K. C. E. Society's
M. J. College (Autonomous), Jalgaon
के. सी. ई. सोसायटीचे
मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव
मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), जळगाव
अंतर्गत परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना
1. सर्व विषयांच्या परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ)
स्वरूपाची असणार आहे.
2. सर्व विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
3. आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी राहून आपल्याला सदर परीक्षा द्यावयाची आहे. त्यासाठी कोणीही महाविद्यालयात येऊ नये.
4. आपल्या मोबाईल/टॅब/लॅपटॉपमध्ये इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे.
5. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल.
6. टी.वाय.बी.ए आणि एम. ए. द्वितीय वर्ष या वर्गाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २० गुणांची असेल. प्रश्नपत्रिकेत एकूण २४ प्रश्न विचारले जातील त्यापैकी २० प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
7. एस.वाय.बी.ए. च्या विद्यार्थ्यांची अंतर्गत परीक्षा १५ गुणांची आहे. प्रश्नपत्रिकेत १८ प्रश्न विचारले जातील. त्यापैकी १५ प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
8. अंतर्गत परीक्षेसाठी खाली दिलेल्या वर्गनिहाय लिंक्सवर परीक्षेसाठीच्या विषयनिहाय लिंक्स उपलब्ध असतील.
12. परीक्षेसंदर्भातील विस्तृत सूचना व अद्ययावत माहितीसाठी परीक्षेच्या वेळेअगोदर १० मिनिटे वरील वेब पेजेस पहावी.
13. विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षेसाठी देण्यात आलेल्या लिंक वर आपल्याला दिलेल्या वेळेच्या पहिल्या १५ मिनिटांमध्येच जॉईन करावे. तद्नंतर लिंक वर जॉईन करता येणार नाही.
14. लिंक जॉईन केल्या नंतर प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी एकूण ३0 मिनिटांचा कालावधी उपलब्ध असेल.
15. लिंकवर क्लिक/टच केल्यानंतर आपले पूर्ण नाव (आडनाव प्रथम) टाइप करावे आणि स्टार्ट बटन वर क्लिक/टच करावे.
16. त्यानंतर प्रश्नपत्रिका ओपन होईल. सदर प्रश्नपत्रिका सोडवून सबमिट केल्यावर आपला पेपर पूर्ण होईल.
MA-II Internal Online Test Time-Table of Arts Faculty with links NOV 2020.pdf