मी डॉ. नितीन ज्ञानदेव चौधरी, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला येथे सेवेत आहे. आतापर्यंत सीताबाई कला महाविद्यालय अकोला येथे पदवीत्तर अर्थशास्त्र विभागात 13 वर्षे, R.A. कॉलेज वाशिम येथे 2 वर्ष, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत अध्यापनाचा अनुभव प्राप्त झालेला आहे. तसेच नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे एक वर्ष, व श्रीमती राधादेवी गोयनका महीला महाविद्यालय, अकोला येथे 2017 पासून 2019 पर्यंत बी.ए. Economics अध्यापन करण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर एम. फिल व पीएच.डी. कार्यात संशोधनाचा सुद्धा अनुभव आहे. श्रीमती राधादेवी गोयनका महीला महाविद्यालय, अकोला येथे पूर्णकालीन प्राध्यापक लागण्या अगोदर 35 रिसर्च पेपर प्रकाशित झालेले आहेत. यापैकी सहा पेपर भारत सरकार मार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या व सद्यस्थितीत नीती आयोगामार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या योजना मासिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यातील एप्रिल 2014 मधील योजना मासिकातील लेखाला लोकमत द्वारे पा.वा. गाडगीळ हा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले होते. याबरोबरच संशोधन कार्यामध्ये निरंतर संशोधन कार्य चालू आहे. सप्टेंबर 2019 पासून श्रीमती राधादेवी गोयनका महीला महाविद्यालय, अकोला येथे अर्थशास्त्र विभागांमध्ये पूर्णकालीन सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्ती झाल्या कारणाने महाविद्यालयाच्या निरंतर सेवेत सादर आहे.