8 - 10 * लोकांची सोय होईल इथे.
जेष्ठ नागरिक ग्रुपने येऊन दहा पंधरा दिवस अगदी मनसोक्त राहू शकतात. * ( अधिक माहितीसाठी संपर्क करावा. )
घर कोकणात असलं तरी काही महत्वाच्या सोयी इथे आपल्याला नक्कीच मिळतील आणि स्वच्छता ही. पण त्या बरोबरच कोकणातल्या लोकांचं जीवनही अनुभवायला मिळेल.
तिन्हीसांजेला अंगणात चटई टाकून पत्ते खेळा, गाणी म्हणा, किंवा शांत पडून आकाशातले तारे बघा.
जात्यावर दळण दळता दळता ओव्या म्हणा,
आनंद घ्या...
अश्या सुखद आठवणी सोबत घेऊन ताजेतवाने व्हा.
एकदा तुम्ही इथे राहून गेलात की परत कधी येतोय आपल्याच घरी असं तुम्हाला सतत वाटत राहील याची आम्हाला खात्री आहे.
इन्व्हर्टर बॅकअप सुविधा *
कुलर *
हे कोकणातले घर असल्याने इथे शहरी सुविधांची जास्त अपेक्षा करू नये.
संडास व बाथरूम याची उत्तम सुविधा केलेली आहे, इंडियन तसेच कमोड सिस्टीम दोन्ही उपलब्ध आहे. परंतु पूर्वी जश्या या गोष्टी घराबाहेर असायच्या आजही आपल्याला तश्याच अनुभवायला मिळतील.
आपला अंग पुसायचा टॉवेल सोबत आणावा .
महत्वाचे म्हणजे ...येथे मांसाहार , मद्यपान व धूम्रपान वर्ज आहे.
कोणत्याही कारणाने घराचे ,घरातील वस्तूंचे अथवा इतर सामानाचे नुकसान झाल्यास भरपाई द्यावी लागेल.
वेळोवेळी वरील गोष्टींमध्ये बदल अथवा दुरुस्ती करण्याचा अधिकार ''आपलंच घर'' कडे राहील.
अहो आता कसला विचार करताय ?
फक्त फोन उचला आणि कधी येताय ते कळवा आम्हाला.
वाट पाहतंय…''आपलंच घर''
श्री. केदार प्र. भिडे.
+919822870626
Email: aapalachghar@gmail.com
Facebook: https://www.facebook.com/aapalachghar/