राजयोग योगा क्लासेस द्वारे आयोजित Covid- 19 साठी प्राणायाम.
दि. १६.०५.२१
वेळ : सायं. ५:०० ते ६:३०
https://chat.whatsapp.com/HXUfkZM475t9Q1YKVU72Uo
वाढते प्रदूषण, धुळ, विविध प्रकारचे जिवाणू, विषाणु, नाकावाटे शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. यासाठी आपल्या पुर्वजांनी हजारो वर्षांपूर्वीच सखोल संशोधन करून जलनेती ही एक अतिशय प्रभावी उपचार पद्धती शोधून काढलेली आहे. जलनेती मुळे श्र्वसन मार्गातील दुषित कण, जिवाणू विषाणू बाहेर फेकले जातात. श्र्वसन मार्ग स्वच्छ व मोकळा होतो. भरपूर प्रमाणात प्राणवायू आत येतो. सर्व दुषित हवा बाहेर पडते. फुफ्फुसांची क्षमता वाढते. डोळ्यांचे, मेंदूचे, कानाचे विकार दूर होतात. श्वसनाशी संबंधित विकार जसे दमा, वारंवार होणारी सर्दी, ॲलर्जी दूर होतात. मानसिक व बौद्धिक समतोल साधला जातो. एकाग्रता वाढते. संसर्गजन्य विषाणूंशी लढा देण्यासाठी जलनेती एक प्रभावी उपयुक्त प्रक्रिया आहे. आपण ती शिकून घ्यावी व नियमित करावी त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. यासाठी आम्ही आपणास विनामूल्य मार्गदर्शन करणेस तयार आहोत.