ८वी गुण व पास-नापास या नुसार सर्व PDF
२. जाती निहाय तक्ता PDF.
३. या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षामधील नवीन इयत्तेत स्थलांतर करण्याची सोय.
४. आपल्या अभिप्रायनुसार अजून खूप काही features वरती काम केला जाईल.
या पुढे ॲप ला फी असणार आहे. याबाबतीत आपला समर्थन अपेक्षित आहे. द्वितीय सत्र ला फक्त ₹249 फी आहे. प्रथम सत्र चा अनुभव घेऊ शकता. फी भरून व्दितीय सत्र सक्रिय करायचे आहे.
ॲप मध्ये काही चुका असल्यास, काही सुधारणा हवी असल्यास अथवा फी भरताना काही अडचण आल्यास संपर्क करायचे आहे. संपर्क फक्त WhatsApp वरती करायचं आहे. गरज पाहून आपल्याला call केला जाईल. कृपया direct call करू नका.