युनिकोडाच्या साहाय्याने संगणकावर मराठी कसे वापरावे? ही पुस्तिका धारिका ह्या पानावरून उतरवून घेता येईल.प्रश्नोत्तरे ह्या पानावर आपल्याला पडणारे विविध प्रश्न विभागून ठेवले आहेत. त्यांच्या दुव्यांवर टिकटिकवलं की त्या प्रश्नाचं उत्तर देणारं पान दिसेल.
आपल्या संगणकावर विंडोज एक्स्पी ही कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) असेल तर त्यातील सोय वापरून युनिकोडाच्या साहाय्याने मराठीत कसं लिहिता येईल ह्याविषयीची मराठी निवेदन असलेली दृक्श्राव्य शिकवणी पाहा.