गांधी फाउंडेशन परीक्षेत के आर टी हायस्कूल वणी विद्यालयाचे घवघवीत यश.....
गांधी फाउंडेशन परीक्षेत के आर टी हायस्कूल वणी विद्यालयाचे घवघवीत यश गांधी फाउंडेशन परीक्षा 2022- 23 मध्ये विद्यालयातून एकूण 58 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यात 57 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व गायत्री विजय भोये ही जिल्ह्यात प्रथम तसेच गायत्री संतोष पेंढारी ही जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्यानिमित्ताने विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर तसेच उपमुख्याध्यापक श्री गायकवाड सर, पर्यवेक्षिका अहिरे मॅडम, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री कुवर डी वाय , श्रीमती निकम मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यालय परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या💐🌸💐
के आर टी हायस्कूल वणी येथे कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांची जयंती उत्साहात साजरी
के आर टी हायस्कूल वणी येथे कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांची जयंती उत्साहात साजरी -----मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी व्ही. शिंदे होते. कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधव यांनी संस्थेच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान असून कर्मवीरांपासून प्रेरणा घेऊन त्यांनी संस्थेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले .शेतकरी नेते म्हणून त्यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना योग्य असे शिक्षण मिळाले पाहिजे या विचाराने ते प्रेरित झालेले असल्याने खेडोपाडी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचा विस्तार करण्यात त्यांनी खूप मोठे योगदान दिले .त्यांचे हे योगदान कायमस्वरूपी प्रेरणादायी राहील. म्हणून त्यांचा कार्याप्रती नेहमी कृतज्ञता बाळगावी असे आवाहन यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.व्ही. शिंदे यांनी अध्यक्ष स्थानावरून केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उप मुख्याध्यापक आर डी गायकवाड पर्यवेक्षक व्ही.आर.आहिरे ज्येष्ठ शिक्षक एस.जे.पवार डी वाय कुवर मुख्य लिपीक बाळासाहेब देवरे मनोहर जाधव मनोज चव्हाण श्रीमती गायकवाड युवराज गवारे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.पी. पवार यांनी केले .तर आभार श्रीमती एम.ए.पोटींदे यांनी मानले.
के .आर .टी .हायस्कूल वणी येथे "विश्व मराठी भाषा गौरव दिन " मोठ्या उत्साहात साजरा !!
के .आर .टी .हायस्कूल वणी येथे "विश्व मराठी भाषा गौरव दिन "मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .27 फेब्रुवारी हा दिवस प्रसिद्ध मराठी कवी 'कुसुमाग्रज 'यांचा जन्मदिन असून त्यांच्या साहित्याच्या अतुलनीय सहभागाबद्दल हा दिवस विश्व मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मा, मुख्याध्यापक श्री शिंदे बी व्ही सर, उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पर्यवेक्षिका व्ही. आर. अहिरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयातील ज्येष्ठ भाषा शिक्षक श्री एच पी गवळी यांनी भूषविले. कार्यक्रमामध्ये इयत्ता सातवी ब च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांची ओळख करून देताना ,कुमारी दूर्वा पाटील हिने कवी कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता सादर केली तर कुमार खुशाल गावित या विद्यार्थ्याने एक कथा सादर केली .तसेच कुमार उमेद दायमा या विद्यार्थ्याने 'नटसम्राट 'या नाटकातील काही संवाद सादर केले. इयत्ता सहावी अ ची विद्यार्थिनी कुमारी
प्राची आहेर हिने कुसुमाग्रजांच्या जीवनावर आपले विचार प्रकट केले. तसेच ईश्वरी शिंदे या विद्यार्थिनीने स्वतः लिहिलेली 'आई' ही कविता सादर केली .विद्यालयातील शिक्षक श्री तुंगार जी .एम. यांनीही 'समतेचे तुफान'या कवितेचे गायन करून दाखवले .श्री गोबाले एस .आर .यांनी वि .वा. शिरवाडकर यांच्या जीवनावर आपले विचार प्रकट केले .इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी 'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी' ही कविता सामुदायिक रित्या सादर केली .श्री गवळी एच .पी. यांनी अध्यक्ष स्थानावरून विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनानिमित्त सखोल मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिंदे व श्रीमती निकम एच आर यांनी केले तर श्रीमती डंबाळे एन. जे. यांनी उपस्थितांचे आभार मानले.
के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरी !!
येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. हायस्कूल वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी अध्यक्ष माननीय श्री संपतरावजी घडवजे हे होते. सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मा, मुख्याध्यापक श्री शिंदे बी व्ही सर यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी आपल्या प्रास्तविकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व त्यांच्या कार्याचा आदर्श हा सर्व विद्यार्थी व जनतेने घेतला पाहिजे असे सर्वांना आवाहन केले, यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रम सादर केले, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा व पोवाडे सादर करण्यात आले, कार्यक्रमासाठी शिवचरित्रकार श्री विनोद नाठे हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पोटींदे एम ए यांनी केले व श्रीमती जाधव ए आर यांनी मान्यवरांचे आभार मानले, यावेळी व्यासपीठावर शालेय समिती सदस्य किसनरावजी मोरे, पारसशेठ शिसोदिया,, शिवाजी घुले ,राजेंद्र थोरात, अनिल देशमुख, राजेंद्र महाले, राकेश थोरात, पियुष भवर ,अँड गोडसे उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पर्यवेक्षिका व्ही. आर. आहेर उपस्थित होते सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
के आर टी हायस्कूल वणी येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) विद्यालयात साजरा
के आर टी हायस्कूल वणी येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) विद्यालयात साजरा करण्यात आला, यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बस्ते यु, डी सर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री गायकवाड आर डी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थिती होते,
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मा. मुख्या. श्री. बस्ते यु. डी. सर यांच्या संकल्पनेतून
कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक यू.डी.बस्ते होते. तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती लता कांबळे या होत्या . लता कांबळे यांनी मी सावित्रीबाई फुले बोलते या एकांकिकेद्वारे क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे लहानपण ते अखेरपर्यंतचा कार्य प्रवास अत्यंत रसभरीत व जिवंत सादर केला. सावित्रीबाईंचे लहानपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह नंतरचे जीवन प्रतिगामी समाजाविरुद्ध ठोकलेले बंड स्ञी साक्षरतेसाठी केलेले प्रयत्न अधोरेखित करून जीवनाचा अंतदेखील समाजाची सेवा करताना प्लेग रुग्णाची शुश्रषा करताना झाला. सुंदर अशा या एकांकिकेद्वारे श्रीमती कांबळे यांनी विद्यार्थी व उपस्थित मान्यवर यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक यू.डी.बस्ते यांनी प्रथम महिला शिक्षिका प्रथम महिला मुख्याध्यापक यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अधोरेखित करताना महात्मा फुले यांनी थॉमस पेन या विचारवंताकडून घेतलेल्या प्रेरणेतून त्यांनी सावित्रीबाई फुले यांना प्रथम शिक्षण देत स्ञी शिक्षणासाठी त्यांना प्रेरित केले .सावित्रीबाई फुले यांचे समाजावर खूप मोठे ऋण असून आजची आधुनिक स्त्री ही सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यातूनच घडलेली आहे .म्हणून या थोर समाजसेविका थोर शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजावर कायमच ऋण राहणार आहे त्यांच्या कार्याप्रती समाजाने कृतज्ञ राहिले पाहिजे असे आवाहन यावेळी केले .यावेळी व्यवस्थापन समिती अध्यक्षा वंदना गांगुर्डे उपमुख्याध्यापक आर डी गायकवाड पर्यवेक्षक डी.जी पानसरे पर्यवेक्षिका व्ही आर आहिरे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .शिक्षक मनोगत श्रीमती जे आर टोंगारे एच पी गवळी यांनी व्यक्त केले .संगीत शिक्षक ए.एन.खुळे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर गीत सादर केले .विद्यार्थी एकांकिका पूजा पुरकर व कोमल मातेरे यांनी सादर केले. अनेक विद्यार्थी मनोगते व्यक्त करण्यात आली .अनेक विद्यार्थिनींनी वीर स्ञिया यांची वेशभूषा परिधान केलेली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर.व्ही. भामरे यांनी केले तर आभार एम ए पोटिंदे यांनी मानले.सर्व स्ञी शिक्षिकांचा या वेळी सत्कार करण्यात आला
मा. मुख्या. श्री. बस्ते यु. डी. यांचे अध्यक्षीय भाषण
मी सावित्रीबाई फुले बोलते - श्रीमती लता कांबळे
.संगीत शिक्षक ए.एन.खुळे यांचे सावित्रीबाईंच्या जीवनावर गीत
सांस्कृतिक कार्यक्रम : दि.२४/१२/२०२२
(संकल्पना :- श्री. बस्ते यु.डी. (मा.मुख्याध्यापक )
के. आर. टी. हायस्कूल, वणी ची विद्यार्थिनी लक्ष्मी भोये हिचे राजश्रेय मॅरेथॉन दिंडोरी स्पर्धेमध्ये सुयश
के. आर. टी. हायस्कूल, वणी ची विद्यार्थिनी लक्ष्मी भोये हिचे राजश्रेय मॅरेथॉन दिंडोरी यास्पर्धेमध्ये सुयश मिळवले.
मा. मुख्याधापक श्री. बस्ते यु. डी. सर यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. व तिला पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी सुध्दा घेतला पाहिजे असे त्यांनी विद्यार्थ्याना आव्हान केले. क्रीडा शिक्षक श्री. काटके एस. पी. ,श्रीम. कानवडे के. के. यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड यांनीही पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले , पर्यवेक्षक डी.जी. पानसरे, पर्यवेक्षिका व्ही. आर. अहिरे, सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही तिचे कौतुक केले व तिला पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.
के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे शालेय स्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे शालेय स्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मा. मुख्याधापक श्री. बस्ते यु. डी. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, प्रत्येकाच्या जीवनात खेळाला फार महत्व आहे. पूर्वीच्या काळी युद्ध होत असत. पण आता शांततेच्या काळात आपल्या अंगी असणारे गुण आपल्याला खेळाच्या माध्यमातून दाखविता येतात. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे . यावेळी उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पर्यवेक्षक डी.जी. पानसरे, पर्यवेक्षिका व्ही. आर. अहिरे, क्रीडा शिक्षक श्री. काटके एस. पी. श्रीम. कानवडे के. के. श्री. पवार व्ही. पी. , सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन
Highlights of School level science fair 2022-23.
के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !!.
