उन्नत भारत अभियान हा मानव संसाधन मंत्रालय,भारत सरकार यांचा एक उपक्रम आहे ज्या मध्ये ग्रामीण भारताच्या विकासासाठी देशातील प्रगत शिक्षण संस्थांचा समावेश केला जातो. या योजने अंतर्गत पात्र प्रगत शिक्षण संस्था ग्रामीण भागातील पाच गावे दत्तक घेतात व या दत्तक गावांच्या सामाजिक व विकासाशी निगडीत दैनंदिन जीवनातील समस्यांची (उदा. ग्रामीण योजनांतर्गत ग्राम स्वच्छता, शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन, पेयजल, रस्ते विकास, रस्त्याचे मूल्यांकन करुन मजबुतीकरण, जलसंधारण, इंधन व ऊर्जा, आरोग्य, दुष्काळ आदी) उकल करुन ते सोडवण्याचा प्रयत्न करतात.
कोरोनाव्हायरस (Coronavirus) होऊ नये, यासाठी हात स्वच्छ (hand cleaning) ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. या विषाणूचा (virus) धसका लोकांनी घेतला आहे, त्यामुळे त्याच्यापासून वाचण्यासाठी जी काही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, लोकं त्याची अंमलबजावणी करत आहेत. घरात असताना साबणानं हात धुणं ठिक आहे, मात्र घराबाहेर असताना हँड सॅनिटायझरशिवाय (hand sanitizer) पर्याय नाही आणि लोकं आपल्याला कोरोनाव्हायरस होऊ नये या भीतीनं मिनिटामिनिटाला हँड सॅनिटायझर वापरत आहे.
"सर्दी, खोकला असलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्यास, अशा व्यक्तींचं सामान उचलल्यास, गर्दीत एखादी अशी संशयित व्यक्ती दिसल्यास तुम्ही हँड सॅनिटायझर वापरायला हवं. जेणेकरून खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर उडणारे थेंब तुमच्या हातामार्फत तुमच्या शरीरात जाणार नाहीत. शिवाय जेवणाच्या आधी आणि जेवणानंतरही तुम्ही हँड सॅनिटायझर वापरू शकता.
सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण जगात करोना विषाणूने थैमान घातलेलं आहे. संपूर्ण जग सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. चीनमधून संपूर्ण जगभर हा विषाणू पसरलेला आहे.
या विषाणू पासून वाचण्यासाठी अनेक प्रकारचे सल्ले वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत.
यापैकीच एक सर्वमान्य सल्ला असा, की व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आणि करोनापासून आपला बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सीचं मुबलक प्रमाणात सेवन करावं.
एका सर्वेक्षणानुसार, विचार केला तर लक्षात येईल, की संपूर्ण जगामध्ये ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना या विषाणूची बाधा लवकर होते.
सध्या कोरोनाची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यापासून वाचण्यासाठी जमतील ते सगळे उपाय सध्या घरबसल्या लोकं करत आहेत.
म्हणून, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सगळीकडे व्हिटॅमिन सी चा मुबलक प्रमाणात वापर केला जात आहे.
दररोजच्या जेवणात पुढील गोष्टींचा समावेश करवा
आंबट फळे, लिंबू, आवळा, संत्री, मोसंबी, पेरू, चिंच, मोच्द आलेल्या धान्यात विटामिन सी जास्त प्रमाणत असते.
भिजवलेले पदार्थ उदा. ढोकळा, इडली इ.मध्ये विटामिन सी जास्त असते
सामान्य लोकांनसाठी दरोज व्हिटॅमिन-सी ची गरज:
पुरुषांसाठी 90 मिलीग्राम(mg)
स्त्रियांसाठी 75 मिलीग्राम(mg)
गर्भधारणा आणि स्तनपान:
वय 18 किंवा त्यापेक्षा लहान, 115 मिलीग्राम (mg);
वय 19 ते 50 वर्षे 120 मिलीग्राम (mg).
व्हिटॅमिन-सीच्या कमतरतेच्या लोकांसाठी:
व्हिटॅमिन-सी च्या टॅबलेट दररोज एकदा किंवा दोनदा 100-250 मिलीग्राम (mg) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात.
मास्कमुळे तुमचं नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकली गेलं पाहिजे.
मास्क चेहऱ्यावर घट्ट बसले पाहिजे.
मास्क घालताना किंवा काढताना पृष्ठभागाला हात लावू नका. त्यापूर्वी आणि नंतरही हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत
मास्क घातल्यानंतर खोकताना किंवा बोलताना मास्क खाली करू नये. यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते
एकदाच वापरायचे (युज अॅण्ड थ्रो) मास्क एकदाच वापरून पुन्हा वापरू नयेत.
साधे कापडी मास्क स्वच्छ धुतल्याशिवाय वापरू नयेत. हे मास्क वापरल्यानंतर गरम पाण्यात धुऊन पुन्हा वापरले तरी चालेल.