मराठी भाषा गौरव दिन हा २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा दिवस असतो. या दिवशी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन साजरा केला जातो.