पांडाणे वार्ताहर :- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. हायस्कूल येथे विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक यु.डी. बस्ते हे तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश खरे हे होते. सुरुवातीला सर्व मान्यवरांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पर्यवेक्षक डी.जी. पानसरे, पर्यवेक्षिका व्ही. आर. अहिरे, ज्येष्ठ शिक्षक एस. जे. पवार, के.जी. गांगुर्डे,डी.के.टोपले एस.डी. चव्हाण, एच.पी. गवळी, जी.एम.तुंगार एन. बी. वायकंडे पुंडलिक चारोस्कर इत्यादी मान्यवर स्थानापन्न होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख एस.एल. कड यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे कोमल वसंत मातेरे, अक्षरा स्वप्नील कोकाटे, सोनाली सुनील कड, अंजली बाळासाहेब कतवारे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतात श्री. गोबाले एस. आर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना अभ्यास किती महत्वाचा आहे या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश खरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विद्यार्थ्यांना ज्ञात नसलेल्या विविध घटना यावेळी विद्यार्थ्यांना सांगितल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, स्त्रियांसाठी, कामगारांसाठी केलेले कार्य त्यांनी विस्तृतपणे विद्यार्थ्यांसमोर मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे किंवा समुदायाचे नव्हते तर त्यांचे कार्य हे सर्व भारतीयांसाठी होते हे त्यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन खूप शिकावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक यु. डी. बस्ते यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रंथालय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या ग्रंथालय प्रदर्शनाचा लाभ घेतला व बाबासाहेबांची ग्रंथ संपदा समजून घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. आर. जाधव यांनी तर आभार प्रदर्शन व्ही. पी. पवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण पानपाटील, डी. आर. शेलार, आर. एम. सुरकर,श्रीमती एन.पी.शिरसाठ एम.ए.पोटींदे जे.व्ही.खापरे एस.व्ही.सूर्यवंशी आर.व्ही.भामरे एस.डी.तोडकर देशमुख जे. आर. टोंगारे, बी. जी. बागले, एल. एस. गायकवाड, एम.डी. जाधव, एम. पी. चव्हाण, पंढरीनाथ शिरसाठ, युवराज गवारे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
के आर टी हायस्कूल वणी. येथे गीता दिन व जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आले.यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांची संगीत खुर्ची स्पर्धा व बॉटल पट्टी स्पर्धा घेण्यात आली. सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
के. आर. टी. हायस्कूल,वणी येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
वणी :- येथील के. आर. टी. हायस्कूल येथे भारतीय संविधान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अँड. शशिकांत क्षीरसागर हे तर प्रमुख पाहुणे विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. डी. बस्ते हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचे पूजन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. डी. बस्ते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात त्यांनी भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार यांचे महत्त्व विशद केले. भारतीय संविधानामुळे आजही आपला देश एक संघ आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. शिक्षक मनोगतात श्रीम. गांगुर्डे व्ही.एस. यांनी साविधनाची रचना व समित्याबाबत माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पर्यवेक्षक डी.जी. पानसरे, पर्यवेक्षिका व्ही.आर.अहिरे, सांस्कृतिक समीती प्रमुख एस. एल. कड, ज्येष्ठ शिक्षक एस. जे. पवार, एस. डी. शार्दुल,डी.वाय.कुवर, डी.के.टोपले, राजू सुरकार, एन.पी.शिरसाठ, एम. ए. पोटिंदे, जे. एस. खापरे, टोंगारे, महाले, श्रीमती कामडे, वाय. आर.सावंत, जी.एम.तुंगार, एच आर.चौधरी, एन.बी.वायकंडे, पुंडलिक चारोस्कर, गोबाले, एच.पी.गवळी, श्रीमती आर.व्ही.भामरे आदि मान्यवर स्थानापन्न होते.
यावेळी विद्यार्थ्यांत आर्या कड, तनिष्का पेंढारी, शितल गांगोडे, मेघना गांगुर्डे, कोमल शेवरे व पूजा पुरकर यांनी मनोगत व्यक्त केले तर शिक्षकांतर्फे ए. आर. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षिय मनोगतात अँड. शशिकांत क्षीरसागर यांनी भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्य घटना आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या चार मजबूत खांबांवर भारतीय राज्यघटना आधारित आहे. भारतीय संविधानातील कलम 21 व कलम 39 अ विषयी विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली.
यावेळी संविधान दिनानिमित्त विद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, कविता गायन इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रवीण पानपाटील, ए. एन. खुळे,जी.जी.कदम एस. के. भूरकूड, डी. वाय. कुवर, पंढरीनाथ शिरसाट, युवराज गवारे, खंडेराव दहाडदे, किरण गायकवाड यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूञसंचालन इयत्ता ९अ च्या विद्यार्थीनी कोमल मातेरे व सोनाली कड यांनी केले तर आभार अक्षरा कोकाटे हिने केले .
कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा
कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा____
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय वणी येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे उप मुख्याध्यापक आर डी गायकवाड होते . यशवंतराव चव्हाण यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्वपूर्ण आहेच पण त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खास करून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी पुरोगामीत्वाचा स्वीकार करून महाराष्ट्र राज्याला प्रगत बनवण्यामध्ये निभावलेली भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे .आज महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगत राज्य समजले जाते. त्याचे श्रेय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जाते. 1962 च्या युद्धात भारत संकटात असताना त्यांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून निभावलेली भूमिका ही हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते. उत्तम साहित्यिक असलेले यशवंतराव कोणत्याही टीकेने बिथरून जात नसत. अतिशय नम्र असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात अपार श्रद्धा आहे ,असे उद्गार यावेळी मुख्याध्यापक यू.डी.बस्ते यांनी काढले. अध्यक्षीय भाषणात उप मुख्याध्यापक आर डी गायकवाड यांनी त्यांचे साहित्य प्रेम व साहित्य रचना यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी यावेळी पर्यवेक्षिका व्ही.आर.आहिरे, पर्यवेक्षक डी जी पानसरे, ज्येष्ठ शिक्षक एस.जे. पवार, एस डी मोरे, के जी गांगुर्डे, उपशिक्षक राजू सुरकार, जी.बी.उगले, श्रीमती एन.पी.शिरसाठ, एम ए पोटींदे , श्रीमती ए. आर जाधव ,श्रीमती खापरे श्रीमती टोंगारे, श्रीमती आर.व्ही.भामरे, जाधव पी. यु., एच पी गवळी, चौधरी एच आर , वायकांडे एन जे., चारोस्कर पी. जी. गोबाले एस आर , युवराज गवारे, भोसले, किरण गायकवाड ,पंढरीनाथ शिरसाट, हेमंत पिठे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूञसंचालन एस.एल.कड तर आभार पी.व्ही.पानपाटील यांनी मानले.
