टंक (फॉण्ट)

ह्या पानावर महाजालावर विनामूल्य उपलब्ध असलेल्या विविध युनिकोड-आधारित देवनागरी टंकांचे दुवे संकलित केले आहेत.

ह्यांपैकी बहुतांश टंक हे  मुक्त (फ्री ॲण्ड ओपन सोर्स) परवान्यांतर्गत वितरित करण्यात आले आहेत. जीपीएल (GPL - जनरल पब्लिक लायसन्स) आणि ओएफएल (OFL ओपन फॉण्ट लायसन्स) ह्या मुक्त परवान्यांतर्गत हे टंक उपलब्ध आहेत. असे टंक विनामूल्य तर आहेतच पण मुक्तही आहेत.

मुक्त परवान्यांत वापरकर्त्यांना ४ स्वातंत्र्ये प्रदान केलेली असतात.

०१. आज्ञावलीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य (वैयक्तिक वा व्यावसायिक)

०२. आज्ञावलीची प्रत करण्याचे आणि ती प्रत इतरांना देण्याचे स्वातंत्र्य

०३. आज्ञावलीत हवा तसा बदल करण्याचे स्वातंत्र्य (ह्यासाठी आज्ञावलीची स्रोतसामग्री (सोर्स) उपलब्ध करून देण्यात येते.)

०४. आज्ञावलीत बदल करून त्या बदलांसह आज्ञावली वितरित करण्याचे स्वातंत्र्य (मात्र हे वितरण करताना तुम्हाला मिळालेली ही स्वातंत्र्ये इतरांनाही देण्याची अट असते.)

खाली दिलेल्या तक्त्यातील टंक हे पान तयार करणाऱ्याने तयार केलेले नाहीत. त्या टंकांचे केवळ दुवे येथे संकलित करण्यात आलेले आहेत.

त्या टंकांबाबतचे कोणतेही दायित्व हे पान तयार करणाऱ्यावर नाही.

===============