सौ संयुक्ता दाणी संगीत पुरस्कार
सौ संयुक्ता दाणी संगीत पुरस्कार
Sanyukta Dani 2026 -27
विषय :सौ संयुक्ता दाणी संगीत पुरस्कार
माननीय मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका
नमस्कार
आपणाला माहीतच असेल की रोटरी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था आहे .अमेरिकेमध्ये 1905 मध्ये स्थापन झालेली ही संस्था आज जगभर पसरलेली आहे .रोटरी सभासद विविध समाजोपयोगी काम करत असतात .
आमचा रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर हा 41 वर्ष जुना क्लब आहे. आमच्या क्लब तर्फे आम्ही शालेय विद्यार्थ्यांना संयुक्ता दाणी संगीत पुरस्कार देतो .या पुरस्काराचा उद्देश ज्या मुलांमध्ये सुगम संगीताची आवड आहे त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणे हा आहे. पुरस्काराचे यंदा 21 वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप चांदीचे पदक आणि सर्टिफिकेट असे आहे. या पुरस्कारा करता मुला-मुलींची निवड आम्ही एका स्पर्धेमधून घेतो .
याकरता आपल्या शाळेतील इयत्ता चौथी ते इयत्ता सातवीचे विद्यार्थी आपण निवडावेत जे सुगम संगीतात निपुण आहेत. यासाठी दोन गट आहेत.
1. गट एक : इयत्ता चौथी व पाचवी
2. गट दोन : इयत्ता सहावी व सातवी
विद्यार्थी कोणतेही मराठी/ हिंदी, भजन/ भावगीत/ नाट्यगीत गाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी आपले गाणे व्हिडिओ शूटिंग द्वारे 25 नोव्हेंबर पर्यंत खाली दिलेल्या गूगल फॉर्म लिंक वर अपलोड करावेत. या स्पर्धेच्या दोन फेऱ्या आहेत .
१) पहिल्या फेरीत कोणताही वाद्याचा वापर नसावा (सुरपेटी किंवा तंबोरा चालेल )
२) गाण्याचा कालावधी तीन मिनिटे असावा .
३) गाण्याच्या आधी स्पर्धकाने आपले नाव शाळा आणि इयत्ता सांगावी .
पहिल्या फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या किंवा अंतिम फेरीचे व्हिडिओ गाणे पाठवण्याची अंतिम मुदत 5 डिसेंबर आहे. यामध्ये साथीदारांसह विद्यार्थ्यांनी गाणे म्हणावे त्या गाण्याची व्हिडिओ क्लिप गुगल फॉर्मवर अपलोड करावी. याची माहिती त्यावेळी कळवण्यात येईल .
विजेत्या विद्यार्थ्यांचे गीत गायन आमच्या रोटरी क्लब मध्ये 4 जानेवारी( सोमवार) 2027 रोजी होईल .
तरी आम्ही आपल्याला विनंती करतो की आपल्या शाळेतील निवडक मुला मुलींची व्हिडिओ क्लिप आम्हाला 25 नोव्हेंबर पर्यंत जरूर पाठवावी. अधिक माहितीसाठी खालीलपैकी कोणाशीही संपर्क साधावा .
Ann सीमा महाजन (९८२३१६०६३५)
Ann नेहा पाठक (९८२२८३५०३७)
Rtn. शिरीष क्षीरसागर (९८२२०४०७७१)
Rtn. संजीव चौधरी (९४२२३१७५३९)
Rtn.Pre.प्रकाश गायकवाड (९४२३००५०२६)
Rtn.Sec.केदार साठे (९७६६२८६८६०)
Google Form Link to upload 1 st round videos :