के. आर. टी. हायस्कूल वणीच्या यज्ञेश बागुल चे तालुका स्तरीय फ्री स्टाइल कुस्तीत जिल्हा स्तरावर निवड.
आज दिनांक 16/11/2022 रोजी जवूळके वणी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते ,या स्पर्धेत दिंडोरी तालुका स्तरीय फ्री स्टाइल कुस्ती 55 किलो वजन गटात के आर टी वणी विद्यालयाचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी कुमार यज्ञेश भास्कर बागुल याने प्रथम क्रमांक मिळविला,त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली, त्याबद्दल त्याचेल. विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री. बस्ते यु. डी. सर व उप मुख्याध्यापक श्री. गायकवाड आर. डी. सरांनी त्याचे अभिनंदन केले . पर्यवेक्षक श्री.पानसरे सर, पर्यवेक्षिका श्रीमती. अहिरे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्याला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धे साठी शुभेच्छा देण्यात आल्या. यज्ञेश भास्कर बागुल याला श्री. काटके सर व श्रीमती. कानवडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
के. आर. टी. हायस्कूल वणी येथे जनणायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
भगवान बिरसा मुंडा जी यांनी आपल्या कार्याने व आपल्या विचारांनी समाजाला एक नवी दिशा दाखवली. त्याचे जीवन हे शोर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे.
अशा महान देशभक्त जनणायकास जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
के. आर. टी. हायस्कूल वणी येथे मा. प्रविण (नाना) जाधव संचालक (म. वि. प्र. दिंडोरी व पेठ तालुका) यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 2022 मधील इयत्ता पाचवीच्या पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार.
शनिवार दि.12/11/2022
रोजी म.वि.प्र.समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल,वणी. या विद्यालयास दिंडोरी व पेठ तालुका संचालक मा. प्रविण (नाना) जाधव यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी संपूर्ण शाळा, मैदान व इतर भौतिक साधनाची, संगणक कक्षाची पाहणी केली.
याप्रसंगी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक श्री.यु. डी. बस्ते सर यांच्या हस्ते मा.प्रविण (नाना) जाधव यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 2022 मधील इयत्ता पाचवीच्या पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी म. वि. प्र.समाज या शैक्षणिक संस्थेसाठी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी योगदान दिले तर नक्कीच ही संस्था महाराष्ट्रात अग्रस्थानी येण्याचा बहुमान मिळवेल. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर दिला पाहिजे. शिक्षण हा आपला तिसरा डोळा आहे . सध्याचे युग हे डिजिटल युग असल्याने संगणकाचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याला करता आला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनी आपले योगदान द्यावे.असा बहुमोल संदेशही त्यांनी यावेळी दिला.
के. आर. टी. हायस्कूल वणी येथे राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा.
के. आर. टी. हायस्कूल वणी.येथे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मा. मुख्याध्यापक श्री यु डी बस्ते सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच जेष्ठ शिक्षक श्री. गवळी एच. पी. यांनी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विषयी माहिती दिली. उपमुख्याध्यापक गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. मुख्याध्यापक श्री. बस्ते यु. डी. सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक श्री.पानसरे सर, पर्यवेक्षिका श्रीमती.अहिरे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Happy Diwali 2022
Happy Diwali 2022 – Diwali will be celebrated on 24th October this year. Diwali, the festival of lights, is one of India’s most awaited festivals. Diwali begins on the day of Dhanteras and is celebrated till Bhai Dooj. On the day of Diwali, people light diyas and candles at their homes and worship Goddess Laxmi and Lord Ganesha to invoke prosperity. People also exchange gifts and sweets with their family, friends, and coworkers on the occasion of Diwali. People wear new clothes on this day and get together to celebrate the festival. People also visit temples and distribute sweets to the needy. It is an auspicious day to start or buy new things as well.
के आर टी हायस्कूल वणी येथे दिवाळीची पूर्वतयारी
के आर टी हायस्कूल वणी. येथे वाचन प्रेरणा दिन. साजरा करण्यात आला .
वणी :- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. हायस्कूल येथे वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक यू.डी.बस्ते सर होते . तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. डी. गायकवाड, पर्यवेक्षक डी. जी. पानसरे, अहिरे व्ही. आर हे उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यालयाचे, उपमुख्याध्यापक आर.डी.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक गोबाले एस, आर यांनी ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक सावंत सर , चव्हाण एस. डी., गवळी सर, जाधव पी. यु, पवार एस. जे. चौधरी एच. आर, चारोस्कर पी.जी., काटके सर, कानवडे मॅडम, तोडकर मॅडम , देशमुख मॅडम, तुंगार जी. एम. निकम एस. एस. इंगळे जी. डी. जावळे पी.बी, आदि उपस्थित होते.
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात
डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
कार्य
१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
शिक्षण
त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत.त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत.डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
स्वभाव
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.
गौरव
अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.
भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
निधन
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.
