RENT AGREEMENT
RENT AGREEMENT
भाडेकराराची प्रत नव्या प्रणालीत थेट पोलिसांकडे जमा.
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार (लिव्ह ॲण्ड लायसन्स) नोंदविण्याची १.९ ही प्रणाली जुनी आहे. त्यामुळे २.० ही प्रणाली विकसित केली आहे. याअंतर्गत भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्स(सीसीटीएनएस) या पोलिसांच्या संगणक प्रणालीत आपोआप मिळणार आहे. भाडेकराराची प्रत प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नेऊन देण्याची गरज राहणार नाही.
अधिक माहितीसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in
किंवा विभागाच्या सारथी हेल्पलाईनला संपर्क करा – ८८८८००७७७७.
M. No. 9527351835