कृषी निविष्ठा पुरवठा व्यवस्थापन उपक्रम

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांचे मार्फत ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषी निविष्ठा व सेवा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महामंडळाला कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, यांचे कडुन राज्य ठोक खते विक्री परवाना (LCFD 100169) प्राप्त झाला असुन इफ्फको, क्रिभको या कंपन्या महामंडळामार्फत विविध विविध कार्यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषी निविष्ठा व सेवा पुरविण्यास तयार आहेत. महामंडळाच्या माध्यमातुन विविध कार्यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंपनी यांचे मार्फत शेतकरी सभासदांना पुरविण्यात येणा-या कृषी निविष्ठाची सेवा प्रथम वर्ष २०२० – २०२१ या वर्षाकरिता नगदी स्वरुपात ना नफा ना तोटा या तत्वावर देण्यात येणार आहे.

विविध कार्यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंपनी यांना महामंडळामार्फत खते पुरवठा करणेसाठीची कार्यपध्दती :

  1. प्रथम रासायनिक खते पुरवठा करणार्‍या कंपन्याकडुन रेल्वे रेक लागण्यापुर्वी ८ ते १० दिवस अगोदर महामंडळास माहिती मिळेल.

  2. यासबंधी महामंडळामार्फत सबंधित खत विक्री करणार्‍या संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी यांना जिल्हा उपनिबंधक / सहा. निबंधक सहकारी संस्था यांचेकडुन माहिती दिली जाईल.

  3. सबंधीत संस्था खत मागणी लेखी स्वरुपात मागणी पत्राद्वारे सहा. निबंधक तालुका यांच्या मार्फत महामंडळाचे समन्वय अधिकारी यांना कळवतील.

  4. महामंडळाचे समन्वय अधिकारी वाहतुक नियमांनुसार विविध कार्यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंपनी यांना खत पुरवठा करणेसाठी सहा. निबंधक यांच्या मार्फत खतांची उपलब्धता कळविण्यात येईल.

  5. सबंधीत संस्थांच्या मागणीनुसार उपलब्धता निश्चित झालेनंतर प्रत्यक्ष पुरवठा करणेपुर्वी सबंधीत संस्थांनी बिलाची पुर्ण रक्कम DD / NEFT अथवा RTGS महामंडळाच्या खाली दिलेल्या बँक खात्यात जमा झालेनंतरच रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात येईल.

  6. महामंडळाच्या बँक खातेत पुर्ण रक्कम जमा झालेनंतर सबधित खत पुरवठा करणार्‍या कंपनीमार्फत विविध कार्यकारी सेवा सोसायटी / शेतकरी उत्पादक कंपनी यांना खत पुरवठा केल्यानंतर त्याची पोहच सबंधीत संस्थां देतील.