के. आर. टी. हायस्कूल वणी येथे स्वच्छ हात धुणे प्रात्यक्षिक
टारगेट पीक परीक्षेत के. आर. टी. हायस्कूल वणीचे सुयश
वणी :- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या टार्गेट पीक या स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक असे यश प्राप्त केले आहे. या विद्यालयातील एकूण 18 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सुयश प्राप्त केले. विद्यालयातील आशा किरण घडवजे, श्रुती शिवाजी शार्दुल, भूषण संदीप सोनवणे, देवयानी प्रशांत पाळोद, लहू रामदास गांगोडे, ऋतुजा विजय पवार या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक तर अर्णव रंगनाथ गवळी, गायत्री विजय भोळे, सनी महेश शिरसाट, प्रवीण विनायक गवळी, सायली गोवर्धन पाटील, आश्विनी धनराज चौधरी या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक तर प्रतीक्षा शहाजी पवार, चैताली सुरेश वाघेरे, छाया श्रावण पवार, मयूर दत्तू ठाकरे, चैताली पंढरीनाथ भुसार, स्नेहल सोपान गायकवाड या विद्यार्थ्यांनी कास्यपदक प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. डी. बस्ते, उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पर्यवेक्षक डी. जी. पानसरे, पर्यवेक्षिका व्ही.आर. आहिरे आदींच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मान करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जी.एम. तुंगार, जी.डी. इंगळे, पी.बी. जावळे, एच.पी. गवळी, पी.जी. चारोस्कर, एच. आर. चौधरी, एस. डी. मोरे, डी. के. टोपले, के.जी.गांगुर्डे, आर. ए. भरसट, बी.जी. बागले, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख एस.एल. कड यांनी तर आभार प्रदर्शन पी. व्ही. पानपाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. जे. पवार,एस.डी. शार्दुल, एस. के. भूरकूड, युवराज गवारे, पंढरीनाथ शिरसाट आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कु. अनुष्का नितीन जावळे ,
इयत्ता :- ७ वी , तु :- अ
अनुष्का तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
From :- मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी
के. आर. टी. हायस्कूल वणी, ता. दिंडोरी, (नाशिक)
कु. यशवंत देविदास माळेकर ,
इयत्ता :- ७ वी , तु :- अ
यशवंत तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
From :- मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी
के. आर. टी. हायस्कूल वणी, ता. दिंडोरी, (नाशिक)
के आर टी वणी हायस्कूल येथे. माता पालक मेळावा
वणी. येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे के आर टी हायस्कूल येथे. माता पालक मेळावा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. यु डी बस्ते सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाली किरण जाधव इंटरनॅशनल कोच व पत्रकार श्री पाटोळे सर उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवाली जाधव यांनी स्वरक्षण या विषयावर उदबोधन केले. व मुलींना प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे उप मुख्याध्यापक मा.आर डी गायकवाड सर पर्यवेक्षक श्री. पानसरे सर श्रीमती. अहिरे मॅडम व पालक माता विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने व दिपप्रजलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक माता पालक संघ प्रमुख श्रीमती. डंबाळे मॅडम यांनी केले माननीय मुख्याध्यापक. बस्ते सर यांनी मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करावे. या विषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाची सांस्कृतिक समिती सर्व शिक्षिका यांनी प्रयत्न केले.
के. आर. टी. हायस्कूल, वणीच्या संकेत गावितचे मिनी मैरेथोन स्पर्धेत सुयश
वणी :- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. हायस्कूल वणीचा विद्यार्थी संकेत जयवंत गावित याने माजी सैनिक टिटवाला, एस. एस. एस. ए. आणि झेप अकादमी आणि अक्वा शिफ्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोम्बर 2022 रोजी आयोजित मिनी मैरेथोन स्पर्धेत 9 ते 12 वयोगटा मध्ये 2 कि. मी. लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्यास मा.श्री. नरेंद्र पवार (आमदार कल्याण पश्चिम, महाराष्ट्र प्रदेश) व सौ.उपेक्षाताई भोईर (उपमहापौर, नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका), मा.श्री.राजू वंजारी साहेब (वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण तालुका) यांच्या हस्ते बक्षीस रूपात प्रमाणपत्र, मेडल, ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यास एस. पी. काटके, के.के.कानवडे, एस. डी. शार्दुल, व्ही.पी. पवार या क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या सुयशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. डी. बस्ते, उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड, पर्यवेक्षक डी.जी. पानसरे, पर्यवेक्षिका व्ही. आर. अहिरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
शालेय पोषण आहार योजना'अंतर्गत वणी विद्यालयात पालेभाज्या व फळभाज्यांचे प्रदर्शन.........
आज दि- २९ सप्टेंबर २०२२ वार-गुरुवार रोजी सकाळी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित के. आर. टी. हायस्कूल, वणी विद्यालयात पालेभाज्या व फळभाज्या यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.'शालेय पोषण आहार योजना' अंतर्गत या प्रदर्शनात जंगली पालेभाज्या व फळभाज्या ही मांडण्यात आल्या होत्या.
'पोषण आहार समिती'प्रमुख श्री.चव्हाण एस डी आणि सदस्य श्री.चारोस्कर पी.जी. यांच्या देखरेखीत हा उपक्रम पार पडला. सांस्कृतिक समितीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थान श्रीमती-जावळे पी.बी.यांनी स्वीकारले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्री.काटके एस. पी.यांनी केले.शिक्षक मनोगतात विज्ञान शिक्षिका श्रीमती.इंगळे जी.डी. यांनी पोषण आहारात पालेभाज्या व फळभाज्या यांचे महत्व,उपयोग, मिळणारी जीवनसत्त्वे, निरोगी शरीरासाठीचे फायदे इ.बाबत सखोल माहिती दिली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री.बस्ते यु.डी. यांनी मार्गदर्शन केले.मा.उपमख्याध्यापक श्री.गायकवाड आर.डी.पर्यवेक्षक मा.श्री.पानसरे डी. जी. पर्यवेक्षिका मा. श्रीमती-अहिरे व्ही.आर. यांचे सहकार्य लाभले.जेष्ठ शिक्षक श्री.सावंत वाय. आर.चौधरी एच.आर. जाधव पी.यु. तुंगार जी.एम. वायकंडे एन. बी.तसेच जेष्ठ शिक्षिका तोडकर एस. डी. देशमुख ए. व्ही.भामरे आर.व्ही. डंबाळे एन. जे.पवार एस.एस. शिक्षिका निकम एस.एस. निकम आर.एच सुर्यवंशी एस जी.पवार ए. टी. पिंगळे आर. जी.गांगुर्डे व्ही.एस.सोनवणे आणि क्रीडा शिक्षिका श्रीमती-कानवडे के.के. या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीपणे राबविला.इयत्ता ५ वी आणि ६ वी च्या विद्यार्थ्यांनी पालेभाज्या व फळभाज्या उपलबध करून दिल्या.कार्यक्रमात शेवटी आभार प्रदर्शनाचे काम श्री.गवळी एच.पी.यांनी केले. छायाचित्रण श्री. चारोस्कर पी.जी.यांनी केले.
