जिवन विकास मंडळ देगलूर संचलित,श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय हदगाव
🌸 स्वागत आहे 🌸
जिवन विकास मंडळ, देगलूर संचलित
श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय, हदगाव
ता. हदगाव, जि. नांदेड
श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय, हदगाव ही दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित निवासी शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच निवास, भोजन व आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येतात.
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व त्यांना स्वावलंबी बनवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. शैक्षणिक शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो.
प्रेमळ वातावरण, अनुभवी शिक्षक वर्ग व सुरक्षित शालेय परिसर यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवणे हेच आमचे कार्य आहे.
श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय, हदगाव ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समर्पित निवासी शाळा असून, शैक्षणिक, सामाजिक व नैतिक विकासासाठी कार्यरत आहे. इथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. आम्ही मुलांना शिक्षण, भोजन, आणि निवासाची सोय पूर्णपणे मोफत देतो.
अद्ययावत संगणक कक्ष
घरगुती वातावरणात राहण्याची उत्तम सोय.
शाळेची गॅलेरी
आमचा पत्ता (संपर्क)
श्री साईबाबा निवासी अपंग विद्यालय भदन्त टेकडी समोर, तामसा रोड हदगाव ता. हदगाव जि. नांदेड पिन - 431712 मो. नं.7387838587 , 8805171804