लाटेक् मराठीची कार्यशाळा

हे पान सतत आद्यातनीत केले जाईल. त्यामुळे दर चार दिवसांनी पानास भेट दिल्यास उत्तम. ४ आणि ५ मे २०१७ च्या संध्याकाळी ५.०० नंतर या पानास नक्की भेट द्या. कार्यशाळेत वापरण्याकरीता काही दस्तऐवज भारीत केला जाईल.

शेवटचे आद्यातनीत केलेली तारीख ०४/ ०५/ २०१७, १७.४५ वाजता.

लाटेक् ही संगणकावर लेखन-संपादनासाठी वापरण्यात येणारी आज्ञावली आहे. तिचे फलित PDF धारिकेच्या स्वरूपात तयार होते. भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे येथे देवनागरी लिखाणाकरीता लाटेक्-चा वापर शिकण्याकरीता आम्ही खालील कार्यशाळेचे आयोजन करत आहोत. सर्व लाटेक्-प्रेमी, मराठी आणि संस्कृत प्रेमी, आणि कुतूहल असणार्यांचे या कार्यशाळेत स्वागत आहे!

(Click here for the English homepage of the workshop)

ध्येये:

  • लाटेक्-ची ओळख करून घेणे;

  • क्सेलाटेक्-च्या पॉलीग्लॉसीया या उपआज्ञावलीचा मराठी व इतर भारतीय भाषांकरीता वापर करावयास शिकणे;

  • लाटेक्-चा भारतीय भाषांकरीता फार कमी वापर होत असल्याने त्यात भारतीय भाषांकरीता बर्याच तृटी आहेत. या पैकी काही तृटीं पाहणे, नव्या तृटी शोधणे, त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे, व ते न जमल्यास त्याबद्दल पुढे काय करता येईल ते पाहणे.

बेळ: दिनांक ०६ मे २०१७ ला सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३०; जेवणाची सुटटी दुपारी १.०० ते २.०० दरम्यान असेल.

स्थळ: भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे चे दृक-श्राव्य वर्ग.

नोंदणी: काही गरज नाही; थेट कार्यक्रमस्थळी यावे.

तयारी:

  1. इच्छुकांनी आपापले संगणक सोबत आणावेत. शक्य असल्यास आपापल्या इंटरनेटच्या कांड्याही आणाव्यात. आपाल्या संगणकावर खालील बाबी प्रस्थापित आहेत याची खात्री करावी:

  2. वरील प्रस्थापना झाल्या की खालील दोन चाचण्या घ्या. त्या यशस्वीरीत्या पार पडल्या की तयारी पूर्ण झाली.

    • या पानाखाली दिलेली Trial.tex हा दस्तऐवज तुमच्या संगणकावर उतरवून घ्या. तो लाटेक् च्या संपादकात "latex" म्हणून चालवा. आपली लाटेक् प्रस्थापना योग्य असेल, तर लाटेक् यशस्वीरीत्या चालेल आणि PDF वा dvi दस्तऐवज निर्माण करेन. जर काही अडचण आली, तर गुगलवर तिचा उपाय शोधा वा लाटेक् काढून टाकून पुन्हा प्रस्थापित करा.

    • या पानाखाली दिलेली Marathi.tex हा दस्तऐवज तुमच्या संगणकावर उतरवून घ्या. त्यातील संस्कृत २००३ या टंकाऐवजी आपल्या संगणकावर असणार्या युनिकोड टंकाचे नाव लिहा. आता Marathi.tex लेटेक् च्या संपादकात "xelatex" वा "xetex" म्हणून चालवा. आपली लाटेक् प्रस्थापना योग्य असेल, तर लाटेक् यशस्वीरीत्या चालेल आणि PDF वा dvi दस्तऐवज निर्माण करेन.या दस्तऐवजातील कोणतेही % चिह्न हलवू नका!

    • जर काही अडचण आली, तर लाटेक्-च्या व्हेल्थुईस (Velthuis) आणि पॉलिग्लॉसिया (Polyglossia) या उपआज्ञावल्या प्रस्थापित झाल्या आहेत का हे तपासा. त्या असूनही लाटेक्-संपादक चुका दाखवत असेल, तर त्या वाचून आणि गुगलची मदत घेऊन उपाय शोधा.

  3. आधिपासूनच लाटेक् वापरणारांकरीता: (अ) आपल्या लाटेक् संपादक utf8 encoding वापरतो याची खात्री करून घ्यावी. तसे नसल्यास utf8 encoding सुरू करावे. (आ) आपल्या संगणकातील gloss-marathi.ldf या दस्तऐवजातील "script=Devaganari" या नोंदीस "script=Devanagari" असे करावे. या दस्तऐवजाचा पत्ता

  4. लिनक्स मधे "/usr/share/texlive/texmf-dist/tex/latex/polyglossia/gloss-marathi.ldf";

  5. OX Sierra मधे "/usr/local/texlive/2016/texmf-dist/tex/latex/polyglossia/gloss-marathi.ldf"; आणि

  6. विंडोज्-मधे "C:\Program Files\MiKTeX 2.9\tex\latex\polyglossia\​gloss-marathi.ldf" असा आहे (श्री. सुशांत देवळेकर यांचे विंडोजमधील पत्ता सांगितल्याबद्दल आभार!).

  7. शिवाय, आपल्याला संपूर्ण लाटेक्-ची गरज नाही. व्हेल्थुईस (Velthuis) आणि पॉलिग्लॉसिया (Polyglossia) या उपआज्ञावल्या गरजेचे आहे. त्या व्यतिरीक्त तुम्हाला हवे असल्यास Tex Repositoty मधील भारतीय टंकासंदर्भातची packages प्रस्थापित केली तरी चालतील.

  8. इतरांकरीता घरचा अभ्यास: आपल्या संगणकातील gloss-marathi.ldf या दस्तऐवजाचे स्थान शोधा; superuser बनून तो दस्तऐवज उघडा; आणि त्यातील "script=Devaganari" या नोंदीस "script=Devanagari" असे करा. याने आपला बराच वेळ वाचेल.

इतरेतर: या कार्यशाळेत कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र वा गुण दिले जाणार नाही. तसेच चहा, अल्पोपहार, जेवण, वा इतरेतर आहाराची सोय केली जाणार नाही, वा कसलाही भत्ता दिला जाणार नाही.