के. आर. टी. हायस्कूल, वणी येथे जागतिक ओझोन संरक्षण दिन उत्साहात साजरा-
वणी :- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. हायस्कूल येथे जागतिक ओझोन संरक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका व्ही. आर. अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. जी. पानसरे हे होते. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक यू.डी.बस्ते, उपमुख्याध्यापक आर.डी.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक एस. जे. पवार, एस. एल. कड, पी. व्ही. पानपाटील आदि मान्यवर स्थानापन्न होते.
यावेळी विद्यार्थ्यांतर्फे अक्षरा कोकाटे, समीर ठाकरे, पूजा पुरकर, या विद्यार्थ्यांनी तर शिक्षकांतर्फे ए. आर. साठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विज्ञान शिक्षक आर. ए. भरसट यांनी विद्यार्थ्यांना ओझोन वायू पृथ्वीचे संरक्षण कसे करतो हे प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. यावेळी ओझोन वायू कसा तयार होतो, ओझोनचा थर पृथ्वीला किती महत्त्वाचा आहे हे दाखविणारा माहितीपर व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. तर दीक्षा मोरे व रितिका महाले यांनी ओझोन संरक्षण दिनविषयी स्वरचित कविता सादर केली. एम. बी. वाळुंज यांनी विद्यार्थ्यांना यावेळी ओझोन थराविषयी विविध प्रश्न विचारून त्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्याच्या प्रयत्न केला. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी. जी. पानसरे यांनी ओझोन थराविषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा विद्यालयाच्या पर्यवेक्षिका व्ही. आर. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना ओझोनचा थर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड व जोपासना करण्याचे व सायकलीचा वापर करून प्रदूषण रोखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.ए. भरसट यांनी तर आभार प्रदर्शन आर. व्ही. कोल्हे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान समिती प्रमुख एस. डी. मोरे, ए. आर. साबळे, जे. व्ही. खापरे, बी. जी. बागले, एस. एल. शिंदे, श्रीमती इंगळे जावळे प्रयोगशाळा परिचर ए. एस. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
के.आर.टी. हायस्कूल, वणी येथे बालविवाह प्रबोधन कार्यशाळा
बालविवाह प्रबोधन कार्यशाळा............
दि.16/9/2022
**********
के.आर.टी. हायस्कूल, वणी येथे
आज सकाळी ठिक 11 वाजता "बालविवाह प्रबोधन व प्रात्यक्षिक" ची कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ शिक्षक मा.श्री.वाय. आर.सावंत यांनी स्वीकारले.
या कार्यक्रमात प्रबोधनकार श्रीमती-दीक्षित मॅडम आणि श्रीमती-केदारे मॅडम यांनी माहिती व प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यशाळेत इयत्ता 7 वी तु-अ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्रुती शिवाजी शार्दूल,सार्थक किरण महाले,योगिता तामचिकर,मयूर महाले,वैष्णवी जाधव,लक्ष्मी भोये,भाग्यश्री राऊत,मोहित चौधरी, भावेश चव्हाण या 7 वी तु-अ च्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.
प्रबोधनकारांनी सुई दोराओवणे, चेंडू लगोरी,धान्य निवडणे,आंधळी कोशिंबीर इ.प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक श्री.यु.डी. बस्ते यांनी मार्गदर्शन केले.मा.उपमुख्याध्यापक श्री.आर.डी. गायकवाड,पर्यवेक्षक श्री.डी. जी.पानसरे,पर्यवेक्षिका श्रीमती-अहिरे मॅडम यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम विद्यालयातील श्री. गवळी एच.पी., श्रीमती-निकम एस. एस., श्रीमती-निकम आर.एच.यांनी यशस्वीपणे राबविला.कार्यक्रमाचे आभार श्रीमती-इंगळे जी.डी. यांनी मानले.
वणी :- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, के. आर. टी. हायस्कूल वणी येथे हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. डी. बस्ते हे होते.
सुरुवातीला मान्यवरांचा हस्ते विद्येची देवता सरस्वतीचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने व कृतीयुक्त कार्यक्रमांनी हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे प्रश्नमंजुषा, हिंदी दिनाचे महत्त्व सांगणारी नाटिका, समूहगीत सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांतर्फे देविका तुषार शर्मा, कोमल वसंत मातेरे, योगिता भारत शिरसाठ, वैष्णवी राजेंद्र पवार, आर्या जगदीश कड, सोनाली सुनील कड, पूजा सुखदेव पूरकर, कोमल अनिल शेवरे, सागर हरी गायकवाड, बुशरा कैय्युम मंसूरी, मिसबा अंजूम पिंजारी, प्रतीक्षा अमोल गांगुर्डे, रितू निलेश ताडगे यांनी विद्यार्थ्यांतर्फे तर व्ही.एन.पाटील, डी.के.चौधरी, आर. एच. निकम, बी.एन. डंबाळे, एच.पी. गवळी यांनी शिक्षकांतर्फे मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. डी. गायकवाड, पर्यवेक्षक डी. जी. पानसरे, पर्यवेक्षिका व्ही.आर. अहिरे, हिंदी विषय शिक्षक डी. वाय. कुवर, जी.बी. उगले, एस. बी. उगले आदि मान्यवर स्थानापन्न होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक यू.डी. बस्ते यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात हिंदी भाषेचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना विषद करून सांगितले. त्याचप्रमाणे हिंदी विषयातील विविध साहित्य व साहित्यिकांची माहिती थोडक्यात विद्यार्थ्यांना दिली. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता सोमनाथ काळोगे व नेहा शंकर गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन रोशनी भास्कर राऊत हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एल. एस. पवार, पी.व्ही. पानपाटील, एस.एस. बचुटे, एम.बी. वाळुंज, सोनू मोगल, खंडेराव दहाडदे, किरण गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.
