ग्रंथदिंडी
खेळ मांडियेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
या गाण्याच्या तालावर, टाळ,चिपळी, विणा वाजवत ग्रंथदिंडी काढण्यात आली .
ग्रंथदिंडीत विद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या संत ,साहित्यिक, संत कवयित्री तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज , वासुदेव, संत तुकाराम, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अशा अनेक पारंपारिक वेशभूषा करून ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीत प्रमुख पाहुणे प्रो. मेल्वीन डाबरे ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर एलिझाबेथ जयारानी, उपमुख्याध्यापिका मिसेस कॅरल सिक्वेरा, सिस्टर जेन्सी सहभागी होत्या .
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक, ९३ व्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, धर्मगुरु फादर फ्रांन्सिस दिब्रिटो यांना त्यांच्या जीवनावर आधारित नाटीका सादर करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
महाराष्ट्राला बराच मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे . अनेक परंपरा महाराष्ट्रात आजही जपल्या गेल्या आहेत आणि फक्त जपल्या नाहीत तर आजही मोठ्या उत्साहात आणि आपुलकीने सादर केल्या जातात .
महाराष्ट्र व वसईच्या संस्कृतीवर आधारित .
अभंग, ओवी , कोळीनृत्य , आदिवासी नृत्य, लावणी , कुपारी नृत्य , लेझीम , पोवाडा विद्यार्थ्यांनी सादर केले.
मनोगत
मराठी भाषा गौरव दिनाचे प्रमुख पाहुणे प्रो मेल्विन डाबरे यांनी इंग्रजी ही धनाची व्यवहाराची भाषा असली तरी मराठी मातृभाषा ही प्रेमाची मायेची , संस्काराची भाषा असते असे सांगत आपले मनोगत व्यक्त केले .
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर एलिझाबेथ जयारानी यांनी विद्यार्थ्यांना मराठी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या . कलाकारांचे कौतुक केले . विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले .
मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४, रोजी अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर पहिलाच मराठी भाषा गौरव दिन साजरा होत असल्याने त्याचे औचित्य साधून रॅली काढण्यात आली .