एका भयानक नव्या आजाराचे बळी: तुम्ही-आम्ही.
डॉ. राजस देशपांडे
न्यूरॉलॉजिस्ट
पुणे- मुंबई
ओपीडी च्या दारातून आत येत ती जरा घाईघाईतच, पण दबलेल्या आवाजात म्हणाली "डॉक्टर, माझ्या वडिलांना तपासायला आणलंय, पण ते आत यायच्या आधी मला पाच मिनिट बोलायचंय. चालेल ना?".
तिला नमस्कार करून मी खुर्चीवर बसण्यासाठी इशारा केला. एक आवंढा गिळून, खूप विचार करून आल्यासारखी ती बोलायला लागली "डॉक, माझे बाबा खूप ब्रिलिअंट आहेत, त्यांनी आयुष्यभर नुसता भरपूर पैसाच नाही, तर खूप माणसं आणि प्रतिष्ठाही कमावलीय. आमच्यासाठीही खूप केलंय. पण गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी बिघडलंय. नेमकं काय ते समजत नाही, पण अगदी वेगळे आणि विचित्र वागायला लागलेत, आमची पर्वा नसल्यासारखे. काही गोष्टी अगदी विसरून जाताहेत. मित्रांना टाळतात, आमच्याशीही फारसं बोलत नाहीत. आधी ते म्हणजे आमच्या कुटुंबाचा प्राण असल्यासारखे सगळ्यांना हसवायचे, बोलायचे, बाहेर जेवायला घेऊन जायचे, पण आता मात्र अगदी स्वतःचं जेवण, अंघोळ देखील विसरतात. आम्ही आठवण करून दिली तर चिडून ओरडतात, दार आतून बंद करून बसतात. अगदी मध्यरात्रीनंतरही फोनवर काहीतरी चालू असतं, सकाळीही लवकरच उठून बसतात. लॉकडाऊन मध्ये तर हे सगळं खूपच वाढलंय. आज यायचं कारण म्हणजे गेल्या दोन आठवड्यात अगदी आमची नावं देखील विसरताहेत. दिवसरात्र फेसबुक, इन्स्टा वर ऑनलाईन दिसतात, शेकडो व्हाट्सअँप सगळ्यांना फॉरवर्ड करत असतात. आम्ही विचारलं तर चक्क नाकारतात. परवा तर हद्दच झाली, आईनं मोबाईल हातातून काढून घेतला, तर तिच्यावर हातच उगारला! असे नव्हते हो आमचे बाबा.. काय करावं समजत नाहीय". ती रडायला लागली.
घोटभर पाणी पिल्यावर ती थोडी शांत झाली. तिच्या वडिलांना आम्ही आत बोलावलं. थोडे नाराजच दिसले.
"मला काहीही झालेलं नाहीये डॉक्टर. या लोकांना मी शांत बसलेलं पाहवत नाही. आयुष्यभर मी यांच्यासाठी झटलो, पण मला थोडा एकांतही हे मिळू देत नाहीत. मला वेड लागलंय, मी म्हातारा झालोय असं यांना वाटतं" बसल्या बसल्या त्यांनी मन मोकळं केलं!
त्त्यांची क्लिनिकल तपासणी (म्हणजे डॉक्टर स्वतः हातांनी, डोळ्यांनी आणि स्टेथोस्कोप, इतर औजारांनी तपासतात ती) अगदी नॉर्मल होती. स्मरणशक्ती आणि मेंदूच्या वेगवेगळ्या कार्यांचं विश्लेषण इत्यादी सगळ्या तपासण्या जवळपास नॉर्मल होत्या. एम. आर. आय. मध्ये थोडीशी वयोमानानुसार दिसणारी झीज होती, पण त्यामुळे अशी लक्षणं सहसा दिसत नाहीत.
आता माझं मत त्यांना स्पष्ट सांगायची गरज होती. आपण प्रत्येक पेशंटच्या पसंतीस उतरावं असं प्रत्येकच डॉक्टरला वाटतं, पण खरं बोलायची वेळ अली कि बरेचदा ती इच्छा बाजूला ठेवावी लागते, कारण पेशंटशी खोटं बोलणं शक्यच नसतं.
"सर, तुम्हाला स्क्रीन आणि मोबाईलचं अतिशय वाईट व्यसन लागलंय." मी त्यांना सांगितलं.
"अजिबात नाही! कधीतरी मेसेज बघायला मोबाईल वापरतो मी" ते इकडेतिकडे बघत म्हणाले. वयस्कर माणसाला मुलाबाळांसमोर खोटं बोलताना बघणं खूप क्लेशदायक असतं.
त्यांची मुलगी जरासं चाचरतच म्हणाली "बाबा, तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिवसातून निदान वीस-पंचवीस तरी व्हाट्सअँप फॉरवर्ड पाठवता, रात्री उशीरा पर्यंत फेसबुकवर दिसता".
संतापानं लालबुंद होऊन माझ्याकडे बघत ते स्वतःच्या मुलीला म्हणाले "आता नाही पाठवणार कुठलेही मेसेज तुला".
त्यांच्या वयाचा मान राखत, थोड्या तडजोडीच्या आवाजात मी म्हणालो, "सर, आपण आत्तापासून काही काळजी घेतली तर यातून बाहेर पडू शकाल. फार नुकसान झालेलं नाहीये अजून".
पण ते दुसऱ्याच जगात होते-व्यसनाच्या. दारू, सिगरेट, गांजा किंवा राजकीय विचारधारणेचा आंधळेपणा यापलीकडेही गेलेल्या या नवीन स्क्रीन-व्यसनामुळं नव्या-जुन्या सगळ्याच पिढ्या बौद्धिकदृष्ट्या उध्वस्त होताहेत!
त्यांच्या मुलीला विश्वासात घेऊन मी त्यांची केस आमच्या सायकोलॉजी कौन्सेलर (मानसशास्त्र सल्लागार) कडे पाठवली.
वयस्कर लोकांच्या या नवीन व्यसनामुळे त्यांच्यात विसरभोळेपणा, निर्णयक्षमता कमी होणे, मानसिक अस्थैर्य आणि अस्वस्थपणा, चिडचिड ही लक्षणं तर दिसतातच, पण मानदुखी, पाठदुखी, दिसण्याचा त्रास, चकरा येणे, डोकेदुखी, निद्रानाश असे अनेक विकारही होतात. नवीन संशोधनात असं दिसून आलंय की त्यांच्या मेंदूची झीजही वाढते. मानवी मेंदूला विविध प्रकारच्या संवेदना होणे, अनेक प्रकारच्या उत्तेजना (स्टिम्युलस) मिळणे आवश्यक आहे, ते न मिळाल्यास मेंदूच्या पेशींची वाढ खुंटते, आहेत त्याही पेशी निकामी व्हायला लागतात. दिवसभर स्क्रीन-मोबाईलकडे बघत राहणे हे एकच काम करण्यानं मेंदूला इतर कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही. हे फार भयंकर आहे.
अगदी श्रीमंतांपासून ते गरीब-वंचितांपर्यंत, दीड-दोन वर्षांच्या बाळांपासून ते नव्वदीतल्या स्त्री-पुरुषांपर्यंत अनेकांना या व्यसनानं गिळून टाकायचा प्रयत्न चालवलाय. धार्मिक, राजकीय, लोकांच्या भाषणांपासून ते वैज्ञानिक माहितीपर्यंत, व्हाट्सअँप फॉर्वर्डस पासून ते पॉर्नपर्यंत, कुणाला कशाचं स्क्रीन-व्यसन असेल ते कळणं अवघड झालंय, मात्र मोबाईल काढून घेतला तर घालमेल होणे हे एकच लक्षण या आजाराच्या निदानासाठी पुरेसं आहे. सगळी कामं, सगळ्या जवाबदाऱ्या विसरून नुसतं मोबाईल, कॉम्प्युटर मध्येच हरवून जाणं यात अनेकांच्या आयुष्याचं अतोनात नुकसान होतंय. मागच्या आठवड्यात तर एका सुशिक्षित वयस्कर गृहिणीनं "तासंतास मोबाईल गेम खेळू नकोस" असं सांगणाऱ्या नवऱ्याशी मारामारीच केली, तेव्हा तिच्याही ते लक्षात आलं आणि ती स्वतःहून दवाखान्यात आली.
माझ्यासहित आपण सगळेच थोडंसं नकळत या व्यसनाच्या आहारी जात आहोत याचं भान ठेवायला हवं. कारण रोजच्या कामात सतत हाती लागणारा फोन. या व्यसनातून सुटायचं असेल, तर पहिली पायरी म्हणजे ते व्यसन आहे, आणि आपण त्यात अडकलोय हे समजून घ्यायला हवं. इथेच माणसं मार खातात! दिवसातून ठराविकच वेळेपुरता स्क्रीन, मोबाईल वापरण्याचा निश्चय करणे आणि तो पाळणे ही दुसरी महत्वाची पण अवघड पायरी. सगळे नोटिफिकेशन / सूचना बंद करून ठेवणे, आणि चार-पाच तासांनी एकदाच दहा मिनटं मोबाईल चालू करून उत्तरं देणं हेही आवश्यक. फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सअँप यासाठी दिवसातील तीस-चाळीस मिनिटं राखीव ठेवून इतर वेळी लॉग-आऊट करणं, रात्री झोपायच्या वेळेआधी तासभर मोबाईल स्विच ऑफ करणं जरूरी आहे. जेवताना, अभ्यास करताना, वाहन चालवताना तर मोबाईल बंदच असावा, पण आठवड्यातून दोन दिवस मोबाइलशिवाय काम करण्याची सवय करायला हवी. यासाठी मनाचा निश्चय करणं ज्यांना जमलं, त्यांना या निर्दयी, गंभीर व्यसनावर मात करणं शक्य आहे. इतरांनी काही वर्षात झिजलेले निकामी मेंदू घेऊन जगण्याची तयारी ठेवावी!
डॉक्टर, लहान मोठे विक्रेते, राजकीय नेते यांना समाजाशी संपर्कात राहण्यासाठी फोन अवश्य असतो, पण "माझ्याशिवाय जग चालूच शकत नाही" अशी हास्यास्पद धारणा कुणीही ठेवू नये. उत्क्रांतीनं दिलेला अतिशय तल्लख मेंदू स्वतःहून नासवणे यापेक्षा मोठं दारिद्र्य ते काय? तुमच्या मेंदूपेक्षा, कुटुंबापेक्षा जर लोक, पैसे आणि स्क्रीन महत्वाचे असतील, तर तथास्तु!
आपणा सर्वांस "हॅपी स्विच-ऑफ".
(c) डॉ. राजस देशपांडे
न्यूरॉलॉजिस्ट
पुणे- मुंबई